Kidney Health: ‘या’ वाईट सवयी तुम्हाला आहेत का? असतील तर तुमची किडनी होऊ शकते निकामी.. 

0

Kidney Health: Habits That Damage Your Kidneys: बऱ्याचदा आपण एखादा आजार झाल्याशिवाय जागेच होत नाही. ज्यावेळी एखादा आजार आपल्याला होईल तेव्हा मग आपण त्याचा विचार करायला लागतो. तुम्ही तुमच्या किडणीच्या स्वास्थ्याचा (Kidney Health) विचार केला आहे का? किडनी आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. ज्या लोकांना किडनीचा आजार होतो त्याच लोकांना तिचे महत्व समजते. त्यामुळे हा संपूर्ण लेख तुम्ही तुमच्या किडनीला कसे निरोगी (Kidney Health) ठेवू यासाठी आहे.

 

जर आपण वेळच्या वेळी किडनीच्या आरोग्याकडे वेळच्या वेळी (Kidney Health) लक्ष दिले नाही, तर भविष्यामध्ये आपल्याला किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाबामुळेही (High Blood Pressure) या दोन्हींमुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. किडनी शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त द्रव पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्यात मोठी भूमिका बजावते. रक्तातील पाणी, क्षार आणि खनिजांचे निरोगी संतुलन राखण्यास किडनी महत्वाची भूमिका बजावत असते. आरोग्यदायी आहार न घेतल्यामुळे किडनीचे आरोग्य (Kidney Health) आणि कार्य बिघडते. त्यामुळे पुढील वाईट सवयी लगेच सोडून द्या.

 

वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर: डॉक्टरकडे न जाता देखील मिळणाऱ्या वेदनाशामक (Pain Killer) गोळ्या तुमच्या वेदना कमी करू शकतील परंतु जर अगोदरच तुम्हाला किडनीचा आजार असेल तर वेदनाशामक गोळ्यांमुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे तुम्ही जर अशा गोळ्या घेत असाल तर त्याचा वापर कमी करा आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या प्रमाणापेक्षा कधीही जास्त गोळ्या घेऊ नका.

 

मिठाचे सेवन अतिप्रमाणात करू नये. मीठामध्ये सोडियम असते, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि रक्तदाबामुळे आपल्या किडनीच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. मीठाऐवजी औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी आपल्या जेवणाला चव देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे हळूहळू तुमच्या जेवणात कमी मीठ वापरायची सवय तुम्हाला लागेल, जे तुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी चांगले आहे. हेही वाचा: Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

 

प्रक्रिया केलेले (Processed Food) अन्नपदार्थ खाणे टाळावे: प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यामध्ये सोडियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. ज्यांना अगोदरच किडनीचा आजार आहे, अशांना त्यांच्या आहारात फॉस्फरसचे (Phosphorus) सेवन कमी करणे गरजेचे आहे. संशोधनातून समोर आले आहे की, किडनीचा आजार नसलेल्या लोकांमध्ये फॉस्फरस समृद्ध असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे त्यांच्या किडनी आणि हाडांसाठी हानिकारक ठरू शकते.

खूप कमी पाणी पिणे: बऱ्यादा आपण कामाच्या व्यापात पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु त्यामुळे किडनीच्या आरोग्याला (Kidney Health) हानी पोहोचते. पुरेसे पाणी पिणे आपल्या किडनीला शरीरातून सोडियम आणि विषारी (Toxic) पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्याचसोबत मुतखड्याचा आजार जर तुम्हाला टाळायचा असेल तर पुरेसे पाणी पिणे. किडनी संदर्भात आजार किंवा किडनी निकामी झालेल्या लोकांना पाण्याचे प्रमाण मर्यादित करण्याची आवश्यकता असू शकते. हेही वाचा: Portable Room Heaters: थंडीत रूमला गरम करणारी मशीन मिळतेय अवघ्या 600 रुपयात, वीजबिल देखील खूपच कमी

 

पुरेशी झोप न घेणे: पुरेशी झोप घेणे हे आपल्या आरोग्याला खूपच फायदेशीर आहे. परंतु तुम्हाला माहिती नसेल आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. किडनीचे कार्य आपल्या झोपेच्या आणि उठण्याच्या चक्रानुसार चालू असते. जे 24 तास चालणाऱ्या किडनीच्या कामात समन्वय साधण्याचे काम करते.

 

अति प्रमाणात मांस खाणे हे किडनीच्या आरोग्यात बाधा आणणारे आहे. प्राण्यांचे प्रथिने रक्तामध्ये ऍसिडचे (Blood Acid) निर्माण करतात. हे किडनीच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. मांस अधिक खाल्ल्याने शरीरात एक अशी स्थिती निर्माण होते, ज्यामध्ये किडनी रक्तातून हवे तेवढे ऍसिड काढून टाकू शकत नाही. याला एसिडोसिस असे म्हणतात. आपल्या शरीराला प्रथिनांची (Proteins) आवश्यकता आहे, परंतु तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचे संतुलन असायला हवे.

 

जास्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण साखरेचे अति सेवन लठ्ठपणाला हातभार लावत असते. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि मधुमेह (Diabetes) होण्याची शक्यता अधिक असते. बऱ्याचदा साखर वेगवेगळ्या पेयात आणि पदार्थात असते, ज्यांना आपण गोड पदार्थ म्हणत नाही. आपण सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड खात असतो, त्यामध्ये प्रक्रिया केलेल्या साखरेचे सर्व गुप्त स्त्रोत आहेत. त्यामुळे असे पदार्थ टाळायला हवेत.

 

धुम्रपान करणे हे आपल्या फुफ्फुसासाठी किंवा हृदयासाठी धोकादायक आहे. परंतु तुम्हाला कदाचित माहिती नसेल, की धुम्रपान किडनीच्या आरोग्याला देखील हानिकारक आहे. जे लोक धूम्रपान करतात त्यांच्या लघवीमध्ये प्रथिने असण्याची शक्यता जास्त असते आणि हे किडनी खराब झाल्याचे लक्षण आहे.

 

दारूचे अतिसेवन हे आपल्या शरीराला हानिकारक आहे. जर एखादी व्यक्ती नेहमीच अति प्रमाणात दारू पीत असेल तर त्या व्यक्तीला किडनीचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अति मद्यपान करणारे लोक जर धूम्रपान करत असतील तर त्यांना किडनीच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे.

 

तासंतास एकाच ठिकाणी बसून राहणे, किडनीच्या आरोग्याशी सबंधित जोडले गेले आहे. परंतु अद्याप तरी बैठी वेळ किंवा शारीरिक हालचाल यातील कशामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम का किंवा कसा होतो, हे संशोधकांना निष्पन्न झाले नाही.

हेही वाचा: Ramdev Baba: कपडे नाही घातले तरी महिला सुदंर दिसतात, फडणवीसांच्या पत्नी समोरच रामदेव बाबा बरळले; अमृता फडणवीस यांची रिएक्शन पाहून म्हणाल.. 

Bank Holiday December 2022: डिसेंबरमध्ये तब्बल 13 दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या तारखा.. 

Aadhar Card: आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, सरकारने घेतलाय हा निर्णय.. 

UPI Payment करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी.. 

Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.