Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह

0

Bajaj Bike: भारतीय बाजारात दोन चाकी वाहनांमध्ये मायलेज आणि डिझाईन वरून खूपच स्पर्धा आहे. बऱ्याच कंपन्या उत्तम मायलेजसह चांगल्या डिझाईन गाड्या बाजारात लॉन्च करत आहेत, जेणेकरून त्यांच्या गाड्यांना ग्राहकांमध्ये प्रचंड मागणी राहील. टू व्हीलर निर्माता बजाज (Bajaj) कंपनी देखील या स्पर्धेत आहे. बजाज देखील नेहमी उत्तम मायलेज असणाऱ्या आणि चांगल्या डिझाईन गाड्या बाजारात लॉन्च करत असते.

 

बजाजने (Bajaj) नवीन लॉन्च केलेल्या टू व्हीलर बाईकने उत्तम मायलेज आणि चांगल्या डिझाईनमुळे बाजारातील इतर कंपन्यांच्या बाईकला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारण ही बाईक खूपच जबरदस्त मायलेज देत आहे. तसेच दिसायला देखील ही बाईक खूपच देखणी आहे. आपण ज्या बाईक बद्दल बोलत आहोत, ती आहे बजाज (Bajaj) CT 125X. बजाजने ही बाईक उत्तम मायलेज आणि शानदार अशी बाईक बनवली आहे.

 

गाडीच्या इंजिन आणि वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया:

बजाजने CT 125X बाईकला 125 CC DTS- i इंजिन दिले आहे. हे खूप दमदार आणि ताकदवान असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यासह कंपनीने Bajaj CT 125X कुठल्याही भूभागावर चालण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. तसेच इंजिनला उत्कृष्ठ संरक्षण दिले असल्याचे देखील कंपनीने सांगितले आहे. खडबडीत रस्त्यावर इंजिनला सुरक्षित ठेवण्यासाठी बेली पॅन देण्यात आले आहेत. तसेच मजबूत क्रॅश गार्ड देण्यात आले आहेत. रोड कसाही असला तरी सुरक्षित राईड साठी हे क्रॅश गार्ड काम करणार आहेत.

 

कुठल्याही आणि कसल्याची रस्त्यावरून दुचाकी चालवत असताना टायर पंक्चर होण्याची भीती असते. त्यासाठी या बाईकमध्ये तुम्हाला ट्युबलेस टायर्स देण्यात आले आहेत. जेणेकरून कुठल्याही आणि कसल्याही रस्त्यावरून गाडी चालवत असताना तुम्हाला गाडी पंक्चर होण्याची समस्या त्रास देणार नाही. त्यामुळे हे देखील या दुचाकीचे वैशिष्ट्य आहे. हेही वाचा: Electric Scooter: Flipkart वरून १२ हजारांत खरेदी करू शकता ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

 

पुढचे जे सस्पेंशन असते, त्याला धुळीपासून वाचवण्यासाठी सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच कंपनीने तुमची अजून एक महत्वाची काळजी घेतली आहे. ती म्हणजे आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. बऱ्याचदा आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन होते आणि आपली बरीच काम अडखळतात. हीच समस्या जाणून कंपनीने गाडीला मोबाईल चार्ज करण्यासाठी USB पोर्ट दिले आहे. जेणेकरून लांबच्या प्रवासाला गेल्यावर तुमची अडचण होणार नाही.

 

तसेच गाडीवर प्रवास करताना आरामदायी वाटण्यासाठी कंपनीने विशेष काळजी घेतली आहे. ती म्हणजे आरामदायी आसन व्यवस्था कंपनीने दिली आहे. बाईक चालवणाऱ्यासाठी आणि पाठीमागे बसलेल्या दोघांसाठी देखील कंपनीने उत्तम आसन व्यवस्था दिली आहे. ही आसन व्यवस्था रस्ता कसाही असला तरीदेखील तुम्हाला आराम मिळवून देईल. जर गाडीच्या कॅरेज बद्दल बोलायचे झाले तर मोठ्या आणि जड वस्तू ठेवण्यासाठी मजबूत असे कॅरेज कंपनीने दिले आहे.

 

बजाजने या बाईकला ॲडव्हान्स वैशिष्ट्यांसह बनवले आहे. या दुचाकीचे सीट मोठे असल्यामुळे प्रवास करताना आराम वाटतो. तसेच बाइकचे हेडलाईट हॅलोजनवाले आहेत. तसेच या बाईकला अलॉई चाक देण्यात आले आहे, जे की मजबूत समजले जाते. तसेच वेगवेगळ्या रंगामध्ये ही बाईक तुम्हाला उपलब्ध आहे. तसेच गाडी ड्रम आणि डिस्क ब्रेक अशा दोन्ही प्रकारात खरेदी केली जाऊ शकते. तसेच पेट्रोलच्या टाकीची क्षमता 11 लिटर एवढी आहे.

 

या गाडीला 4 स्ट्रोक इंजिन आहे. इंजिन पॉवर 8HP चे आहे आणि 8.34 Nm चा टॉर्च जनरेट करतात. दुचाकीला एनालॉग स्पीडोमीटर देण्यात आला आहे. तसेच या दुचाकीचा 90 किलोमीटर प्रति तास एवढा उच्चतम वेग देण्यात आला आहे. तसेच बाईक मधील सर्वात महत्वाची आणि सध्याच्या काळात खर्चात बचत करणारी गोष्ट म्हणजे मायलेज. तर या दुचाकीला 90 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज आहे. याच खास वैशिष्ट्यामुळे बाईकला सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच पसंती असल्याचे पाहायला मिळते. तसेच या दुचाकीला 4 गियर बॉक्स देण्यात आला आहे.

 

या बाईकची एक्स शोरुम किंमत 74,682 रुपये एवढी आहे. गाडीची किंमत राज्य आणि शहरानुसार बदलू शकते. जर तुम्हाला ही दुचाकी घ्यायची असेल तर तुम्ही फायनान्स देखील करू शकता. तुम्ही कर्जावर बाईक घेऊन सुलभ हप्त्यांसह कर्जाची परतफेड करू शकता. तसेच जुनी दुचाकी एक्सचेंज देखील करू शकता. जुन्या गाडीची किंमत शोरुम ठरवेल आणि ती रक्कम तुमच्या नव्या गाडीतून वजा केली जाईल.

हेही वाचा: UPI Payment करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी.. 

Cristiano Ronaldo Ban: रोनाल्डो चाहत्याशी असा वागलाय, ज्यामुळे त्याची सामन्यातून हकालपट्टी आणि भलामोठा दंड 

INDvsNZ: किरकोळ कारणावरून भारतीय खेळाडूंनी उमरान मलिकला केलेल्या मारहाणीमुळे खळबळ; BCCI ची कारवाई पाहा व्हिडिओ.. 

Bollywood: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने उरकला लग्नसोहळा, चाहत्यांना धक्का; फोटो व्हायरल.. 

Pornography Case: राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लीनने  बनवले अश्लील व्हिडीओ; व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.