IND vs AFG 2nd T20: रोहित-विराटच्या ओपनिंगमुळे संघात तीन बदल; असा आहे दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ..

0

IND vs AFG 2nd T20: अफगाणिस्तान आणि भारत यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन t20 सामन्याच्या मालिकेतील दुसरा टी ट्वेन्टी सामना उद्या इंदूरच्या मैदानावर पार पडणार आहे. दुसऱ्या T20 सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) खेळणार आहे. तब्बल 430 दिवसानंतर, विराट कोहली टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आगामी t20 विश्वचषकाच्या दृष्टीने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

वैयक्तिक कारणामुळे पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यातून विराट कोहलीने माघार घेतली होती. आता मात्र दुसरा T20 सामना खेळण्यासाठी विराट कोहली सज्ज झाला आहे. गेल्या काही सामन्यांमधून सातत्याने अपयशी ठरलेल्या शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून, विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामीला येणार असल्याची माहिती आहे. दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात एकूण तीन बदल केले जाणार आहेत.

विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) देखील प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शुभमन गिल (shubman gill) आणि तिलक वर्मा (tilak Verma) हे दोघेही गेल्या अनेक सामन्यांमधून सातत्याने अपयशी ठरले आहेत. या दोघांनाही आता t20 मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून, तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसनला पसंती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. संजू सॅमसन अतिरिक्त यशस्वी जयस्वाल हा देखील पर्याय रोहित शर्मा पुढे आहे. या दोघांपैकी भारतीय प्लेइंग 11 कोण खेळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

रिंकू सिंहला (Rinku Singh) भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी टी-ट्वेंटी विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्माला ओपनिंग करावी लागणार आहे. बीसीसीआयने (BCCI) देखील या संदर्भात विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांशीही एकत्र चर्चा केल्याची माहिती आहे. टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सूर्यकुमार यादवची (SuryaKumar यादव) संघात वापसी होणार असल्याने, सूर्य रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा करून देण्यासाठी हा प्लॅन आखला जात आहे.

टी ट्वेंटी विश्वचषक प्लॅनचा भाग म्हणून अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या t20 सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामीला येणार असल्याची माहिती आहे. भारतीय वेळेनुसार उद्या सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. इंदोरची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने, क्रिकेट चाहत्यांना हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणार असला तरी, रोहित शर्मा उद्या वेगळा प्लॅन घेऊन मैदानात उतरू शकतो.

हे देखील वाचा Acharya Chanakya thought: काहीही झालं तरी या दोन गोष्टी कोणालाही सांगू नका; तरच..

Hardik Pandya on BCCI: रोहित शर्माला कर्णधार करताच हार्दिक पांड्याची BCCI ला चपराक; पोस्ट करून म्हणाला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.