Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

0

Chanakya Niti: बऱ्याचदा लग्नानंतर काही दिवसातच पुरुष दुसऱ्या स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतात. लग्नाआधी एकमेकांना सगळं काही व्यवस्थित वाटत असते. बऱ्याचदा लग्ना अगोदर एकमेकांचा स्वभाव आपल्याला माहिती नसतो. परंतु लग्न झाल्यावर आपल्याला एकमेकांचा स्वभाव समजायला लागतो. बरीचशी जोडपी लग्न झाल्यावर गुण्यागोविंदाने संसार करायला सुरुवात करतात. (Chanakya Niti)

 

बऱ्याच जोडप्यांना लग्न झाल्यानंतर आपण आनंदाने संसार करताना पाहिले असेल. तर काही पती पत्नी यांच्यामध्ये बऱ्याचदा समजुतदारपणाचा अभाव असतो. आपल्या पत्नीला समजून घेणे हे प्रत्येक पुरुषाचे काम असते आणि तेवढेच पत्नीचे देखील असते. हे तुम्हाला जमले तरच संसार सुखाचा होत असतो. त्यामुळे नात्यात समजूतदारपणा अत्यंत गरजेचा आहे.

 

 

आर्य चाणक्यांनी (Chanakya Niti) नीतिशास्त्रामध्ये (Ethics) धर्म, पैसा, काम, मोक्ष, परिवार, समाज यासह विषयांवर नियम दिले आहेत. चाणक्यांनी दिलेले बरेचसे नियम आजच्या काळामध्ये तंतोतंत लागू होत आहेत. पती पत्नीच्या नात्यावर देखील आर्य चाणक्यांनी सांगितले आहे की, पतीचा आपल्या स्त्रीपासून निराशाभंग कशामुळे होतो? आणि पती आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर स्त्रियांकडे का आकर्षित होतो? याबद्दल चाणक्यांनी लिहिले (Chanakya Niti) आहे. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.

 

लग्नाअगोदर स्त्री आणि पुरुष यांना एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असणे, हे स्वाभाविक आहे. लग्न झाल्यानंतर देखील पती आणि पत्नीला इतर कोणाबद्दल आकर्षण वाटत असणं ही सामान्य गोष्ट आहे. हे जरी चुकीचे नसले तरीदेखील एखाद्या बद्दल वाटत असलेले हेच आकर्षण कौतुकाच्या पलीकडे गेले की, नवीन नात्याचा जन्म होतो. या नव्या नात्याला आपल्या समाजामध्ये मान्यता नाही. अशा नवीन नात्यामुळे जुने प्रेमसंबंध आणि लग्न मोडण्याची शक्यता असते.

 

एकमेकांचा आदर राखून न बोलणे: लग्न होण्या अगोदर आणि लग्न झाल्यावर काही महिने पती आणि पत्नीच्या नात्यात खूप गोडवा असतो. बऱ्याचदा पती आणि पत्नी या काळात एकमेकांना समजून घेत असतात. एकमेकांशी प्रेमाने बोलत असतात. परंतु जसे जसे दिवस पुढे जातील, त्यावेळी या नात्यात कटुता यायला सुरुवात होते. नात्यातली गोडी संपत जाते. एकमेकांसोबत वाद व्हायला सुरुवात होते. या वादामुळे एकमेकांबद्दल कटुता निर्माण व्हायला लागते. यामुळे पती पत्नीच्या नात्यात कटुता निर्माण होते.

 

एकमेकांबद्दल आकर्षण कमी होणे: बऱ्याच वेळा लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी दोघे एकमेकांची स्तुती करत असतात. एकमेकांचे कौतुक करत असतात. तसेच एकमेकांची खूप आपुलकीने विचारपूस करत असतात. लग्न झाल्या झाल्या पत्नीने केलेला स्वयंपाक आवडला नाही, तरी पती तिचे कौतुक करतो. परंतु कालांतराने स्वयंपाकात थोडी चूक झाली असेल तरी तिच्यावर ओरडते. तसेच पत्नी देखील सुरुवातीला पतीच्या छोट्या छोट्या चुका समजून घेत असते. परंतु नंतरच्या काळात पत्नी देखील छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करायला सुरुवात करते. त्यामुळे एकमेकांबद्दल आकर्षण कमी होते.

 

पती आणि पत्नीच्या नात्यात विश्वासाला खूप मोठे स्थान असते. कारण कुठलेही नात हे विश्वासावर चालत असते. त्यामुळे नात्यात विश्वास असणे खूप महत्वाचे आहे. नात्यातील विश्वास टिकवणे दोघांवर अवलंबून आहे. विश्वास टिकवण्याची जबाबदारी पती आणि पत्नीची आहे. कारण पती आणि पत्नीचा एकमेकांवरचा विश्वासच संपुष्टात आला तर मग नात्यात काहीच चव रहात नाही. त्यामुळे नाते संपुष्टात येऊ शकते.

 

कौटुंबिक जबाबदारी : जेव्हा बाळ जन्माला येते, त्याचे संगोपन करण्यासाठी पत्नी जास्त वेळ बाळासोबत घालवत असते, तशी गरज देखील असते. परंतु बाळ जन्मल्यानंतर बऱ्याचदा रात्री देखील ते लवकर झोपत नाही. बरीचशी लहान मुले सतत रडत असतात. त्यांच्या या गोष्टीमध्ये स्त्रियांचा खूप वेळ जात असतो. तशाच त्यामुळे त्या चिडचीड देखील करतात. त्यामुळे कधी कधी वाद देखील होतो. त्यानंतर मुले जशी जशी मोठी होत जातात, तसे दोघं पण बऱ्याचदा व्यस्त असतात.

 

त्यामुळे बऱ्याचदा पती आणि पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. तसेच मुल जन्मल्यानंतर नात्यातला रोमान्स देखील काहीसा कमी होतो. त्यामुळे बरेच पुरुष बाहेर सबंध प्रस्थापित करायचा प्रयत्न करतात. यामुळे तर पुढे नात्यात बरच काही घडते.

हेही वाचा: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Bajaj ची ही जबरदस्त बाईक मोबाईल पेक्षा स्वस्त, 100 किमी मायलेज; एवढंच नव्हे तर..

balance between wife and mother: पत्नी आणि आईचे भांडण होत असेल तर करा हे काम; आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही भांडण.. 

Marriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर.. 

Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.