IND vs AFG 1st T20I: विराट, रोहितच्या सलामीमुळे जयस्वाल, शुभमन गिलचे T20 करिअर धोक्यात; राहुल द्रविडचा प्लॅन समोर..

0

IND vs AFG 1st T20I: भारतीय टी-ट्वेंटी संघात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat kohli) निवडीमुळे अनेकांचे करिअर आता टांगणीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन t20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड करण्यात आली आहे. विराट कोहली आणि रोहीत शर्माची निवड केल्याने, आता टी-ट्वेंटी विश्वचषकाचा प्लॅन देखील समोर आला आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचं बोललं जात होतं. विराट आणि रोहित भारतीय टी ट्वेंटी संघाचा भाग नसणार असही बोललं जात होतं. आता मात्र या सगळ्यांवर विरजण पडलं आहे. हार्दिक पांड्याचे टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्नही आता भंगले आहे. आगामी t20 विश्वचषकात रोहित शर्मा हाच भारतीय संघाची धुरा सांभाळणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.

रोहितच्या निवडीमुळे केवळ हार्दिक पांड्याचे स्वप्नच भंगले नाही, तर रोहित आणि विराटच्या निवडीमुळे शुभमन गिल (shubman gill) आणि यशस्वी जयस्वाल (yashasvi jaiswal) या दोघांच्या t-20 करिअरवर देखील टांगती तलवार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा T20 क्रिकेटमध्ये सलामीवीराची भूमिका पार पाडणार असल्याची माहिती आहे. विराट आणि रोहित टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सलामीला येणार असतील, तर पारंपारिक सलामीवीरांना T20 क्रिकेटमध्ये खेळण्याची संधीही मिळणार नसण्याची शक्यता आहे.

रोहित आणि विराट कोहलीला सलामीला पाठवण्यापाठीमागे राहुल द्रविडची मजबुरी देखील असल्याचं दिसत आहे. जर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तर रिंकू सिंहला भारताच्या संघात खेळण्याची संधी मिळणार नाही. जर भारताच्या प्लेइंग 11 मध्ये रिंकू सिंहला (Rinku Singh) संधी दिली, तर विकेट कीपरला स्थान मिळताना दिसत नाही. त्यामुळे विराट आणि रोहितला सलामीवीर म्हणून पाठवणे भारतीय टीम मॅनेजमेंटसाठी मजबुरी देखील असल्याचं पाहायला मिळत आहे.

जर विराट आणि रोहित सलामीला आले तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, 4 थ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या, पाचव्या क्रमांकावर संजू सॅमसन/जितेश शर्मा/ केएल राहुल या तिघांपैकी एक जण खेळताना दिसेल. सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंग, सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा, आठव्या क्रमांकावर कुलदीप यादव, नव्या क्रमांकावर जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, आणि अर्शदीप सिंग या प्लेइंग इलेव्हनसह भारतीय संघ आगामी विश्वचषकात उतरू शकतो.

मात्र रोहित शर्मा, शुभमन गिल किंवा यशस्वी जयस्वाल या तिघांपैकी दोन फलंदाज सलामीला आले, तर मात्र प्लेइंग इलेव्हनचे गणित कोलमडताना पाहायला मिळत आहे. जर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, तर मात्र भारतीय संघात रिंकू सिंहला अंतिम 11 मध्ये संधी मिळताना दिसत नाही. रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवायचं असेल, तर विराट आणि रोहितला ओपन करावे लागेल. दुसरा एक पर्याय म्हणजे, भारतीय संघाला पाच बॉलिंग ऑप्शन घेऊन मैदानात उतरावं लागेल. तरच रिंकू सिंह भारताच्या प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसेल.

गेल्या काही सामन्यांमध्ये रिंकू सिंहने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केलं आहे. भारतीय संघाकडे सामना फिनिश करणारा भरवशाचा एकही फलंदाज सध्या दिसत नाही. रिंकू सिंहने मात्र ही उणीव भरून काढली आहे. अशा परिस्थितीत रिंकू सिंहला भारतीय संघात संधी दिली गेली नाही, टीम मॅनेजमेंटची ही खूप मोठी चूक ठरेल.

त्यामुळे रिंकू सिंह भारताच्या अंतिम 11 मध्ये खेळताना दिसणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. साहजिकच या सगळ्या शक्यतांचा विचार केला, तर रोहित आणि विराट या दोघांना सलामीला येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. राहुल द्रविड देखील याच प्लॅननुसार पुढे जाण्यासाठी अनुकूल असल्याची माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा India vs Afghanistan T20I: केएल राहुल, ईशान किशन, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर संपुष्टात..

IND vs AFG T20: राहुल द्रविडच्या षडयंत्राचा ईशान किशन ठरला बळी; T20 World Cup मध्येही ईशान ऐवजी आता दिसणार हा फलंदाज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.