Health Benefits of Sex: शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..
Health Benefits of Sex सेक्स (Sex) हा फक्त नात्यांमध्ये (relationship) समाधान (satisfaction) आनंद (happiness) गोडवा (sweetness) टिकवण्याचं काम करतो असं नाही. तर सेक्समुळे माणसाचे आरोग्य देखील निरोगी राहते. (Sex also keeps a person’s health healthy) अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खरं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये सेक्सला खूप मोठ्या कालावधीसाठी खंड पडला असेल, तर तुम्हाला जीवघेण्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नात्याचा ओलावा आणि प्रेमाचा बहर फुलवत ठेवण्याचं काम सेक्स करतो. त्याच पद्धतीने नियमित सेक्स आपले आरोग्य निरोगी ठेवणेच काम देखील सेक्स करतो.
काही विषयांवर आजही आपल्याकडे उघडपणे बोललं जात नाही. सेक्स हा त्यापैकीच एक विषय. सेक्स विषयी अनेकांमध्ये समज गैरसमज दूर होणे खूप गरजेचे आहे. मानवी जीवनामध्ये सेक्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेक्स तुमच्या नात्यांमध्ये नेहमी ओलावा कायम ठेवण्याचे काम करतो. याशिवाय जर तुम्ही नियमितपणे सेक्स करत असाल, तर तुमचे आरोग्य देखील निरोगी राहते. आज आपण सेक्समध्ये खूप मोठा खंड पडला, तर त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात? निरोगी आरोग्यासाठी आठवड्यातून किती वेळा सेक्स कारणे फायदेशीर आहे? याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
हृदयावर परिणाम (Heart problems)
नियमित से क्स करणं (regular sex benefits) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा सेक्स करणाऱ्या व्यक्तींना हृदयाच्या समस्या जाणवत नसल्याचं समोर आलं आहे. नियमित सेक्स केल्यामुळे मानवाचा तणाव नाहीसा होतो. संबंध करताना खूप मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात. साहजिक यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास देखील मदत होते. संबंध ठेवतेवेळी हृदयाचे ठोके सामान्य स्थिती पेक्षा अधिक जोरात धडधड करत असतात. साहजिकच या कालावधीमध्ये रक्तवाहिन्यांचा प्रवास सुरळीत सुरू होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका यासारख्या समस्या देखील नाहीशा होतात.
तणाव आणि चिंता वाढते
सेक्स करत असताना शरीरामध्ये विविध हॅप्पी हार्मोन्स संचारत असतात. जर तुमच्या लैंगिक आयुष्यात खंड पडला असेल, तर हे हार्मोन्स संचारात नाहीत. साहजिकच याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होतो. आणि तुम्ही नेहमी चिंतेत आणि तमावामध्ये वावरता. विनाकारण तुम्ही किरकोळ गोष्टीवरून देखील चिडचिड करत असता. स्वतःला देखील आपण विनाकारण चिडचिड का करत आहोत? हे देखील समजत नाही. मात्र याचे मूळ कारण हे तुमच्या सेक्स लाईफमध्ये पडलेला खंड हाच असतो.
विस्मरणाची समस्या
नात्यामधील गोडवा आणि ओलावा कायम ठेवण्यासाठी सेक्स जितकी महत्त्वाची भूमिका पार पाडतो, तितकीच तो तुमच्या निरोगी आरोग्या संबंधी देखील महत्वाचा रोल पार पाडतो. नियमितपणे सेक्स करणाऱ्या आणि सेक्समध्ये खंड पडलेल्या लोकांचा एक सर्वे करण्यात आला. यामध्ये नियमितपणे सेक्स करणाऱ्यांची स्मरणशक्ती इतरांच्या तुलनेत अधिक सक्रिय असल्याचं समोर आलं आहे. सेक्समध्ये मोठ्या कालावधीसाठी खंड पडला असेल, तर अशांना विस्मरणाची समस्या अधिक जाणवते.
रोग प्रतिकार शक्ती
तुमच्या जीवनामध्ये सेक्स फारसा सक्रिय नसेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते. इतरांच्या तुलनेत नियमितपणे सेक्स करणाऱ्यांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असल्याचं सर्वेतून समोर आलं आहे. जर तुमच्या आयुष्यातून दीड-दोन महिने सेक्स गायब झाला असेल, तर तुम्हाला सर्दी आणि ताप या समस्या उद्भवतात. नियमीत सेक्स केल्याने तुमचं शरीर कोणत्याही आजारापासून लढण्यासाठी अँटिबोडीस तयार करत असतं.
इच्छा कमी
जर तुमच्या आयुष्यात नेहमी सेक्समध्ये अंतर पडत असेल, तर हळूहळू या संबंधी तुमची इच्छा कमी होत जाते. साहजिक याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर देखील झाल्याचं पाहायला मिळते. लैंगिक आयुष्यामध्ये जर तुम्ही खंड पडू दिला नाही, तर तुम्हाला या संबंधी इच्छा वाढत जाते. मात्र जर असं झालं नाही, तर तुमची या विषयीची इच्छा कमी होत जाणार. आणि याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार.
नात्याचा ओलावा संपुष्टात येतो
सेक्समध्ये खंड पडला, तर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. हे आपण सविस्तर जाणून घेतले. मात्र याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावर देखील पडतो. जर तुम्ही नियमितपणे सेक्स करत नसाल, मोठ्या कालावधीसाठी नेहमी सातत्याने खंड पडत असेल, तर तुमच्या नात्यातून प्रेम गायब होते. आणि फक्त कर्तव्यावर तुमचं नातं टिकून राहते. साहजिकच यामुळे तुम्ही एक आनंदी जोडपं म्हणून नाव कमावू शकत नाही.
हे देखील वाचा Todays Horoscope: 29 नोव्हेंबरचे राशिभविष्य, काहींसाठी सोन्यासारखा दिवस तर काहींची होईल मोठी फसवणूक..
Ruturaj Gaikwad: एकाच ओव्हरमध्ये गायकवाडने मारले सात षटकार; कुठे आणि कसे मारले, पाहा व्हिडिओ..
Tips To Reduce Electricity Bill: वीजबिल येणार अर्ध्यावर, फक्त बसवा हे उपकरण बसवा..
Railway Bharti: 35,281 रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम