Hardik Pandya on BCCI: रोहित शर्माला कर्णधार करताच हार्दिक पांड्याची BCCI ला चपराक; पोस्ट करून म्हणाला..

0

Hardik Pandya on BCCI: दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन t20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. एका वर्षानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat kohli) भारतीय टी-ट्वेंटी संघात संधी मिळाली. रोहित शर्माला कर्णधार केल्याने, आता हार्दिक पांड्याचे t20 विश्वचषकामध्ये नेतृत्व करण्याचे स्वप्नही भंगले. एकीकडे रोहित शर्माची कर्णधारपदी निवड करताच, दुसरीकडे हार्दिक पांड्याने (Hardik pandya) बीसीसीआयला (BCCI) चपराक लगावली आहे.

2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल या तिघांना टी ट्वेण्टी संघात BCCI ने संधी दिली नाही. आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळला जाईल, यासंदर्भात हार्दिक पांड्याला सुचित देखील करण्यात आले. 22 नंतर झालेल्या अनेक टी ट्वेंटी सिरीजमध्ये हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून देखील संधी देण्यात आली. आता मात्र पुन्हा t20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आल्याने, हार्दिक पांड्याचा पारा चढला आहे.

2022 नंतर हार्दिक पांड्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले T20 संघाच्या कर्णधार पदी अधिकृतरीत्या हार्दिक पांड्याची निवड केली नसली तरी हार्दिक पांड्याला यापुढे तूच भारतीय टी-ट्वेंटी संघाचा कर्णधार असणार असल्याचं सुचित करण्यात आले होते. आता मात्र अचानक रोहित शर्माची t20 संघाच्या कर्णधार पदी निवड करून एक प्रकारे हार्दिक पांड्याला डावलण्यात आले. आता बीसीसीआयच्या या निर्णयावर हार्दिक पांड्या चांगलाच संपल्याचं पाहायला मिळत आहे.

हार्दिक पांड्याचा राग अनावर होण्यास कारण म्हणजे, रोहित शर्मा केवळ अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी नाही, तर आगामी T20 विश्वचषकात देखील भारतीय टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 2022 नंतर हार्दिक पांड्या भारतीय टी ट्वेंटी संघाचा कर्णधार असेल, असं बीसीसीआयने सुचित केल्यानंतर, आता अचानक युटूर्न घेतल्याने हार्दिक पांड्याने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून बीसीसीआयला खडे बोल सुनावले आहेत.

आपल्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून हार्दिक पांड्याने ट्रेनिंगचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसे तर ट्रेनिंग संदर्भातले अनेक व्हिडिओ सर्वच खेळाडू आपल्या अकाऊंटवर टाकत असतात. मात्र मात्र हार्दिक पांड्याने टाकलेला व्हिडिओ खास आहे. वेटलिफ्टिंग, कार्डियो करताना हार्दिक पांड्याने टाकलेल्या व्हिडिओ खाली दिलेल्या कॅप्शनवरून चर्चा रंगल्या आहेत. एक प्रकारे हार्दिक पांड्याने बीसीसीआयला खडेबोल सुनावले असल्याचे बोलले जात आहे.

हार्दिक पांड्याने इंस्टाग्राम ट्रेनिंगचा एक व्हिडिओ पोस्ट करताना त्याखाली कॅप्शन देत लिहिले, एकाच दिशेने जायचं. हा मथळा हार्दिक पांड्याने बीसीसीआयने कर्णधार पदावरून घेतलेल्या युटर्नसाठी टाकलं असल्याचं बोललं जात आहे. जर तुम्ही 2022 नंतर रोहित शर्मा, विराट कोहली शिवाय भारतीय टी-ट्वेंटी संघ बांधत होता, त्या दृष्टीने पावले देखील टाकली. मग आता एका वर्षानंतर तुम्ही यूटर्न घेत असाल, तर हे चुक असून एकाच दिशेने पुढे जायला हवं होतं. असे संकेत हार्दिक पांड्या BCCI ला देऊ इच्छित असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा IND vs AFG 1st T20 playing 11: कितीही चांगला खेळला तरी रिंकू सिंह प्लेइंग इलेव्हनचा भाग नसणार; होय ही भारतीय संघाची मजबुरीच..

IND vs AFG 1St T20: शुभमन की यशस्वी कोण येणार सलामीला? अशी असेल पहिल्या T20 साठी भारतीय प्लेइंग इलेव्हन..

IND vs AFG 1st T20I: विराट, रोहितच्या सलामीमुळे जयस्वाल, शुभमन गिलचे T20 करिअर धोक्यात; राहुल द्रविडचा प्लॅन समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.