Aadhar Card: आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, सरकारने घेतलाय हा निर्णय..

0

Fake Aadhaar Card: आजच्या काळात आधार कार्ड नसेल असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड (Aadhaar Card) हे असणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शासकीय, तसेच खासगी कागदपत्रीय कामकाज आधार कार्ड असल्याशिवाय होत नाही. प्रथम आधार कार्ड आणि मग पुढील प्रक्रिया असे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhar Card) बंधनकारकच आहे.

आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र मानले जाते. आपण आधार कार्ड काढत असताना आपल्या हातांचे ठसे, डोळ्यांचे फोटो दिलेले आहेत. बऱ्याचदा आपण कामानिमित्त आधार कार्डच्या झेरॉक्स काढत असतो. बऱ्याचदा त्यातील  झेरॉक्स कचऱ्यात किंवा रद्दीत फेकून दिले जातात. परंतु आपल्या एक गोष्ट लक्षात नसते, ती म्हणजे आपण टाकून दिलेल्या आपल्या आधार कार्ड झेरॉक्सचा (Adhar Card) दुरुपयोग होऊ शकतो. आपण टाकून दिलेल्या आधार कार्डच्या झेरॉक्सवरून बनावट आधार कार्ड (Fake Aadhaar Card) तयार केले जाऊ शकते.

आधार कार्डचा (Aadhar Card) गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने एक सूचना जारी केली आहे. नेमकं सरकारने यावर काय म्हटले आहे, जाणून घेऊया. बनावट आधार कार्डचा (Fake Aadhar Card) गैरवापर रोखण्यासाठी सरकारने नुकतची एक सूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (Ministry of Electronics and IT) नुकतेच सांगितले की, आधार कार्ड (Aadhar Card) हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे 12 अंकांच्या आधार क्रमांकाला स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी शारीरिक (Physical) आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही प्रकारे केली पाहिजे.

भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण (UIDAI) सर्व विभागांना एक परिपत्रक (Circular) काढले आहे. या परिपत्रकात UIDAI ने (Unique Identification Authority of India) व्यक्तीचे आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहण्यात यावी असे सांगितले आहे. तसेच UIDAI ने आणखी एक मुद्दा यामध्ये अधोरेखित केला आहे, तो म्हणजे एखाद्या आधारकार्ड धारकाच्या परवानगीने त्याच्या आधार कार्डच्या कोणत्याही स्वरूपाची म्हणजेच E आधार (E Aadhar),  आधार PVC कार्ड आणि M आधार (mAadhaar) तपासले जाऊ शकते, ज्यामुळे त्याचा गैरवापर होणार नाही.

..तर कारवाई होणार:
केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकात आधार कार्डची (Aadhaar Card) तपासणी केल्यानंतर जर बनावट कार्ड  (Fake Aadhar Card) असल्याचे निष्पन्न झाले तर हा गुन्हा मानला जाईल. त्यामुळे बनावट आधार कार्ड वापरकर्त्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच आधार कायद्याच्या (Aadhar Law) कलम 35 अंतर्गत नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सबंधित बनावट आधार कार्ड  वापरकर्त्यावर शिक्षेची कारवाई केली जाईल.

तुम्हाला देखील बनावट आधार कार्ड ओळखता येऊ शकते:
आधार कार्ड,  ई-आधार (E-Aadhar), आधार पीव्हीसी (PVC) कार्ड आणि एम-आधार (mAadhar) यांसारख्या सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या QR कोडचा वापर करून mAadhaar  किंवा आधार QR कोड स्कॅनर वापरून कुठल्याही आधार कार्डची सत्यता तुम्ही पडताळून पाहू शकता. त्यासाठी QR Code Scanner ॲप तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आधार कार्डची सत्यता पडताळून पाहण्यासाठी हा सर्वात सोपा आणि सहज शक्य असणारा पर्याय आहे.

आधार कार्ड वापरकर्त्यांना ‘हे’ आवाहन:
UIDAI ने आधार कार्ड (Aadhaar Card) वापरकर्त्यांना आवाहन केले आहे की, बऱ्याचदा आधार कार्ड वापरकर्ते त्यांचे आधार वापरताना त्याच्या सुरक्षेकडे (Security) दुर्लक्ष करतात. त्यामुळे आधार कार्डच्या सुरक्षिततेसाठी वापरकर्त्यांनी त्यांचे आधार कार्ड (Aadhar Card) वापरताना काळजी घेतली पाहिजे. आधार कार्डच्या झेरॉक्स प्रति इतरत्र कुठेही टाकून न देता जपून ठेवा. आधार कार्ड (Aadhar Card) समाज माध्यमांवर किंवा कुठल्याही व्यक्तीला पाठवू नका.

UIDAI ने केलेले आवाहन आपण सर्वांनी आचरणात आणले तरच आधार कार्डचा  (Aadhaar Card) गैरवापर रोखता येऊ शकतो. आधार कार्ड हे वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाते. आजकाल तंत्रज्ञानातील हुशार भामटे त्याचा कसाही गैरवापर करू शकतात. त्यामुळे प्रत्येकवेळी आपण जपून पाऊल टाकायला हवे. कारण ज्यावेळी तंत्रज्ञाने विकसित होतात, त्याचे तोटे देखील निर्माण होत असतात. त्यामुळे नेहमी सतर्क रहायला हवे.

हेही वाचा: Portable Room Heaters: थंडीत रूमला गरम करणारी मशीन मिळतेय अवघ्या 600 रुपयात, वीजबिल देखील खूपच कमी 

Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह 

UPI Payment करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी.. 

Marriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर.. 

Pan Card: लागलीच करा हे काम, अन्यथा पॅन कार्डतर होईल बाद परंतु..; वाचा आयकर विभागाचा नवा नियम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.