Virat Kohli IND vs AFG: प्लेइंग 11 चे हे गणित यशस्वी जयस्वालचा घेणार बळी; विराट कोहलीचा इंटेंटही मोठा फॅक्टर..

0

Virat Kohli IND vs AFG: अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी (IND vs AFG 2nd T20) सामन्यात भारताने विजय साकारला. या विजयाबरोबर मालिकाही खिशात घातली. बेंगलोरच्या मैदानावर होणारा तिसरा टी-ट्वेंटी सामना जिंकून व्हाइट वॉश देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) दोघेही पहिल्या t20 सामना खेळू शकले नव्हते. विराटने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती. तर दुखापतीमुळे यशस्वी जयस्वाल पहिल्या सामन्याला मुकला होता. मात्र दुसऱ्या T20 सामन्यात दोघांनीही दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत, भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

आगामी t20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) दृष्टीने या मालिकेला विशेष महत्त्व आहे. या मालिकेत परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूंना विश्वचषकात संधी दिली जाणार आहे. गेल्या अनेक t20 सामन्यात यशस्वी जयस्वालने दमदार खेळ केला आहे. काल झालेल्या टी ट्वेंटीमध्ये देखील आक्रमक फलंदाजी करत टी-ट्वेंटी विश्वचषक संघात आपणही प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले.

अनेक यंगस्टर दमदार खेळाचे प्रदर्कश करत आहेत. साहजिक त्यामुळे टी ट्वेंटी विश्वचषक संघात संधी मिळवण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ सुरू आहे. यामध्ये यशस्वी जयस्वाल हे नाव आघाडीवर आहे. मात्र तरी देखील भारताच्या t20 विश्वचषक संघात यशस्वीला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवचे भारताच्या t20 संघात कमबॅक होणार आहे.

विकेट कीपरसह सहा फलंदाजांना अंतिम 11 मध्ये संधी मिळणार आहे. सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल किंवा रवींद्र जडेजा असण्याची शक्यता आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, एक विकेटकीपर फलंदाज, रिंकू सिंह आणि जडेजा असा बॅटिंग ऑर्डर असणार आहे. साहजिकच त्यामुळे यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी करून देखील त्याला भारताच्या प्लेइंग11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

दुसरीकडे विराट कोहलीने देखील दमदार इंटेंट दाखवला आहे. याशिवाय वेस्टइंडीज मधील खेळपट्टी संथ आहे. आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर विराट कोहलीचा रोल खूप महत्त्वपूर्ण ठरतो. खेळपट्टीला अनुसरून धावा करण्यात विराट मातब्बर आहे. नॅचरल स्ट्रोक प्लेयरला आव्हानात्मक खेळपट्टी नेहमी आव्हानं उभा करते. त्यामुळे विराट कोहली सारखा अनुभवी खेळाडू टीम इंडिया सोबत ठेवण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे विराट कोहली रोहित बरोबर सलामीला येणार आहे.

यशस्वी जयस्वाल सलामीला आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला, तर रिंकू सिंहला (Rinku Singh) भारताच्या प्लेइंग 11मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. भारताकडे रिंकू सिंहच्या रूपात एकच तगादा फिनिशिअर आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटला यशस्वी जयस्वाल दमदार फॉर्ममध्ये असूनही अंतिम 11 मध्ये संधी देता येणार नाही. जर रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवायचं असेल, तर यशस्वी जयस्वालला बाहेरचा रस्ता दाखवण्याशिवाय दुसरा पर्याय मॅनेजमेंट पुढे नसणार आहे.

हे देखील वाचा IND vs AFG Rohit Sharma: विराट कोहलीचा इंटेंट आणि रोहित शर्माच्या प्लॅनमुळे हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम..

IND vs AFG Rohit Sharma: विराट कोहलीचा इंटेंट आणि रोहित शर्माच्या प्लॅनमुळे हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम..

Rohit Sharma MI ..अन्यथा बेंचवर बसेन! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यास रोहितचा नकार; पर्याय संपल्याने मुंबईने उचलले मोठे पाऊल..

Rohit Sharma vs MI: पांड्याला टार्गेट करताच मुंबई इंडियन्स कडून रोहीत शर्माची उचलबांगडी; MI कडून खेळण्यास रोहितचाही नकार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.