MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..

0

MSRTC Recruitment 2022: कुठेतरी चार पैशाची सरकारी नोकरी (government job) असावी अशी अनेकांची इच्छा असते. महागाई आणि बेरोजगारीच्या (inflation and unemployment) या दुनियेत नोकरीला (nokari) खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. देशात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात असली तरी काही विभागांमध्ये उमेदवारांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होताना दिसतात. उपलब्ध झालेल्या विभागामध्ये प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नसलं तरी प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (msrtc) अंतर्गत जालना (jalana) विभागामध्ये काही शिकाऊ उमेदवारांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून, पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रिया संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 7 डिसेंबर ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही देखील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये नोकरी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत जालना विभागामध्ये भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांची संख्या 34 आहे. या भरतीसाठी उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कोणकोणत्या विभागात किती जागा भरण्यात येणार आहेत? त्यासाठी उमेदवारांची पात्रता काय असणार आहे? ऑनलाइन अर्ज कसा करायचा? त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा किती पगार असेल? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

उमेदवारांची पात्रता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भरण्यात येणाऱ्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवारांच्या या भरतीसाठी एकूण 34 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पदविका अभियांत्रिकी या पदासाठी उमेदवाराने महाविद्यालयीन मेकॅनिकल अभियांत्रिकी या विषयाचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यांत्रिकी मोटार या पदासाठी उमेदवाराने दहावीचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आयटीआय (ITI) या ट्रेड मधून उमेदवारांनी दोन वर्षाची मोटर मेकॅनिकल ही पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.

मोटार व्हेईकल या पदासाठी उमेदवारांचे दहावीचे शिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिशनची पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सरकारमान्य आयटीआय संस्थेमधून सीटमेटल ही परीक्षा देखील पास असणे उमेदवारांना बंधनकारक असणार आहे. वेल्डर (welder trade) या रिक्त पदासाठी देखील उमेदवारांचे शैक्षणिक शिक्षण दहावीपर्यंत पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवारांनी वेल्डर या ट्रेडमध्ये हा कोर्स पूर्ण करणे देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत जालना विभागामध्ये भरण्यात येणाऱ्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची वय मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांचे 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. ओबीसी उमेदवारांसाठी 38 वर्षाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर एसटी आणि एससी उमेदवारांसाठी 43 वर्षाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. तर इतर प्रवर्गासाठी 295 रुपये अर्ज शुल्क आकारलं जाईल.

पगार

यांत्रिकी पदवीधर या उमेदवारांसाठी नऊ हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. त्याचबरोबर यांत्रिकी मोटार या पदासाठी उमेदवारांना 9535 रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. त्याचबरोबर वीजतंत्र या विभागासाठी 9535 रुपये दरमहाप पेमेंट दिले जाणार आहे. मोटर वेव्हिकल बॉडी या पदासाठी एकूण आठ हजार 76 रुपये दरमहा पेमेंट दिले जाणार आहे. तर वेल्डर या पदासाठी 8476 रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

या परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी अंतिम मुदत आठ डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार ऑनलाइन नोंदणी करून अर्ज हा प्रत्यक्ष जालना विभागीय कार्यालयात जमा करायचा आहे. विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय, औद्योगिक वसाहत, एन. आर. बी. अपोजिट साईट, औरंगाबाद रोड, जालना या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.apprenticeshipindia.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर या विभागाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, या भरती प्रक्रिये संदर्भात ऑनलाईन नोंदणी करू शकता.  परीक्षेची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी यावर क्लिक करा

 

हे देखील वाचाAndroid मोबाईल वापरकर्त्यांचा मोबाईल होऊ शकतो हॅक, Google ने दिला हा इशारा.. 

Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..

Horoscope Rashifal 27 November 2022: 27 तारखेला सूर्याप्रमाणे या राशींचे चमकेल भाग्य..

TrainMan App Offer: ट्रेनचं तिकीट कन्फर्म न झाल्यास चक्क मिळणार विमानाचं तिकीट, एवढंच नव्हे तर..

Bank Holiday December 2022: डिसेंबरमध्ये तब्बल 13 दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या तारखा..

Aadhar Card: आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, सरकारने घेतलाय हा निर्णय..

Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.