Bollywood: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने उरकला लग्नसोहळा, चाहत्यांना धक्का; फोटो व्हायरल..

0

Bollywood: टॉलिवूडच (Tollywood) नव्हे तर संपूर्ण बॉलिवूडमध्ये (Bollywood) देखील आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हे दोघेही सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतात. त्या दोघांचा पहिला चित्रपट 2018 मध्ये गीत गोविंदम हा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये डियर कॉम्रेड हा चित्रपट प्रदर्शित झाला. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा पहिल्यांदा एकमेकांना गीता गोविंदम या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.

 

गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या दोन्ही चित्रपटांतील दोघांची ऑन-स्क्रीन मैत्री आणि केमिस्ट्री अनेकांना आवडली होती. तेव्हापासून त्यांच्यात काहीतरी आहे, असे बोलले जाते. त्यांच्या चाहत्यांना देखील अशा आहे की, ही जोडी कायमस्वरूपी एकत्र राहावी. विजय आणि रश्मीका या दोघांचे लग्न व्हावे असे त्यांना वाटते. रश्मिका आणि विजय प्रेमात असल्याच्या अनेक बातम्या वारंवार समोर आल्या होत्या. काही लोकांनी रश्मीका आणि कन्नड दिग्दर्शक अभिनेता रक्षित शेट्टीसोबतच्या ब्रेकअपसाठी विजयला जबाबदार धरले होते.

 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रश्मीका म्हणाली होती की, रक्षित शेट्टी सोबत ब्रेकअप झाल्यानंतर विजयनेच मला सावरले होते. रक्षित शेट्टी सोबत झालेल्या ब्रेकअप मधून मला मोकळीक आणि काळजी करणारा कोणतरी हवे होते. ते मला विजयमध्ये सापडले. तसेच मी माझ्या मनातील भावनांना तोंड देण्यासाठी धडपड करत होते, त्यावेळी विजयने मला सावरले आणि माझ्यात ऊर्जा निर्माण केली. त्यानेच मला जाणीव करून दिली की, बाहेर एक वेगळंच जग आहे, ते तुला मिठीत घेण्याची वाट पहात आहे. असे देखील रश्मिका म्हणाली.

 

चित्रपटांमध्ये एकत्रित काम केल्यामुळे ही जोडी लोकप्रिय झालीच. रश्मिकाची तर नॅशनल क्रश म्हणून देशभर ओळख झाली आहे. संपूर्ण देशभरात रश्मिकाचे चाहते आहेत. तिच्या एका स्माइलवर चाहते फिदा आहेत. रश्मीका आणि विजय या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच शिजतंय, अशी शंका त्यांच्या चाहत्यांना आहे. हे दोघेही जाहीरपणे याला नकार देतात. आपल्यात असे काहीही नसल्याचे ते वारंवार सांगतात.  हेही वाचा: Breast Personality: स्तनाचा आकार सांगतो महिलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सर्व काही; अशा आकाराच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात वरदान..

 

आता तर सोशल मीडियावर (Social Media) थेट दोघांच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. विजयने आणि रश्मिकाने गुपचूप लग्न केले अशी चर्चा होताना सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हेही वाचा: Disha Patani Viral Video: ब्रेकअप नंतर दिशा पटानीने नव्या बॉयफ्रेंड सोबत उघडपणे केली अंघोळ; व्हिडिओ लीक झाल्याने उडाली खळबळ..

 

रश्मिका आणि विजयची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कायमस्वरूपी ऑफस्क्रीन व्हावी अशी त्यांच्या अनेक चाहत्यांची इच्छा आहे. त्यांच्या फोटोंवर तशा कमेंट्स देखील वारंवार पाहायला मिळतात. त्या दोघांच्या लग्नाचा व्हायरल होत असलेला फोटोवर एका चाहत्याने म्हटलंय हा फोटो सत्यात उतरावा. तर एकाने ही एडिटिंग सुद्धा खऱ्या आयुष्यात सत्यात उतरावी, अशा कमेंट त्यांच्या फोटोवर पाहायला मिळत आहेत. अर्थात तो विजय आणि रश्मीका यांच्या लग्नाचा व्हायरल होत असलेला फोटो हा मॉर्फ केलेला फोटो आहे. हा फोटो त्यांच्या चाहत्यांनी एडिट केला आहे.

 

यापूर्वी कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये विजयने त्याच्या आणि रश्मिकाच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. तो म्हणाला की, “आम्ही एकत्रित 2 चित्रपट केले आहेत आणि ती खूपच प्रिय आहे. तसेच मला तिची खूप आवड आहे. रश्मीका माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आम्ही चित्रपटांमधून यश अपयशाचे चढ उतार पाहिले आहेत. आमच्यात एक बाँड तयार झाला आहे. चित्रपटांमध्ये काम करत असताना तुम्हाला खूप लवकर जवळ केले जाते आणि त्यामुळे एक मैत्रीचा धागा लवकर विकसित होतो. अशा प्रकारे विजयने रश्मीका आणि त्याच्या नात्यावर स्पष्टीकरण दिले होते. हेही वाचा:Good News: रिव्ह्यू वाचून तुम्हीही खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, सरकारने उचलले मोठे पाऊल..

 

रश्मिका मंदावना देखील लवकरच अल्लू अर्जुन चा बहुप्रतिक्षित चित्रपटात पुष्पा 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. पुष्पा चित्रपटांमध्ये देखील दोन्ही अभिनेत्यांसोबत काम करताना रश्मिकाने आपल्या अभिनयाची दर्जेदार छाप पाडली होती. पुष्पा 2 मध्ये देखील रश्मिकाचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळणार यात कसलीही शंका नाही. येणाऱ्या काळात रश्मिका मिशन मजनू, एनिमल आणि वरिसू या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मिशन मजनू या आगामी चित्रपटामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत अभिनय (Bollywood) करताना पाहायला मिळणार आहे. तसेच एनिमल चित्रपटात ती रणबिर कपूर, अनिल कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्यासोबत अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. तर वरिसू चित्रपटात ती थलापती विजय याच्या सोबत काम करताना पाहायला मिळणार आहे.

 

विजयने देखील लायगर मधून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले होते. परंतु विजयच्या या पहिल्या बॉलीवूड चित्रपटाला यश मिळाले नाही. विजय आगामी चित्रपट जनगणमन मध्ये पाहायला मिळणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग चालू होणार आहे. तसेच येत्या 23 डिसेंबरला विजयचा रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘खुशी’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात समंथा रूथ प्रभू देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: Breast Personality: स्तनाचा आकार सांगतो महिलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सर्व काही; अशा आकाराच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात वरदान..

Disha Patani Viral Video: ब्रेकअप नंतर दिशा पटानीने नव्या बॉयफ्रेंड सोबत उघडपणे केली अंघोळ; व्हिडिओ लीक झाल्याने उडाली खळबळ.. 

Bullet Stunt Video: बायको पाठीमागे सीटवर, अन् हा गडी बुलेटवर चक्क उभा राहिला; पुढे काय झालं पाहा आता तुम्हीच.. 

Pan Card: लागलीच करा हे काम, अन्यथा पॅन कार्डतर होईल बाद परंतु..; वाचा आयकर विभागाचा नवा नियम..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.