Success Story: गाईंच्या शेणावर बांधला एक कोटींचा बंगला, दुधातून घेतात दीड कोटी वार्षिक उत्पन्न.. 

0

Success Story: आयुष्यात प्रत्येकाला यश हवे असते. प्रत्येक जण यश मिळवण्याच्या पाठीमागे लागला आहे. (Success Story) वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक काम करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला यशस्वी आयुष्य जगायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू आहे. कोणाला स्वतःचा व्यवसाय मोठा करायचा आहे, तर कोणाला नोकरीमध्ये स्थिर व्हायचे आहे. यशाची व्याख्या प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असू शकते. कारण यशाला आपण कुठल्याच ठराविक साच्यामध्ये बसवू शकत नाही. (Success Story)

त्यात आजकाल शेती म्हटलं की उत्पन्नाची हमी देता येत नाही. शेतकऱ्याचा फायदा ठरलेला नसतो. शेतीबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये नकारात्मकता आहे. एखादा मुलगा शेती करत असेल तर त्याच लग्न जमवणे देखील खूप अवघड होते. कारण कोणालाच आज शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही. जर एखादा मुलगा नोकरी करत असेल आणि त्याला शेती नसेल तरी देखील लग्न जमवताना अडचणी निर्माण होतात. कारण की समोरच्या पक्षाला शेती देखील हवी असते.

 

अर्थात शेतीला पर्यायच नाही. कारण की शेती असल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. शेतकरी पिकवतोय म्हणून जग जगत आहे. शेतीमध्ये उत्पन्न ठरलेले नसले, तरीदेखील शेती व्यवसाय जर आधुनिक पद्धतीने केला आणि त्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर शेतीमध्ये भरपूर उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेती करत असताना प्रचंड कष्ट घेण्याची धमक असावी लागते.

 

आज आपण एका दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. हा शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील आहे. सांगोला तालुका पूर्वीपासून दुष्काळग्रस्त तालुका आहे. या तालुक्यातील व्यवस्थेने आणि शेतकऱ्यांनी जगासमोर एक वेगळे उदाहरण ठेवले आहे. कारण सांगोला तालुक्यातील शेतकरी हे पाण्याचे देखील व्यवस्थापन करण्यात प्रसिद्ध आहे. सांगोल्याच्या माळरानावर डाळिंबाच्या बागा लावून येथील शेतकऱ्यांनी लाखोंचे उत्पादन घेतलेले आपण ऐकले असेलच.

 

परंतु सांगोल्यातील इमडेवाडी गावच्या प्रकाश इमडे या शेतकऱ्याने दुग्ध व्यवसायातून करोडोंचे आर्थिक उत्पन्न (Success Story) घेऊन, शेती व्यवसायाला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे. उत्पन्नातून त्यांनी एक कोटींचा बंगला देखील बांधला आहे. दीड कोटी रुपयांचे मासिक उत्पन्न घेतात. प्रकाश इमडे यांना वारसा हक्काने चार एकर कोरडवाहू जमीन मिळाली. तसेच त्यांच्याकडे एक गाय होती. सध्या त्यांच्याकडे तब्बल दीडशे गायी आहेत.

 

त्यांच्याकडे असणाऱ्या 150 गाईंपासून रोज 1000 लिटर दूध डेअरीला घालतात. शेतीमध्ये काय आहे? असं म्हणणाऱ्या लोकांना तोंडात बोटे घालायला लावणारे उदाहरण म्हणजे प्रकाश इंबडे हे शेतकरी. महत्वाची बाब म्हणजे ते अशिक्षित आहेत. परंतु एखाद्या भल्या मोठ्या कंपनीच्या मॅनेजरला लाजवेल असे मॅनेजमेंट त्यांनी आपल्या व्यवसायात केले आहे.

 

प्रकाशबापू यांच्याकडे दुग्ध व्यवसायातील जबरदस्त अनुभव आहे. दुग्ध व्यवसायातील अद्ययावत तंत्रज्ञानाचे वापर करून दुग्ध व्यवसाय कशाप्रकारे यशस्वी करता येतो, या ज्ञानाचा भला मोठा साठा त्यांच्याकडे आहे. एक अल्पभूधारक शेतकरी ते दुग्धव्यवसायातून महिन्याला दीड कोटी आर्थिक उत्पन्न घेणाऱ्या या शेतकऱ्याच्या देव्हाऱ्यावर गाईचा फोटो पुजला जातो. त्यांच्या घरातील सर्व कुटुंबीय या गाईच्या पाया पडूनच आपल्या दिवसाची सुरुवात करतात. गाईंच्या शेणापासून मिळालेल्या उत्पन्नातून दिमाखदार असा एक कोटींचा बंगला त्यांनी बांधला आहे.

 

इमडे कुटुंबियांनी बांधलेल्या बंगल्याला गोधन असे नाव दिले आहे. त्यांनी बांधलेल्या बंगल्यावर गाईचा आणि दुधाच्या किटलीचा पुतळा उभारला आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या दोन एकर कोरडवाहू शेतीत त्यांनी मुक्त गोठा आणि बंगला बांधला आहे. तर उरलेल्या दोन एकर मध्ये गाईंसाठी घास लावण्यात आला आहे. 1998 मध्ये त्यांनी एका गाईवर दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. आपल्याला या व्यवसायातून मोठे आणि भव्य दिव्य असे करायचे आहेत, हे त्यांनी अगोदरपासूनच ठरवले होते. गाई गाभण राहिल्यानंतर होणारे गाईचे वासरू त्यांनी आतापर्यंत एकदाही विकले नाही. हे त्यांच्या व्यवसायातील वैशिष्ट्य आहे.

 

2006 मध्ये त्यांच्याकडे असणारी पहिली गाय गेली. त्यानंतर त्याच गायीच्या कालवडींवर आतापर्यंत त्यांनी 150 गाईंचा गोठा उभारला आहे. त्यांच्या मुक्त गोठ्यामध्ये अत्यंत नियोजनपूर्वक पाणी, चारा, आरोग्य यांची काळजी घेतली गेली आहे. त्यामध्ये स्वच्छतेची देखील कुठलीही कमी नाही. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी केला आहे.

 

चाऱ्याचे आणि पाण्याचे नियोजन: सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पाणी नव्हते तेव्हा ते गाईंसाठी टॅंकरने पाणी आणायचे. परंतु नंतरच्या काळात त्यांनी त्यांच्या शेतामध्ये शेततळे तयार केले. जनावरांना खाद्यासाठी लागणारी वैरण ते टेंडर काढून विकत घेतात. त्यांच्या गाईंसाठी रोज 4 ते 5 टन हिरवी वैरण लागते. 4 ते 5 टन मुरघास ते विकत घेतात. दूध देणाऱ्या जनावरांना ते मुरघास घालतात तर बिना दुधाच्या गाईंना हिरवी वैरण दिली जाते. त्यांच्या गोठ्यामध्ये तसेच शेतामध्ये कधीही साप, नाग दिसत नाहीत. त्यासाठी त्यांनी तीन बदके सांभाळली आहेत. ही बदके गोठा आणि शेतात फिरत असतात. याच बदकांमुळे त्यांच्या शेतामध्ये आत्तापर्यंत कधीही साप, नाग, विंचू, बेडक दिसत नाहीत.

 

शेणातून लाखोंचे उत्पादन: साहजिकच दीडशे गायीचे शेण देखील भरपूर प्रमाणात असणार. गेल्या वीस वर्षांच्या कालावधीमध्ये प्रकाश बापू इमडे हे गोठा सोडून कधीही बाहेर गेले नाहीत. त्यांच्या कुटुंबातील 5 लोक हे गोठ्यात दिवसभर राबत असतात. शेणापासून देखील चांगले उत्पन्न मिळते. वर्षाला साधारण 12 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते. सध्या गायींची संख्या वाढवण्यापेक्षा, आहेत त्या गायींपासून जास्तीत दूध उत्पन्न घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यासाठी नवनवीन प्रयोग देखील ते करत असतात. पूर्वी 25 लिटर दूध देणाऱ्या गायी आता 40 लिटरपर्यंत दूध देत आहेत.

 

त्यांचा हा प्रवास नक्कीच सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या या गोठ्याला राज्यभरातून दररोज बरेच शेतकरी भेट देत असतात, त्यांना ते योग्य ते मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे त्यांच्या गोठ्याला भेट देणारा प्रत्येकजण नवीन ऊर्जा घेऊन जात असतो.

हेही वाचा: Railway Bharti: 35,281 रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..

Virat Kohli: टी ट्वेण्टी क्रिकेट मधून विराटने जाहीर केली निवृत्ती; कोहलीच्या पोस्टमुळे एकच खळबळ.. 

Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..

Android मोबाईल वापरकर्त्यांचा मोबाईल होऊ शकतो हॅक, Google ने दिला हा इशारा.. 

TrainMan App Offer: ट्रेनचं तिकीट कन्फर्म न झाल्यास चक्क मिळणार विमानाचं तिकीट, एवढंच नव्हे तर..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.