Bank Holiday December 2022: डिसेंबरमध्ये तब्बल 13 दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या तारखा..
Bank Holiday December 2022: बऱ्याचदा बँका बंद असल्याने सर्वसामान्य लोकांसह बड्या उद्योगपतींची अनेक कामे खोळंबून राहतात. त्यात डिसेंबर महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद असणार आहे. या सुट्ट्यांमुळे कदाचित तुमची देखील अडचण होऊ शकते. त्यामुळे बँका किती दिवस आणि कुठल्या तारखेला बंद (Bank Holiday December 2022) असणार आहेत. हे जाणून घेणे गरजेचे आहे.
बँका डिसेंबर मध्ये 13 दिवस बंद राहणार आहेत(Bank Holiday December 2022). त्यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार देखील समाविष्ट आहे. कारण आपणाला माहितीच असेल महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार बँकांना सुट्टी असते. या सुट्ट्या सर्व प्रायव्हेट आणि सरकारी बँकांना असतात. काही लोकल बँका स्थानिक सणाला सुट्ट्या देत असतात. त्यामुळे त्या राज्यामध्ये त्या बँकांना सुट्ट्या असतात. डिसेंबरमध्ये ख्रिसमस आणि गुरू गोविंद सिंह यांचा जन्मदिवस असल्याने बँकांना त्या दिवशी सुट्टी असणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची (Bank Holiday December 2022) यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रत्येक महिन्याची यादी जाहीर केली जाते. RBI ने जारी केलेल्या परिपत्रकात बँकांशी सबंधित सार्वजनिक सुट्ट्यांबाबत सांगण्यात आले आहे. सुट्ट्या त्या त्या राज्यातील महत्वाचे दिवस आणि सण याच्यावर अवलंबून असतात. डिसेंबरमध्ये पहिली सुट्टी 3 डिसेंबर रोजी असणार आहे.
कुठल्या राज्यात कधी असणार सुट्टी?
पहिली सुट्टी 3 डिसेंबरला आहे. सेंट फ्रान्सिस झेव्हियर मुळे गोवा राज्यात सुट्टी राहणार आहे. त्यानंतर 4 तारखेला रविवारची सुट्टी असल्याने देशातील सर्व बँका बंद आहेत. 10 डिसेंबरला दुसऱ्या शनिवारची सुट्टी देशभरात असणार आहे. त्याच्याच दुसऱ्या दिवशी 11 डिसेंबरला रविवारची सुट्टी देशभरात असणार आहे. तसेच त्याच्याच दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबरला पा-तोगन नेंगमिंजा संगमा, असल्याने शिलाँगमधील बँकांना सुट्टी असणार आहे. 18 डिसेंबरला रविवारची सुट्टी देशभरात असणार आहे, तर 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिनाची सुट्टी गोव्यात असणार आहे.
त्यानंतर 24 डिसेंबर ला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभर सुट्टी राहणार आहे. तर 25 डिसेंबरला रविवारची सुट्टी असणार आहे. 26 डिसेंबरला लोसूंग/नामसूंग असल्याने शिलाँगमध्ये सुट्टी असणार आहे. यानंतर 29 डिसेंबरला गुरू गोविंद सिंग यांची जयंती असल्याने पंजाबमध्ये सुट्टी असणार आहे. 30 डिसेंबरला यू कियांग नांगबाहमुळे शिलाँगमध्ये सुट्टी असणार आहे. 31 डिसेंबरला न्यू इयर ईव्ह मुळे देशातील काही भागात सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तीन दिवस बँका बंद असणार आहेत.
बँकाना सुट्ट्या (Bank Holiday December 2022) ह्या वेगवेगळ्या राज्यांमधील सणावारांनुसार दिल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात 4, 10, 11, 18, 24, 25 याच दिवशी बँकाना सुट्टी असणार आहे. तर गोव्यामध्ये 4, 10, 11, 18, 24, 25 या व्यतिरिक्त 3 आणि 1 डिसेंबर रोजी बँका बंद राहतील.
Aadhar Card: आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, सरकारने घेतलाय हा निर्णय..
Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह
Portable Room Heaters: थंडीत रूमला गरम करणारी मशीन मिळतेय अवघ्या 600 रुपयात, वीजबिल देखील खूपच कमी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम