Health Tips: कमी वयात मुलांची दाढी का होतेय पांढरी ? ‘ही’ आहेत कारणे, घ्या जाणून अन्यथा दाढी होईल पांढरी..
Helath Tips: प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व उठून दिसावे असे वाटत असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न देखील करत असतो. केस आणि चेहरा हे व्यक्तिमत्त्वातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत. डोक्यावर काळेभोर केस (Hairs) असल्याने व्यक्तिमत्व आणखीनच उठून दिसते. परंतु सध्याच्या काळात २० वयापासूनच मुलांचे केस पांढरे व्हायला लागले आहेत. केस पांढरे होणे, ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. (Helath Tips)
तारुण्यात केस पांढरे व्हायला लागल्याने तरुण चिंताग्रस्त होत असतात. केसांसाठी बरेच लोक खूप खर्च करत असतात. बऱ्याच लोकांना तारुण्यात आपले केस (Hairs) गमवावे लागतात. केस गळतीसाठी किंवा पांढरे होण्याची वेगवेगळी कारणे असतात. आजकाल खूप कमी वयात मुलांची दाढी देखील पांढरी होण्याची समस्या पाहायला मिळते. आजकाल बरेच तरुण चेहऱ्यावर दाढी ठेवतात. काही तरुण तर खूप मोठी दाढी ठेवत असतात. परंतु आजकाल अवघ्या तिशीत तरुण मुलांची दाढी पिकलेली पाहायला मिळते. (Helath Tips)
आजकाल खूप कमी वयात दाढी पिकत असल्याने बरेच तरुण दाधीला देखील डाय वापरत असतात. पूर्वीच्या काळी ४o वयानंतर केस पांढरे (White Hairs) होण्याची समस्या निर्माण होत असायची. परंतु आजकाल वयाच्या ३० व्या वर्षी दाढीचे केस पांढरे (Beard White Hairs) होण्याची समस्या निर्माण होत आहे. विशेषतः दाढी शौकीन लोकांसाठी दाढी पांढरी होणे, ही खूप मोठी समस्या वाटते.
आजकाल बाजारात जे डाय (Hairs Dye) उपलब्ध आहेत, त्यातील काही डाय वापरल्याने काही दिवसांसाठी केस काळे होतात. परंतु केस अधिकच झपाट्याने पांढरे होण्याची समस्या जाणवते. कारण काही डाय मध्ये असलेले केमिकल्स केसांसाठी हानिकारक असतात. ते डाय वापरल्याने केस झपाट्याने पांढरे होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जोपर्यंत पांढरे केस इतर काळ्या केसांमध्ये खपून जात असतील, तोपर्यंत डाय वापरण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घेतले पाहिजे.
दाढीचे केस पांढरे होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय: ताणतणाव हे एक दाढीचे केस पांढरे होण्याचे कारण आहे. कारण आपण बऱ्याचदा काही ना काही कारणावरून तणावात असतो. त्यामुळे देखील केस पांढरे होण्याची समस्या निर्माण होत असते. तणावाच्या काळात आपण आपल्या आरोग्याकडे, खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष करत असतो.
मेलेनिन (Melanin) आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करत असते. मेलेनिन हा आपल्या त्वचेत आढळणारा एक नैसर्गिक घटक आहे. मेलेनिन (Melanin) डोळ्याची बाहुली, केस आणि त्वचेचा रंग टिकवून ठेवण्याचे काम करतो. शरीरात मेलॅनिनचे (Melanin) प्रमाण वाढवण्यासाठी काही वेळ उन्हात बसावे, त्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला मिळेल. व्हिटॅमिन डी मेलॅनिनची पातळी वाढवण्याचे काम करते. मेलेलिन लिंबू वर्षीय फळांमधून, पालेभाज्या आणि बेरी फळातून मिळते. तसेच टोमॅटोमधून देखील ते मिळते. व्हिटॅमिन ई आणि सी असलेले फळे खाल्याने देखील मेलेनिन वाढवण्यास मदत होते.
दारू आणि सिगारेट सारखे व्यसन असल्यास देखील दाढी पांढरी होण्याची शक्यता असते. प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान केल्याने रक्तवाहिन्या अंकुचित होऊ लागतात. त्यामुळे केसांच्या बिजकोषात सुरळीत रक्तपुरवठा होत नाही. हे देखील दाढीचे केस पांढरे होण्याचे कारण असू शकते. त्यामुळे दारू आणि सिगारेट सारखे व्यसन जर तुम्हाला असेल किंवा नसेल तर त्यापासून लांब राहिलेलं कधीही योग्यच राहील.
अनुवांशिकतेनुसार देखील दाढीच्या केसांची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आहारात क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. तसेच रोज व्यायाम केल्याने देखील दाढीचे केस पांढरे होण्यापासून थांबवण्यास मदत होऊ शकते. तसेच रोज व्यायाम करणे ही एक चांगली सवय आहे, त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
हेही वाचा: Kidney Health: या वाईट सवयी तुम्हाला आहेत का? असतील तर तुमची किडनी होऊ शकते निकामी..
Health Tips: शारीरिक संबंधामध्ये खंड पडल्यास मानसिकतेवर आणि शरीरावरही होतात हे गंभीर परिणाम..
Success Story: गाईंच्या शेणावर बांधला एक कोटींचा बंगला, दुधातून घेतात दीड कोटी वार्षिक उत्पन्न..
वीजबिल येणार अर्ध्यावर, फक्त बसवा हे उपकरण बसवा..
Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..
Helath: हे 5 पदार्थ जे पुन्हा गरम करुन खायचे नाहीत? नाहीतर होतील हे गंभीर परिणाम
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम