Ramdev Baba: कपडे नाही घातले तरी महिला सुदंर दिसतात, फडणवीसांच्या पत्नी समोरच रामदेव बाबा बरळले; अमृता फडणवीस यांची रिएक्शन पाहून म्हणाल..

0

Ramdev Baba: महिलांचा अपमान करणारी विधाने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्र राज्यात केली जात आहेत. यामध्ये राजकारण्यांचा सहभाग होता. मात्र आता योग गुरु रामदेव बाबा (yog Guru Ramdev Baba) यांची देखील यात भर पडली असून, महिलांविषयी (women) त्यांनी एक प्रकारे गरळ ओकली आहे. रामदेव बाबांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावेळी स्टेजवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) देखील उपस्थित होत्या. (Yoga Guru Ramdev Baba controversial statement on Women in front of Amruta Fadnavis)

पतंजलि (Patanjali) योगपीठ त्याचबरोबर मुंबई महिला पतंजलि योग समिती यांच्यातर्फे आज योग विज्ञान शिबीर त्याचबरोबर महिला संमेलन या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाण्यामधील (Thane) ठाण्यामधील हायलँड या भागामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. योग गुरु म्हणून प्रसिद्ध असणारे रामदेव बाबा उपस्थित महिलांसोबत संवाद साधत असताना, महिला साडीमध्ये खूप सुंदर दिसतात. साडी बरोबर सलवार कुर्त्यावमध्ये देखील महिला सुंदर दिसतात. माझ्या सारखं काही नाही घातलं, तरी देखील महिला सुंदर दिसतात. असं वादग्रस्त विधान रामदेव बाबा यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महिला साडीत सलवार कुर्त्यामध्येही सुंदर दिसतात. याशिवाय महिलांनी काही घातलं नाही, तरी देखील त्या सुंदर दिसतात. तसं वादग्रस्त विधान केल्यानंतर, रामदेव बाबा यांच्या शेजारी स्टेजवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानानंतर, अमृता फडणवीस हसत असल्याचं देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. रामदेव बाबा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर, राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं घडलं तरी काय?

योग विज्ञान शिबीर त्याचबरोबर महिला संमेलन या कार्यक्रमासाठी महिला उपस्थित होत्या. योग विज्ञान शिबिरानंतर, महिला संमेलन कार्यक्रम सुरू झाला. मात्र महिलांनी सोबत आणलेल्या साड्या त्यांना संमेलनासाठी घालता आल्या नाहीत. यावरून योग गुरू रामदेव बाबा यांनी तुम्हाला साड्या घालता आल्या नाहीत, हरकत नाही. तुम्ही घरी जाऊन साड्या घाला. तुम्ही साड्यावरही चांगल्या दिसता, सलवार सूटमध्ये देखील चांगल्या दिसता. माझ्या सारखं काही नाही घातलं, तरी तुम्ही चांगल्या दिसता. रामदेव बाबा यांनी हे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासमोर केल्याने, आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी काय म्हणाले रामदेव बाबा?

रामदेव बाबा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे यांना देखील त्यांनी ऊर्जावान व्यक्ती असल्याचं म्हटले आहे. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे एकात्म त्याचबरोबर भावनेने काम करत आहेत. या दोघांनी एक प्रकारे इतिहास देखील रचला आहे. मी झोपेतून उठलो, तरी देखील ते कामातच व्यस्त असतात. भावी वाटचालीसाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देखील मी देतो, असे देखील रामदेव बाबा यांनी म्हटलं.

रामदेव बाबा यांच्या विधानानंतर रूपाली पाटील काय म्हणाला?

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील (rupalipatil thombare) यांनी रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाबा यांनी महिला साडीवर चांगल्या दिसतात इथपर्यंत ठीक आहे. त्या सलवार वर चांगल्या दिसतात ठीक आहे. मात्र त्यांनी जे पुढचं विधान केलं आहे, ते संताप जनक आहे. विशेष म्हणजे, अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी हे विधान केलं. खरंतर अमृता फडणवीस यांनी त्यांच्या कानाखाली द्यायला हवी होती. रामदेव बाबा पुण्यात आल्यानंतर, आम्हाला त्यांचं तोंड काळं करावं लागेल. असे रूपाली पाटील म्हणाल्या.

हे देखील वाचा Aadhar Card: आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, सरकारने घेतलाय हा निर्णय..

Portable Room Heaters: थंडीत रूमला गरम करणारी मशीन मिळतेय अवघ्या 600 रुपयात, वीजबिल देखील खूपच कमी

Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह

Couple Romance Video Viral: तरुणी नको म्हणत असतानाही सिग्नलला थांबून तरुणाचा इम्रान हाश्मी स्टाईल Kiss; शेजारी पाहत असताना..

The Best Couple Combo: उंच मुलांकडेच मुली आकर्षित का होतात? धक्कादायक माहिती आली समोर; उंचीचा वैवाहिक जीवनावरही आहे प्रभाव..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.