IND vs AFG 1st T20 playing 11: कितीही चांगला खेळला तरी रिंकू सिंह प्लेइंग इलेव्हनचा भाग नसणार; होय ही भारतीय संघाची मजबुरीच..

0

IND vs AFG 1st T20 playing 11: 11 जानेवारीला भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये पहिला टी ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. मोहलीच्या मैदानावर हा सामना असल्याने, क्रिकेट चाहत्यांना हायस्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) एका वर्षानंतर टी ट्वेंटी क्रिकेट खेळणार असल्याने, चाहत्यांना देखील उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्माची t20 मध्ये निवड केल्याने, रिंकू सिंहला (Rinku Singh) मात्र बेंचवरच बसावं लागणार आहे.

विराट आणि रोहित टी ट्वेंटीमध्ये परतल्याने अनेक नवीन खेळाडूंना आता टी ट्वेंटी विश्वचषक (T20 World Cup) बेंचवर बसून पहावा लागणार आहे. अनेकांना भारताच्या पंधरा सदस्यीय संघात देखील संधी मिळणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये ईशान किशन (ishan Kishan) (KL Rahul) जितेश शर्मा (jitesh Sharma) संजू सॅमसन (Sanju Samson) या चौघांपैकी दोघांची ट्वेंटी विश्वचषकामध्ये निवड केली जाणार नाही.

दुसरीकडे शुभमन गिल (shubman gill) तिलक वर्मा (tilak Verma) यशस्वी जयस्वाल या तिघांपैकी ही केवळ दोघांनाच पंधरा सदस्यीय संघामध्ये संधी मिळेल. वर्ल्ड कपमध्ये निवडल्या जाणाऱ्या 15 सदस्यीय संघात रिंकू सिंहची (Rinku Singh) निवड केली जाईल. मात्र भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकू सिंहला संधी द्यायची असेल, तर विराट कोहली, रोहित शर्माला सलामीला यावं लागेल. जर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आला, तर रिंकू सिंहला संधी मिळणार नाही.

वर्ल्डकप संघात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादवची (SuryaKumar yadav) वापसी होणार आहे. जर हे दोघे भारताच्या t-20 संघात परतले, तर रिंकू सिंह प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार नाही. जर रिंकू सिंहला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची असेल, तर विराट कोहली आणि रोहित शर्माला ओपन करावं लागेल. जर विराट तिसऱ्या क्रमांकावर आला, तर चौथ्या क्रमांकावर सूर्याकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या, सहाव्या संजू सॅमसन, जितेश शर्मा, या दोघांपैकी एक विकेटकीपर फलंदाज खेळताना दिसेल.

सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा किंवा अक्षर पटेल, आठव्या कुलदीप यादव, नऊ मोहम्मद सिराज, दहाव्या क्रमांकावर बुमराह आणि अकराव्या क्रमांकावर अर्षदीप सिंग या स्वरूपात भारतीय प्लेइंग इलेव्हन असेल. विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवूनही, जर रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची असेल,तर भारतीय संघाला पाच गोलंदाजांच्या ऑप्शनसह मैदानात उतरावे लागेल.

यामध्ये हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा दोघांनाही गोलंदाज म्हणून कन्सिडर करावे लागेल. मात्र टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजाच्या आवश्यकता फारसी पडत नाही. त्यामुळे भारत सहा गोलंदाज पर्याय घेऊनच मैदानात उतरेल. साहजिकच त्यामुळे रिंकू सिंह भारताच्या प्लेइंग11 मध्ये खेळताना दिसणार नसण्याची शक्यता अधिक आहे.

हे देखील वाचा IND vs AFG 1St T20: शुभमन की यशस्वी कोण येणार सलामीला? अशी असेल पहिल्या T20 साठी भारतीय प्लेइंग इलेव्हन..

India vs Afghanistan T20I: केएल राहुल, ईशान किशन, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर संपुष्टात..

IND vs AFG 1st T20I: विराट, रोहितच्या सलामीमुळे जयस्वाल, शुभमन गिलचे T20 करिअर धोक्यात; राहुल द्रविडचा प्लॅन समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.