IND vs AFG T20: राहुल द्रविडच्या षडयंत्राचा ईशान किशन ठरला बळी; T20 World Cup मध्येही ईशान ऐवजी आता दिसणार हा फलंदाज..

0

IND vs AFG T20: 11 जानेवारीपासून अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन t20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. (India announced T20 squad against Afghanistan) आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे, अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. अफगाणिस्तान विरुद्ध निवडलेल्या संघापैकीच आगामी T20 विश्वचषकासाठीचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे या संघ निवडीची आता जोरदार चर्चा सुरू आहे.

2022 मध्ये खेळलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर विराट कोहली (Virat kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) एकही t20 सामना खेळले नाहीत. मात्र आता या दोघांची टी-ट्वेंटी संघात वापसी झाली आहे. विराट आणि रोहित दोघेही t20 खेळणार असल्याने, आता 2022 नंतर अनेक T20 सामने खेळलेल्या काही नवीन खेळाडूला मात्र धक्का बसला आहे. यामध्ये सगळ्यात मोठा धक्का ईशान किशनला (ishan Kishan) बसला आहे.

टी ट्वेण्टी संघात ईशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर पाहिलं जात होतं. t20 विश्वचषकात देखील ईशान तिसऱ्या क्रमांकाची पहिली पसंती असल्याचं बोललं जात होतं. या संदर्भात अनेक रिपोर्ट देखील समोर आले होते. मात्र आता ईशान किशनला टी-ट्वेंटी संघातूनच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ईशान किशन आता आगामी टी-20 विश्वचषकात देखील विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळताना दिसणार नसल्याचं बोललं जात आहे.

ईशान किशनला वगळण्यापाठीमागे राहुल द्रविड (rahul Dravid) हात असल्यास देखील आता बोललं जात आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) भारताच्या T20 संघात सामील करून घेण्यासाठी राहुल द्रविडने ईशान किशनचा बळी दिला असल्याचं देखील आता बोललं जात आहे. सोशल मीडियावर हा टॉपिक मोठ्या प्रमाणात ट्रेंड देखील होताना पाहायला मिळतोय.

T20 विश्वचषकापूर्वी ही शेवटची टी-ट्वेंटी मालिका असल्याने, या संघ निवडीला प्रचंड महत्त्व होतं. ईशान किशन या टी ट्वेंटी सिरीजचा भाग नसल्याने, आता त्याला विश्वचषकात संधी मिळताना दिसणार नाही. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांनी दमदार कामगिरी केली, तर ईशान किसानची टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्याची संधी आणखी दूर जाणार आहे.

संजू सॅमसनसाठी ईशान किशनचा बळी दिल्याचं बोलत जात असलं, टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ईशान किशनचे आकडे प्रचंड साधारण आहेत. ईशान किशनने आतापर्यंत एकूण 32 T20 सामने खेळले आहेत, ज्यात केवळ 25.67 ची सरासरी आणि 124.37 चा स्ट्राइक रेट राहिला आहे. संजू सॅमसन राहुल द्रविडचा आवडता खेळाडू असल्याचे बोलले जाते. राजस्थान रॉयल संघात संजूला घेऊन येण्यापाठीमागे राहुल द्रविडचा मोठा हात होता. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात संजूने आव्हानात्मक परिस्थितीत दमदार शतक झळकावले होते. त्याचाही फायदा होताना दिसत आहे.

हे देखील वाचा AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

IND vs AFG T20I Squad : केएल राहुलचे T20 करिअर संपुष्टात; विराट रोहितचा दरारा कायम..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.