IND vs AFG 3rd T20I: उद्याचा सामना ‘या’ तीन खेळाडूंचे भवितव्य ठरवणार; दोघांकडे शेवटची संधी..

0

IND vs AFG 3rd T20I: उद्या भारत आणि अफगाणिस्तान (ind vs AFG) यांच्यामध्ये अखेरचा T20 सामना पार पडणार आहे. बॅगलोरच्या चिन्हास्वामी मैदानावर होणाऱ्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. खासकरून रोहित शर्मावर (Rohit Sharma) अनेकांच्या नजरा असणार आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्याने त्याच्यावर दबाव असणार आहे. टी ट्वेंटी विश्वचषकापूर्वी हा शेवटचा t20 आंतरराष्ट्रीय सामना असल्याने, दमदार कामगिरी करून विश्वचषकासाठी आपली दावेदारी प्रस्थापित करण्याचा दबाव अनेक नवीन खेळाडूंवरही असणार आहे.

टी-ट्वेंटी विश्वचषकापूर्वी ही शेवटची T20 मालिका असल्यामुळे या मालिकेकडे अनेकांचे लक्ष आहे. अनेक नवीन खेळाडूंना दमदार कामगिरी करून आपणही t20 विश्वचषकासाठी पर्याय असल्याचे दाखवून देण्याची संधी आहे. टी ट्वेंटी मालिका सुरू होण्यापूर्वी शिवम दुबेला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, असे कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) पर्याय म्हणून रोहित शर्माने Rohit Sharma) शिवम दुबेला (shivam Dube ) संधी दिली.

रोहित शर्माने दिलेल्या संधीचा शिवम दुबेने देखील पुरेपूर फायदा उठवत बॅक टू बॅक आक्रमक अर्धशतके झळकावली. एकीकडे हार्दिक पांड्याची दुखापत आणि दुसरीकडे शिवम दुबेने योग्य वेळी केलेली दमदार कामगिरी यामुळे हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भारताच्या T20 संघात खेळायचं असेल, तर आयपीएलमध्ये (IPL) स्वतःला सिद्ध करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

तिसऱ्या T20 सामन्यात पुन्हा एकदा यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली, तर तोही भारताच्या t20 विश्वचषक संघात प्रबळ दावेदार मानला जात आहे. यशस्वी जयस्वालच्या कामगिरीमुळे शुभमनचे मात्र टी ट्वेंटी विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-ट्वेंटी सिरीजमध्ये अद्याप संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

गेल्या काही सामन्यांमध्ये विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मा चुकीचे फटके मारताना बाद झाला आहे. आवश्यकता नसताना चुकीचा फटका मारून आपली विकेट बहाल करणं जितेश शर्माला (jitesh Sharma) भोवण्याची शक्यता आहे. तिसऱ्या T20 सामन्यात देखील संजू सॅमसनला (Sanju Samson) खेळण्याची संधी मिळाली नाही, तर जितेश शर्मा आणि संजू सॅमसन दोघेही टी-ट्वेंटी विश्वचषकाला मुकण्याची शक्यता आहे. या दोघांऐवजी आयपीएल नंतर केएल राहुल (kl Rahul) भारताच्या t-20 संघात येताना दिसेल.

केएल राहुलला भारताच्या t20 संघात संधी देण्यासाठीच संजू सॅमसनला संधी देण्यात येत नसल्याचं बोललं जात आहे. शुभमन गिल, संजू सॅमसन, जितेश शर्मा या तिघांचाही हा शेवटचा इंटरनॅशनल टी ट्वेंटी सामना ठरू शकतो. जर संजू सॅमसनला संधी मिळाली, तर दमदार कामगिरी करून आपणही टी-ट्वेंटी विश्वचषक संघाचा प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून देण्याची संजू कडेही असणार आहे.

हे देखील वाचा  IND vs AFG 3rd T20: शुभमन सोडा, यशस्वी जयस्वालचे स्थानही धोक्यात; काय आहे प्लेइंग 11 चे गणित..

Virat Kohli IND vs AFG: प्लेइंग 11 चे हे गणित यशस्वी जयस्वालचा घेणार बळी; विराट कोहलीचा इंटेंटही मोठा फॅक्टर..

Rohit Sharma MI ..अन्यथा बेंचवर बसेन! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यास रोहितचा नकार; पर्याय संपल्याने मुंबईने उचलले मोठे पाऊल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.