Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएब घटस्फोटात खळबळजनक ट्विस्ट; पाहा काय म्हणाला शोएब मलिक..

0

Sania Mirza Shoaib Malik: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक (Shoaib Malik) या दोघांचा बारा वर्षानंतर घटस्फोट होऊन देखील अधिकृत घोषणा झालेली नाही. (Sania Mirza Shoaib Malik divorce) आता या घटस्फोटात नवीन ट्विस्ट आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘द मिर्झा मलिक शो’ या रिॲलिटी शोसाठी दोघांनी एकत्र कॉन्ट्रॅक्ट साइन केलं असल्यामुळे, हा शो संपेपर्यंत आपल्या घटस्फोटाची या दोघांनाही घोषणा करता येणार नसल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर, आता यात नवीन ट्विस्ट आला आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा या दोघांची ओळख ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. सानिया सोबत लग्न करण्यापूर्वी शोएब मलिकने आपलं पहिलं लग्न आयशा सिद्दिकी या हैदराबाद मधील तरुणीशी केलं होतं. या दोघांचा विवाह हैद्राबादमध्येच झाला होता. पुढे या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर, शोएब मलिकने 2010 ला सानिया मिर्झा सोबत आपली लग्न गाठ बांधली. दहा वर्षे या दोघांनी सुखाचा संसार केल्यानंतर, अखेर या दोघांचा घटस्फोट झाला. मात्र अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आता या प्रकरणाने नवीन मोड घेतल्याने, पुन्हा एकदा या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. एवढेच नाही, तर सानिया आणि शोएब मलिकच्या नातेवाईकांनीच दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती दिली होती. असं देखील पाकिस्तान मीडियाने स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झा हीने देखील आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट करताना हृदय तुटल्यानंतर कुठे जातं, अशी भावनिक पोस्ट केल्याने दोघांमध्ये सगळं काही अलबेल नाही, हे स्पष्ट झालं होतं.

दोघांचा घटस्फोट झाला असून देखील दोघांनी आपण वेगळे झाल्याचे अधिकृत घोषणा का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची घोषणा ही ‘द मिर्झा मलिक शो (the Mirza Malik show) या रियालिटी शोच्या contract मुळे थांबला असल्याचं सांगितलं गेलं. अनेकांनी या दोघांचा घटस्फोट हा एक PR स्टंट असल्याचं म्हटलं गेलं. ‘द मिर्झा मलिक या रियालिटी शो’च्या प्रमोशनसाठी या दोघांनी घटस्फोटाच्या अफवा पसरवल्या असल्याचं म्हटलं गेलं. आता या दोघांनी घटस्फोटाचा वापर ‘रियालिटी शो ‘ची प्रसिध्दी वाढवण्यासाठी केला असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

शोएब मलिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटचा बायो (Shoaib Malik Instagram bio) बदलल्याने, या घटनेला दुजोरा मिळाला आहे. शोएब मलिकने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये बदल करून त्याने लिहिले आहे, अॅथलीट, सुपरवुमनचा पती, असं हिहिताना त्याने सानियाला टॅग देखील केलं आहे. पुढे त्याने हिहीले आहे, मुलगा हाच माझा आशीर्वाद. त्याने आपल्या बायोमध्ये केलेला हा बदल पाहून अनेकांना शॉक लागला आहे. एकीकडे या दोघांचा घटस्फोट झाला असून, द मिर्झा मलिक या रिअल्टी शो नंतर दोघेही आपण वेगळं झालो आहोत, अशी घोषणा करतील असं म्हटलं होतं. मात्र आता त्याने आपल्या इंस्टाग्राम बायोमधे केलेल्या बदलामुळे या दोघांमध्ये काहीच बिनसलं नसल्याचं सिद्ध होत आहे.

पाकिस्तान अभिनेत्री आयशा उमर हिच्याशी जवळीक वाढल्यानंतर, शोएब मलिक आणि सानियामध्ये अंतर पडत गेल्याचं बोललं गेलं. सानिया आणि शोएब या दोघांचा घटस्फोट होण्यास आयुशा उमर हीच मुख्य कारण असल्याचं बोललं गेलं. मात्र आता शोएब मलिक याने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये केलेल्या बदलामुळे सानिया आणि शोएब यांच्यामध्ये सगळं काही अलबेल असल्याचं स्पष्ट होत आहे. या दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे की खरच घटस्फोट झाला आहे पाहण्यासाठी आता दोघांच्याही चाहत्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

हे देखील वाचा Sania Mirza Shoaib Malik divorce: ..म्हणून शोएब मलिकने सानियाला दिला डच्चू; घटस्फोटानंतर मुलगा कोणाकडे राहणार? वाचा सविस्तर..

Sanju Samson: आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून ऑफर आल्यानंतर अखेर संजूनेही घेतलाच निर्णय; म्हणाला मला..

Sanju Samson Ranji Trophy: संजू सॅमसनची पुन्हा वादळी खेळी, केवळ अकरा चेंडूत कुटल्या 58 धावा; पाहा व्हिडिओ..

Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Indian Railway Jobs: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये 2 हजार 521 जागांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Indian Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.