Cristiano Ronaldo Ban: रोनाल्डो चाहत्याशी असा वागलाय, ज्यामुळे त्याची सामन्यातून हकालपट्टी आणि भलामोठा दंड

0

Cristiano Ronaldo Ban: दिग्गज फुटबॉलपटू आणि मँचेस्टर युनायटेडचा माजी खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या त्याच्यासोबत असा वागला आहे, की ज्याच्यामुळे रोनाल्डोची सामन्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एका चाहत्याचा मोबाईल फोडणे खूपच महागात पडले आहे. 2022 च्या सुरुवातीला एव्हर्टन येथे त्याने त्याच्या चाहत्याचा चाहत्याच्या हातून मोबाईल हिसकावून तो फोडला होता. या त्याच्या वागण्यामुळे रोनाल्डोवर (Cristiano Ronaldo Ban) कारवाई करत फुटबॉल असोसिएशनने त्याला दंड ठोठावला आहे. यासह त्याला आगामी दोन सामने देखील खेळता येणार नाहीत.

 

रोनाल्डोने नुकताच मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपवला आहे. याची माहिती देताना मँचेस्टर युनायटेड क्लबने मंगळवारी सांगितले की, दोन्ही बाजूने संमतीने मुदतीपूर्वीच हा करार रद्द केला आहे.

 

9 एप्रिल 2022 रोजी, रोनाल्डोचा संघ गुडिसन पार्क येथे एव्हर्टनकडून 1-0 ने पराभूत झाला होता. या सामन्यानंतर रोनाल्डो मैदानाबाहेर आला तेव्हा एक चाहता त्याचा व्हिडिओ बनवत होता. रोनाल्डो संघाच्या पराभवामुळे खूपच संतापलेला होता, त्याला हे आवडले नाही.  त्याने त्याच्या चाहत्याचा  मोबाईल चाहत्याच्या हातून  हिसकावून घेतला आणि फोडला. या प्रकरणामुळे एफएने त्याच्यावर आक्षपार्ह वर्तन केल्याचा आरोपही ठेवला आहे. एका समितीने रोनाल्डोवर दोन सामन्यांसाठी बंदी (Cristiano Ronaldo Ban) घातली आहे त्यासह त्याला दंडही ठोठावला आहे.

 

 

क्रिस्तियानो रोनाल्डोनेही  आपले वर्तन अयोग्य असल्याचे कबूल केले. परंतु ही बंदी (Cristiano Ronaldo Ban) विश्वचषक स्पर्धेला लागू होणार नाही आणि जेव्हा तो कोणत्याही देशाचा विचार न करता एखाद्या क्लबमध्ये सामील होईल, तेव्हा त्याच्यावर ही बंदी लागणार आहे. मग तो त्यावेळी कुठल्याही देशाकडून खेळत असला तरीदेखील त्यावर बंदी  लागणार आहे.

 

या घटनेनंतर रोनाल्डोने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जाहीर माफी देखील मागितली होती. “आम्ही सध्या कठीण प्रसंगाचा सामना करत आहोत. या काळात भावनांना सामोरे जाणे अवघड असते. तरीसुद्धा आम्हाला  नेहमीच सन्मानपूर्वक आणि संयमी राहिले पाहिजे आणि फुटबॉल खेळावर प्रेम करणार्‍या सर्वांसमोर एक उदाहरण ठेवले पाहिजे. मला माझ्या चुकीबद्दल माफी मागायची आहे आणि शक्य असल्यास, मी त्या चाहत्याला ओल्ड ट्रॅफर्ड येथे सामना पाहण्यासाठी निमंत्रित करतो, हे योग्य खेळाचे आणि खिलाडूवृत्तीचे लक्षण आहे.”

 

रोनाल्डोने त्याच्यावर केलेले आरोप मान्य केले, परंतु निलंबन टाळण्यासाठी वैयक्तिक सुनावणीची विनंती केली. 8 नोव्हेंबर रोजी सुनावणीवेळी रोनाल्डोने सांगितले की, त्याच्या शारीरिक सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याच्या काळजीपोटी त्याने असे केले आहे.  एव्हर्टनचे चाहते मैदानावर जमले होते, त्यामुळे त्यांना मैदान सोडावे लागले. रोनाल्डोने केलेले दावे फेटाळताना, पॅनेलने म्हटले की ते “हे वर्तन शारीरिक सुरक्षितेसाठी किंवा आरोग्याच्या काळजीपोटी केले नव्हते तर निराशा आणि चीडचिडे पणामुळे झाले होते.”

 

रोनाल्डोवर तीन सामन्यांची बंदी (Cristiano Ronaldo Ban) घालण्याची एफएची विनंतीही पॅनेलने फेटाळली.पोर्तुगीज सुपरस्टार सध्या कतारमध्ये 2022 FIFA विश्वचषक स्पर्धेत भाग घेत आहे, जिथे त्याचा संघ घानाविरुद्ध आपली मोहीम उघडेल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.