Rohit Sharma vs mumbai Indians: रोहित शर्मा पुढे मुंबई इंडियन्सची शरणागती; मुंबई इंडियन्स कडून अखेर यूटर्न..
Rohit Sharma vs mumbai Indians: जेव्हा कधी आयपीएलचा (ipl) इतिहास लिहिला जाईल, तेव्हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे नाव वेगळे करता येणार नाही. 2013 पर्यंत मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये एकदाही चमकदार कामगिरी करता आली नव्हती. 2013 मध्ये मुंबई इंडियनची धुरा रोहित शर्माने सांभाळली, आणि पाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. मात्र गेल्या तीन सीजन पासून रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला फार चमकदार कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे रोहित शर्माची कर्णधार पदावरून मुंबई इंडियन्सने हकालपट्टी केली.
कर्णधारपद मिळत नसल्याने, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रेंचाईजी सोडत गुजरात टायटन्स (gujrat Titans) संघात सामील झाला. गुजरात टायटन्स दोन सीजन खेळत हार्दिक पांड्याने एकदा आयपीएल स्पर्धा जिंकली. आणि दुसऱ्यांदा फायनल पर्यंत मजल मारली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धा जिंकल्याने मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याची भुरळ पडली. आणि अखेर हार्दिक पांड्याला पुन्हा मुंबई इंडियन्स संघात आणून कर्णधारपद देण्याचा निर्णय देखील घेण्यातही आला.
हार्दिक पांड्याला मुंबईने कर्णधार घोषित केल्यानंतर, मात्र रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळालं. हार्दिक पांड्याच्या कर्णधार पदामुळे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचे देखील समोर आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित शर्माची पत्नी रितिका हिने कमेंट द्वारे आपली नाराजी उघडही केली. रोहित शर्माच्या सन्मानार्थ मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स दोघांनीही पोस्ट केली. मात्र रितिकाने केवळ चेन्नई चेन्नई संघाच्या पोस्टलाच रिप्लाय देत कमेंट केली. मुंबई इंडियन्सच्या पोस्टकडे दुर्लक्ष केले.
हार्दिक पांड्याचा लाईक टू लाईक रिप्लेसमेंट म्हणून रोहित शर्माने पहिल्या t20 सामन्यात शिवम दुबेला संधी दिली. शिवम दुबेने या संधीचं सोनं करत, अष्टपैलू कामगिरीही केली. विजयानंतर, रोहितने शिवम दुबेची पाठ थोपटत त्याची विशेष प्रशासना केली. रोहित शर्माचे हे कृत्य मुंबई इंडियन्सच्या पचनी पडलं नाही. रोहित शर्मा हार्दिक पांड्याचा पर्याय तयार करत असल्याचं उघड झाल्यानंतर, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला दुर्लक्षित करणारी पोस्ट केली.
पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यानंतर भारतीय कसोटी संघ जाहीर करण्यात आला. इंग्लड विरूद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. घोषणा झालेल्या खेळाडूंची नवे आणि तिघांचे फोटो मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले. मात्र या फोटोमधून रोहित शर्माला वगळण्यात आलं. रोहित ऐवजी केएल राहुल, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यरचा फोटो लावण्यात आला.
रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार असतानाही रोहित शर्माचा फोटो मुंबई इंडियन्सकडून लावण्यात आला नाही. मुंबई इंडियन्सच्या या कृत्यावर चाहत्यांनी टीका केली. मुंबई इंडियन्सला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले. अंबानी बापाचा फोटो लावायला विसरला, अशा टोकाच्या कमेंट देखील चाहत्यांनी केल्या. सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर, मात्र मुंबई इंडियन्सला अखेर 48 तासाच्या आतमध्ये युटर्न घ्यावा लागला आहे.
आज मुंबई इंडियन्सने जानेवारी ते मार्चमध्ये भारतीय संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक सादर केले आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या मालिकांचे असायमेंट रोहित शर्मा बरोबर मुंबई इंडियन्सने पोस्ट केले आहे. खरं तर याची काहीही आवश्यकता नव्हती. मात्र कसोटी संघाची घोषणा झाल्यानंतर, रोहित शर्माला डावलल्यामुळे मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा विषयी नाईलाजाने स्पेशल पोस्ट करावी लागली आहे.
हे देखील वाचा Rohit Sharma vs MI: पांड्याला टार्गेट करताच मुंबई इंडियन्स कडून रोहीत शर्माची उचलबांगडी; MI कडून खेळण्यास रोहितचाही नकार..
IND vs AFG 2nd T20: रोहित-विराटच्या ओपनिंगमुळे संघात तीन बदल; असा आहे दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ..
Acharya Chanakya thought: काहीही झालं तरी या दोन गोष्टी कोणालाही सांगू नका; तरच..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम