Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ‘ही’ सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

0

Chanakya Niti: अलीकडच्या काळात पैशाला (money) प्रचंड महत्त्व आलं असलं तरी देखील केवळ पैसा हाच यशस्वी जीवनासाठी पुरेसा आहे, असं अजिबात नाही. पैशा व्यतिरिक्त यशस्वी जीवनामध्ये (successful life) नातेसंबंधाला खूप महत्त्व आहे. आनंदी आणि यशस्वी (happiness and successful) जीवनाची कल्पना उत्तम नातेसंबंधाशिवाय करता येणं शक्य नाही. समाजात मान, प्रतिष्ठा, आदर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. चांगलं शिक्षण, संस्कार या चांगल्या गुणांच्या जोरावर तुम्हाला समाजामध्ये चांगली उंची प्राप्त होते. तुमची वर्तणूक हीच तुमच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. (Aacharya Chanakya quotes)

समाजामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कर्म करता, त्याच पद्धतीने तुम्हाला फळ देखील मिळत असतं. आचार्य चाणक्य सांगतात, माणसाने नेहमी अशा गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे, ज्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) सांगतात, चांगल्या सवयी माणसाला यशस्वी बनवतात. तर वाईट सवयी अयशस्वी बनवतात. पण अशा कोणत्या गोष्टीं आहेत, ज्या अंगीकारल्यामुळे तुमच्या बरोबरच तुमचं कुटुंब देखील उध्वस्त होऊ शकतं? आज आपण हेच या लेखात सविस्तर जाणून घेणारा आहोत.

मनुष्याचा एक वाईट गुण शंभर चांगल्या गुणांना बरबाद करतो. चाणक्य यांच्या मते, माणूस जेव्हा एखाद्या वेळी खोटे बोलतो, त्यावेळी त्याला खोटी बोललेली गोष्ट लपवण्यासाठी शंभर वेळा खोट्याचा आश्रय घ्यावा लागतो. एक गोष्ट खोटी बोलला तर तुम्हाला खोटं बोलण्याची सवय लागते. आणि तुम्ही बोललेल्या गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी तुम्हाला हजार वेळा खोटं बोलावं लागतं. असं आचार्य चाणक्य सांगतात. या गोष्टींमुळे तुमचा आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. गोष्ट खूप शुल्लक वाटत असली, तरी या गोष्टींमुळे तुमच्याबरोबर कुटुंब देखील उध्वस्त होऊ शकतं, असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, लबाडी आणि अप्रामाणिकपणा हा खूप सोपा मार्ग आहे. मात्र याचे परिणाम खूप गंभीर भोगावे लगतात. खोटे बोलून तुम्हाला क्षणाचा आनंद मिळू शकतो, मात्र तुम्ही उघडं पडल्यावर, तुम्हाला पश्चाताप तर, होतोच मात्र त्याचे परिणाम थेट तुमच्या कुटुंबावर होतात. एकदा का तुम्ही उघडे पडला, तर तुमच्यावर इतर लोकांचा सोडा, हृदयाच्या जवळची माणसं देखील विश्वास ठेवत नाहीत. अर्थात त्यामुळे तुमचं जगणं अशक्य होऊन जाऊ शकतं. असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, सत्य हे संपत्तीप्रमाणे असते. तुम्हाला आधी खर्च करावा लागतं, आणि मग आयुष्यभर त्याचा उपभोग घेता येतो. मात्र खोटं हे असं धन आहे, जे तुम्हाला क्षणिक सुख देते. मात्र त्याची परतफेड व्याजासह आयुष्यभर करावी लागते. आचार्य चाणक्य सांगतात, मनुष्याच्या मनात जेव्हा भीती आणि लोभ निर्माण होतो, अशा वेळेस मनुष्य खोटे बोलायला सुरुवात करतो. तो त्याच्या सोयीनुसार, सत्याला मुरड घालतो. मात्र असं केल्याने आयुष्यभर आनंदी राहू शकत नाही. आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर तुम्हाला सत्याचा मार्ग अवलंबावा लागेल.

हे देखील वाचा Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

Chanakya Niti: या चार गोष्टींमुळे आयुष्यातून निघून जाते लक्ष्मी; प्रचंड मेहनत करूनही मिळत नाही यश..

Indian Railway Jobs: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये 2 हजार 521 जागांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Indian Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज..

Chanakya Niti: जीवनात यश मिळवायचं असेल तर हा स्वभाव जाळून टाका..

Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..

most searched people in 2022: भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली दहा नावं जाणून तुम्हीही व्हाल चकित..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.