IND vs AFG Rohit Sharma: विराट कोहलीचा इंटेंट आणि रोहित शर्माच्या प्लॅनमुळे हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम..

0

IND vs AFG Rohit Sharma: अफगाणिस्तान विरुद्ध सुरू असलेली बहुचर्चित टी-ट्वेंटी मालिका भारताने जिंकली आहे (India win T20 series against Afghanistan) तीन-तीन t20 सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊन भारतीय संघ आता बेंगलोरला पोहोचणार आहे. बेंगलोरच्या चिन्नास्वामी मैदानावर अखेरचा t20 सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेतून अनेक पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्या असून एकप्रकारे रोहित शर्माला संजीवनी मिळाली आहे. (3rd T20 in chinnaswamy stadium)

2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी (T20 world Cup 2022) विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकही t20 सामना खेळले नव्हते. अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये या दोघांनाही संधी देण्यात आल्याने, या मालिकेकडे अनेकांचे लक्ष लागलं होतं. पहिल्या दोन टी-ट्वेन्टी सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) शून्यावर बाद झाला. वैयक्तिक कारणामुळे विराट कोहली (Virat Kohli) पहिला टी-ट्वेंटी सामना खेळू शकला नाही. मात्र दुसऱ्या T-20 सामन्यात आपले नवीन वर्जन घेऊन येत विराट कोहली कमालीचा इंटेंड दाखवला.

दुसऱ्या t20 सामन्यातही रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीने मात्र जबरदस्त इंटेंट दाखवला. विराट कोहली कोणत्याही संघाविरुद्ध, खेळपट्टी कशीही असली तरी धावा करतो. मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ करण्यात तो अपयशी ठरतो, असं अनेकदा बोललं गेलं. जर विराट कोहलीला टी-ट्वेंटी विश्वचषक खेळायचा असेल, तर त्याला इंटेंटमध्ये सुधारणा करावी लागेल, असंही सांगण्यात आले. विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात इंटेट दाखवत प्रत्युत्तर जोरदार दिले.

विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला असला, तरी धावा करणे हा मूळ मुद्दा नव्हता. विषय इंटेंटचा होता. पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी करत, विराटने 16 चेंडूत 29 धावांची खेळी केली. दुसरीकडे रोहित शर्मा मात्र फलंदाजीमध्ये अपयशी ठरला. मात्र कर्णधार म्हणून, त्याने टाकलेला डाव सफल ठरल्याने, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) अडचणीत वाढ झाली आहे.

हार्दिक पांड्याचा लाईट टू लाईफ रिप्लेसमेंट म्हणून शिवम दुबेला (shivam Dube) खेळवण्याचा निर्णय यशस्वी ठरला. दोन्ही सामन्यात शिवम दुबेने अष्टपैलू कामगिरी केली. दोन्ही डावात आक्रमक अर्धशतके झळकावत चौथ्या क्रमांकावर आपण सर्वोत्तम फलंदाज असल्याचे शिवम दुबेने दाखवून दिले. शिवम दुबेच्या कामगिरीवर रोहित शर्मा भलताच खुश देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्याला दूर ठेवण्यासाठी रोहित शर्मा शिवम दुबेला विशेष महत्त्व देत आहे. रोहित शर्माच्या योजनेचा हा एक भाग असल्याचं देखील बोललं जात आहे.

विराट कोहलीचा इंटेंट आणि रोहित शर्माचा प्लॅन दोन्ही सफल झाल्याने, आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकात आता रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही खेळणार असल्याचे बोललं जात आहे. विराट आणि रोहित दोघे T20 विश्वचषक खेळणार असल्याने, हार्दिक पांड्याचे कर्णधार पदाचे स्वप्नही भंगले आहे.

इतकच नाही, तर शिवम दुबे दमदार कामगिरी करत असल्यामुळे, टी-ट्वेंटी संघात हार्दिक पांड्याला संधी मिळेल की नाही, हेही सांगता येणं अवघड असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रोहित शर्माचा आणि विराट कोहलीसाठी अफगाणिस्तान विरुद्धची टी-ट्वेंटी सिरीज संजीवनी ठरली असून, हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

हे देखील वाचा Rohit Sharma MI ..अन्यथा बेंचवर बसेन! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यास रोहितचा नकार; पर्याय संपल्याने मुंबईने उचलले मोठे पाऊल..

Rohit Sharma vs Hardik Pandya: मुंबई इंडियनच्या पोस्ट मधून रोहित शर्मा गायब होण्याचं धक्कादायक कारण समोर..

Rohit Sharma vs mumbai Indians: रोहित शर्मा पुढे मुंबई इंडियन्सची शरणागती; मुंबई इंडियन्स कडून अखेर यूटर्न..

Rohit Sharma vs MI: पांड्याला टार्गेट करताच मुंबई इंडियन्स कडून रोहीत शर्माची उचलबांगडी; MI कडून खेळण्यास रोहितचाही नकार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.