Chanakya Niti: जीवनात यश मिळवायचं असेल तर हा स्वभाव जाळून टाका..

0

Chanakya Niti: आयुष्यामध्ये (Life) प्रत्येकाला आपण यशस्वी (successful) व्हावं, असं वाटत असतं. मात्र प्रत्येकाला हे शक्य होत नाही. अनेकांना त्यांचा स्वभाव अडचण ठरतो. अनेकांना प्रश्न पडला असेल, यशस्वी होण्यासाठी माणसाचा स्वभाव कसा काय अडथळा निर्माण करू शकतो? आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांच्या नीतिशास्त्रमध्ये (Ethics) या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. चाणक्य आचार्य यांनी सांगितलेल्या नीतीशास्त्रामध्ये यशस्वी होण्यासाठी मनुष्याने काय करणे आवश्यक आहे? याविषयी देखील सविस्तर सांगण्यात आले आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाऊन घेणार आहोत.

जीवनामध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या मार्गाचे जर तुम्ही पालन केले, तर तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या असंख्य समस्या तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकता. उत्तम आणि यशस्वी आयुष्य जगू शकता. जीवनामध्ये प्रवास करताना अनेक खडतर आव्हानं येतात. मात्र संकट आल्यानंतर, आपण नकारात्मक होतो. संकट आल्यानंतर, मनुष्याने काय करणे आवश्यक आहे कोणता स्वभाव अंगिकरू नये, याविषयी आचार्य चाणक्य यांनी काही नीतीशास्त्राचा मार्ग सांगितला आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक आव्हानांचा सामना करून यशस्वी होऊ शकतात.

मनुष्याचे वागणं हेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. तुम्ही ज्याप्रमाणे वागता आपल्या वर्तन करता, त्याच पद्धतीने तुम्हाला त्याचे परिणाम देखील भोगावे लागतात. जीवनामध्ये अनेकांना समस्या येत असतात. मात्र समस्याचा सर्वात जास्त त्रास कोणत्या लोकांना होतो, हे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. संकट आल्यानंतर, तेवढ्याच आक्रमकपणे तुम्ही सामोरे जाण आवश्यक असतं. साध्या आणि सरळ स्वभाव असणाऱ्या लोकांना संकटाचा अधिक सामना करावा लागतो, असं आचार्य चाणक्य सांगतात.

तुम्ही दयावान आणि प्रेमळ असणं चांगलं आहे. मात्र तुमचा साधा आणि सरळ स्वभावाचा समाजात अनेक जण गैरफायदा घेऊ शकतात. साध्या आणि सरळ स्वभावाच्या व्यक्तीची तुलना आचार्य चाणक्य यांनी सरळ उभा राहणाऱ्या झाडांबरोबर केली आहे. आचार्य चाणक्य यांच्यामध्ये सरळ झाडे तोडण्यास सोपे जाते. सरळ झाडांना तोडण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत नाही. अर्थात यामुळे अनेकजण वाकडी झाडे तोडण्याऐवजी सरळ झाडावरच घाला घालतात. मनुष्याबाबत देखील असंच आहे. असं आचार्य चाणक्य सांगतात.

चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार जो माणूस जास्त भोळा असतो, तो समाजामध्ये खूप कमकुवत समजला जातो. एवढेंच नाही, तर आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, अशा मनुष्यांच्या स्वभावाची तुलना थेट मूर्खांच्या यादीत केली आहे. चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, वाईट काळामध्ये जर तुम्ही आपला मूळ स्वभाव सोडला नाही, तर तुम्हाला अनेक संकटे येतात. आलेला संकटातून देखील तुम्हाला बाहेर पडण्यासाठी खूप त्रास होतो. त्यामुळे तुमचा मूळ स्वभाव तुम्ही सोडून आपल्याला संकटाचा सामना कशा पद्धतीने करता येईल, त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं आचार्य चाणक्य सांगतात.

मनुष्याने आपल्या जीवनामध्ये ध्येय प्राप्त करण्यासाठी आपला मूळ स्वभाव बाजूला ठेवला तरी देखील त्यात काही गैर नाही. या स्वार्थी जगामध्ये तुम्ही तेव्हाच स्वतःला सुरक्षित ठेवू शकता, जेव्हा तुम्ही हुशारीने, कुशलतेने आपलं आयुष्य जगता. आचार्य चाणक्य सांगतात, लोकांना त्रास न होता तुम्ही तुमचं आयुष्य हुशारीने आणि कुशील तिने जगत असाल, तर यात काही गैर नाही. लोकांना त्रास न होता, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त करण्यासाठी काहीही करू शकता. यात काहीही चूक नाही, असं देखील आचार्य चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा Chanakya Niti: पत्नी नेहमी पतीपासून या 3 गोष्टी लपवून ठेवते, त्यातली दुसरी आहे खूपच धोकादादक..

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

YouTube First Video: यूट्यूब वरील सर्वात पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला का? त्या व्हिडिओने कमावलेत एवढे..

Ration Card: रेशन घेतल्याचा SMS तुम्हाला येतो का? SMS द्वारे कळतंय दरमहा किती रेशन घेतले, जाणून घ्या लगेच..

Urea Subsidy: युरिया खरेदीची चिंता मिटली; सरकार देतय 2,700 रुपये अनुदान, असा घ्या लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.