Rohit Sharma Rinku Singh: रोहित शर्माच्या त्या प्लॅनमध्ये रिंकू सिंहचा जातोय बळी..

0

Rohit Sharma Rinku Singh: टी ट्वेंटी विश्वचषक (T20 World Cup) संघात संधी मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान विरुद्धची टी ट्वेंटी मालिका अखेरची मालिका आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंसमोर दमदार कामगिरी करण्याचं आव्हान आहे. आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी संघ निवडताना अफगाणिस्तान टी ट्वेंटी सिरीज परफॉर्मन्स विचारात घेतला जाणार आहे. टी ट्वेंटी विश्वचषक संघाची घोषणा आयपीएल नंतरच करण्यात येईल. त्यामुळे आयपीएलमध्ये देखील दमदार कामगिरी करण्याचं आव्हान खेळाडू पुढे असणार आहे.

2022 पासून भारतीय टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे देण्यात आले. या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नव्हती, मात्र 2022 नंतर खेळलेल्या अनेक t20 मालिकांमध्ये हार्दिक पांद्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले. आता मात्र अचानक पुन्हा एकदा रोहित शर्माकडे t20 संघाची धुरा देण्यात आली आहे. टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) दिल्यानंतर, रोहित शर्माने आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आपला संघ बांधायला सुरुवात केली आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची (Rohit Sharma) कर्णधार पदावरून हकालपट्टी करून हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) संघाची धुरा दिली. मुंबई इंडियन्सच्या (mumbai Indians) निर्णयावर रोहित शर्माने नाराजी देखील व्यक्त केली. हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स या दोघांचे एकमेकांसोबतचे संबंध बिघडले असल्याच्या अनेक पोस्ट समोर आल्या. दोघांचेही इगो क्लॅश झाल्याचेही बोललं गेलं. रोहित शर्मा, हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून शिवम दुबेला (shivam Dube) तयार करत असल्याचं देखील अफगाणिस्तान विरुद्धच्या ट्वेंटी मालिकेत पाहायला मिळत आहे.

रिंकू सिंहने (Rinku Singh) आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी करून दाखवली आहे. शिवाय भारताकडे अखेरच्या षटकात दमदार खेळ करून, सामना फिनिश करणारा एकही खेळाडू नाही. त्यामुळे रिंकू सिंहचा ट्वेंटी संघात समावेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र असं असलं तरी देखील रोहित शर्माच्या प्लॅनमुळे रिंकू सिंहला बेंचवर बसावं लागण्याची शक्यता आहे.

दुखापती नंतर हार्दिक पांड्याने दमदार पुनरागमन केले, तर भारतीय टी ट्वेंटी संघात त्याचा समावेश करावा लागणार आहे. दुसरीकडे शिवम दुबे देखील दमदार फॉर्ममध्ये असल्यामुळे, त्याच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. रोहित शर्मा हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून, शिवम दुबेला तयार करत असला तरी आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली तर मात्र दोघांनाही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यावी लागेल.

आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला अष्टपैलू कामगिरी करता आली नाही, तर मात्र हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून शिवम दुबेला ट्वेंटी विश्वचषक संघात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल. शिवाय शिवम दुबे देखील खेळताना दिसेल. मात्र हार्दिक पांड्यानेही आयपीएलमध्ये अष्टपैलू कामगिरी केली, तर मा रिंकू सिंहला बेंचवर बसूनच वर्ल्ड कपही पाहावा लागण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा IND vs AFG 3rd T20I: उद्याचा सामना या तीन खेळाडूंचे भवितव्य ठरवणार; दोघांकडे शेवटची संधी..

IND vs AFG 3rd T20: शुभमन सोडा, यशस्वी जयस्वालचे स्थानही धोक्यात; काय आहे प्लेइंग 11 चे गणित..

IND vs AFG Rohit Sharma: विराट कोहलीचा इंटेंट आणि रोहित शर्माच्या प्लॅनमुळे हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम..

Rohit Sharma MI ..अन्यथा बेंचवर बसेन! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यास रोहितचा नकार; पर्याय संपल्याने मुंबईने उचलले मोठे पाऊल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.