Google Pay loan: गूगलकडून 15 हजार ते एक लाखांपर्यंत घ्या उसने पैसे; वाचा सविस्तर प्रोसेस..

0

Google Pay loan: पैशाची गरज कधी कोणाला कोणत्या वेळी पडेल, हे काही सांगता येत नाही. वेळ नेहमी न सांगताच येत असते. जवळ पैसे नसतानाच अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी अनेकांकडे मदत मागून देखील मदत मिळत नाही. मात्र आता तुमच्या या समस्येला पूर्णविराम मिळाला आहे. गुगल आता तुम्हाला पंधरा हजार ते एक लाखापर्यंत कर्ज देत आहे. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मोबाईलद्वारे प्रोसेसची प्रक्रिया पूर्ण करून गुगल कडून एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

यूपीआयच्या (UPI) माध्यमातून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून व्यवहार करणं आता सहज शक्य झाले आहे. तुमच्या जवळ काहीही कॅश नसली, तरी देखील एक रुपयापासून एक लाखांपर्यंत तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करू शकता. इतकंच नाही, तर अनेक यूटीआय पेमेंटवर कॅशबॅक देखील मोठ्या प्रमाणात दिला जातो. जर तुम्ही गुगल पे (Google Pay UPI) युपीआय वापरत असाल, तर तुम्हाला पंधरा हजारापासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देखील दिले जात आहे. जाणून घेऊया संदर्भातली सविस्तर प्रोसेस..

गुगलकडून देण्यात येणाऱ्या लोनला सॅशे लोन असं नाव देण्यात आले आहे. छोट्या व्यापाऱ्यांना या सुविधेचा लाभ देण्यासाठी गुगलने DMI Finance यांच्याशी भागीदारी केली आहे. गूगल पे ते देत असलेल्या लोणचा कालावधी सात दिवसांपासून बारा महिन्यांपर्यंत असणार आहे. लोन घेण्यासाठी ग्राहकांना एक ॲप डाऊनलोड करावं लागणार आहे.

असं फेडावे लागेल कर्ज..

DMI Finance सोबत केलेल्या भागीदारीच्या माध्यमातून गुगल पे आपल्या वापरकर्त्यांना लोन देत आहे. वापरकर्त्यांनी घेतलेले लोन हे कमीत कमी 111 रुपये हप्त्याच्या माध्यमातून एका वर्षाच्या आतमध्ये फेडणे आवश्यक आहे. तुम्ही घेतलेले लोन एका वर्षामध्ये फेडण्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्याकडे असणार आहे. समजा तुम्ही एक लाख रुपयाचे लोन घेतले असेल ते लोन बारा महिन्यात फेडणे आवश्यक आहे. यासाठी महिन्याला किती हजाराचा हप्ता ठेवायचा याचे अधिकार तुमच्याकडे देण्यात आले आहेत.

कर्जासाठी या टिप्स फॉलो करा..

तुम्हाला गुगल पे कडून लोन हवं असल्यास तुम्हाला ‘Google Pay for Business’ हे ॲप डाउनलोड करायचं आहे. या ॲपवरती तुम्हाला खाते काढायचे आहे. “Google Pay for Business” he ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला loans या पर्यायावर क्लिक करायचे आहे. नंतर तूम्ही ऑफर्स’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यापुढे तुम्हाला हवी असणारी रक्कम निवडून ‘Get start’ यावर क्लिक करा.

Get start यावर क्लिक केल्यानंतर DMI Finance hi वेबसाईटवर ओपन करण्यात येइल. या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या गुगल खात्याचे लॉगिन करावे लागणार आहे. याठिकाणी तुम्ही वैयक्तिक माहिती भरून कर्जाची रक्कम, त्याचबरोबर कर्जाचा कालावधी, ठरवायचा आहे.

तुम्ही निवडलेल्या कर्जावरती ई-स्वाक्षरी करावी करून, तुम्हाला विचारण्यात आलेली ईकेवायसी कागदपत्रे सबमिट करा. पुढे तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर तुम्हाला EMI पेमेंटकरीता Setup eMandate किंवा Setup NACH या दोन पैकी एका पर्यायावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला हप्त्याची कालावधी, रक्कम टाकून फॉर्म सबमिट करा. आता पडताळणी करून तुम्हाला कर्ज देण्यात येईल. My loan या पर्यायावर जाऊन तुम्ही तुमच्या कर्जाची स्थितीही तपासू शकता.

हे देखील वाचा Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

Rohit Sharma on T20 World Cup: T20 मध्ये मीच कर्णधार असणार; रोहितने या शब्दात साधला पांड्यावर निशाणा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.