Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार

0

Maruti Suzuki CNG Cars: भारतात वेगवेगळ्या कंपन्यांच्या सीएनजी कार (CNG Cars) विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साधारणपणे 20 पेक्षा अधिक सीएनजी कार्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. परंतु 7 सीटर CNG कार्स खूपच कमी आहेत. त्यामानाने 5 सीटर CNG कार्सची संख्या भरपूर आहे. जर संपूर्ण कुटुंबासाठी कार घ्यायची असेल तर मग 7 सीटर CNG कार घेणे कधीही सोयीस्कर राहते. परंतु 7 सीटर CNG कार्स खूपच कमी आहेत. (Maruti Suzuki CNG Cars)

 

परंतु आपण आता जबरदस्त अशा दोन 6/7 सीटर सीएनजी (CNG) कारबद्दल जाणून घेणार आहोत. मारुती सुझुकी कंपनीच्या एर्टिगा सीएनजी (Maruti Suzuki Ertiga CNG) आणि एक्सएल 6 सीएनजी (XL6 CNG) या दोन (Maruti Suzuki CNG Cars) जबरदस्त स्वस्तात मस्त कार बद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. या दोन्ही CNG कार्स खूपच जबरस्त आहेत. त्याशिवाय या कार मध्ये संपूर्ण कुटुंब घेऊन तुम्ही फिरायला जावू शकता.

 

मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) ही 15 लाख रुपयांपेक्षा कमी बजेट असलेली सर्वात आरामदायी (लक्झरी) आणि प्रॅक्टिकल मल्टी पर्पज वाहन आहे. या कारला CNG मध्ये 1.5L ड्युअलजेट (Dual Jet) पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सीएनजी (CNG) मोडमध्ये 87bhp पीक पॉवर आणि 121.5Nm टॉर्क आउटपुट जनरेट करण्यास सक्षम आहे.

 

या कारमध्ये चार एअरबॅग्स (Airbags) देण्यात आल्या आहेत. तसेच सुझुकी कनेक्ट हे फीचर देखील या कारमध्ये देण्यात आले आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कारचे लोकेशन ट्रॅक करू शकता. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही सेट केलेल्या स्पीडच्या पुढे कारचे स्पीड गेल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर याबाबत अलर्ट मिळतो.

 

Maruti Suzuki Ertiga कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर MPV CNG सह 26.11 किमी प्रति किलो एवढे मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे मायलेजच्या बाबतीत ही कार खूपच जबरदस्त आहे. त्यामुळे या कारचा प्रवास सुखकर आणि कमी खर्चिक आहे.

 

एर्टिगाच्या किमतीबाबत बोलायचे झाले तर CNG ची किंमत बेस मॉडेल VXi व्हेरिअंटची किंमत 10.44 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. तर ZXi CNG व्हेरिअंट कारची एक्स शोरुम किंमत 11.54 लाख रुपयांपासून सुरू होते.

 

मारुती XL6 (Maruti XL6) ही भारतीय बाजारपेठेतील एर्टिगाची प्रीमिअम व्हेरिअंट कार आहे. ही कार देखील दिसायला खूपच देखणी आहे. ही कार तुम्हाला वेगवेगळ्या कलर्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सा ब्लू (Nexa Blue), Opulent Red (ओपुलेंट रेड), ब्रेव खाकी (Brave Khaki), ग्रॅण्ड्यूअर ग्रे (Grandeur Grey), स्पलेंडीड सिल्वर (Splendid Silver), आर्क्टिक व्हाईट (Arctic White), Oppulent red with Midnight Black Roof, Brave Khaki with Midnight Black Roof, splendid silver with Midnight Black Roof या वेगवेगळ्या कलर्स मध्ये ही कार उपलब्ध आहे.

 

Maruti XL6 ही कार 6 सीटर (6 Sitter) कार आहे. ही कारचा प्रवास खूपच आरामदायक आहे. या कार मध्ये भरपूर फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये अनेक अपडेट्सही देण्यात आले आहेत. या कारमध्ये व्हेंटिलेटेड सिट्स देण्यात आली आहेत. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देखील देण्यात आली आहे.

 

जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Maruti Suzuki XL6 CNG ही कार तुमच्यासाठी एक पर्याय आहे. XL6 CNG मध्ये असलेले इंजिन Ertiga CNG च्या इंजिन सारखेच आहे. XL6 फक्त 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहे.

 

XL6 कारचे मायलेज देखील 26.32 किमी/ प्रति किलो एवढे आहे. ही कार एंट्री-लेव्हल Zeta व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून मारुती XL6 CNG ची एक्स शोरुम किंमत रु. 12.24 लाख आहे.

हेही वाचा: Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह.

Health Benefits of Sex: शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..

Yuzvendra Chahal: शिखर धवनने धनश्री वर्माचं सिक्रेट पकडलं रंगेहाथ; चहल बिचारा खाली मान घालून गेला निघून..

MS Dhoni Hardik Pandya dance video: महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, साक्षीचा खतरनाक डान्स पाहून म्हणाल हे तर फुल टल्ली झालेत..

Tips To Reduce Electricity Bill: वीजबिल येणार अर्ध्यावर, फक्त बसवा उपकरण बसवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.