TrainMan App Offer: ट्रेनचं तिकीट कन्फर्म न झाल्यास चक्क मिळणार विमानाचं तिकीट, एवढंच नव्हे तर..

0

TrainMan App Offer: बऱ्याचदा लांबच्या पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास रेल्वेचा (Indian Railway) प्रवास सुखकर राहतो. त्यात पैशाची देखील बचत होते. जर विमान तिकीटाचा विचार केल्यास सर्वसामान्य लोकांना विमानाचे तिकीटदर परवडणारे नसतात. त्यामानाने सर्वात सोयीस्कर आणि स्वस्त प्रवास रेल्वेचा समजला जातो. रेल्वेमध्ये साधारणपणे जनरल स्लीपर, स्लीपर एसी ई. अशा प्रकारचे कक्ष असतात. जर लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल, तर स्लीपर कोच किंवा रिझर्वेशन करणे फायद्याचे असते.

 

परंतु बऱ्याचदा रेल्वेची तिकिटे कन्फर्म होणे म्हणजे खूप कठीण काम होऊन जाते. कारण बरेचदा रेल्वेची तिकिटे महिना दोन महिने अगोदर देखील बुकिंग करून ठेवलेली असतात. त्यामुळे जेव्हा रिझर्वेशन कोटा फुल होतो, त्यावेळी पुढील तिकिटे वेटिंग लिस्टवर बुक होतात. यामध्ये तिकीट मिळेलच याची शाश्वती नसते. अशात जर रेल्वेचे तिकीट मिळाले तर प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा आनंद गगनात मावेनासा होतो. सणासुदीच्या काळात तर रेल्वेचे तिकीट मिळणे खूपच अवघड होऊन जाते.

 

रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी अनेक वेबसाईट, तसेच मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. हे वेबसाइट्स आणि मोबाईल ॲप्स तिकीट मिळवून देण्याच्या बदलात कमिशन देखील घेतात. परंतु सध्या असेच एक रेल्वे तिकीट बुकिंग ॲप बरेच चर्चेत आहे. कारण हे ॲप रेल्वे तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानाचे तिकीट देत आहे. (TrainMan App Offer)

 

या रेल्वे तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking App) ॲपचे नाव ट्रेनमन (Trainman App Offer) आहे. यासह ट्रेनमनची वेबसाईट देखील उपलब्ध आहे. जर ट्रेनमनच्या वेबसाईटवरून तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर trainman.in ही वेबसाईट ओपन करावी लागेल. या वेबसाईटवरून तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या रेल्वेचे तिकीट बुक करू शकता.

 

तसेच जर तुम्हाला ट्रेनमनचे (TrainMan) मोबाईल ॲप हवे असेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून (Google Play Store) फ्री मध्ये हे ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमचे तिकीट बूक करू शकता. गुगल प्ले स्टोअर वर हे ॲप 19 MB साईजमध्ये उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअर वर या ॲपला 4.9 रेटिंग आहे. तसेच आत्तापर्यंत हे ॲप 1 कोटींपेक्षा अधिक(10 मिलियन) लोकांनी या ॲपला प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले आहे. या ॲपचा वापर करून तुम्ही ट्रेनचे रनिंग स्टेटस, ट्रेनचा वेग देखील पाहू शकता.

 

ट्रेनमन (Trainman) ॲपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे जर तुम्ही या ॲपचा वापर करून रेल्वेचे तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) करत असाल आणि तुमचे तिकीट कन्फर्म झाले नाही तर ट्रेनमन (Trainman) या ॲपकडून तुम्हाला विमानाचे तिकीट मिळेल. त्यामुळे तुमचा प्रवास तुम्हाला हव्या असलेल्या दिवशीच होईल. तुमच्या प्रवासाला कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. Trainman ॲपने Trip Assurance ( प्रवास आश्वासन) हे एक नवीन फीचर आणले आहे. या फीचर अंतर्गत रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानाच्या तिकिटाची गॅरंटी मिळत आहे.

 

या ॲपवरून तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता आपण पाहू शकतो. जर तुम्ही Trainman ॲपचा वापर करून रेल्वेचे तिकीट बुक करत असाल तर तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता 90 टक्के आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे. तर तुम्हाला Trip Assurance फिचरचा वापर करण्याचा सल्ला हे ॲप देते. यासाठी तुम्हाला फक्त 1 रुपया अधिक जमा करावा लागतो. जर तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता 90 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तर Trip Assurance या फीचरसाठी तुम्हाला छोटीशी रक्कम जमा करावी लागेल, ही रक्कम तिकीट आणि क्लासवर अवलंबून असणार आहे.

 

जर तुमचे रेल्वे तिकीट (Railway Ticket) कन्फर्म झाले तर Trip Assurance ची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल. परंतु जर तिकीट कन्फर्म झाले नाही तर ट्रेनमन ॲप (TrainMan) तुम्हाला त्याच दिवशी विमानाचे तिकीट देईल. परंतु यामध्ये एक बाब लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे Trip Assurance सर्विस सध्या फक्त राजधानी ट्रेनसाठी (Rajdhani Train) आहे.

 

म्हणजेच जर तुम्ही Trip Assurance या फिचरचा वापर करून राजधानी ट्रेनचे तिकीट बुक (Train Ticket Booking) करत असाल आणि तुमचे तिकीट कन्फर्म झाले नाही तर तुम्हाला मोफत विमानाचे तिकीट ,(TrainMan App Offer) मिळणार आहे. परंतु यामध्ये देखील एक महत्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे कंपनीने रेल्वे तिकीट बुक न झाल्यास, रेल्वे प्रमाणे तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत की नाही? याबाबत कुठलीही अधिक माहिती दिली नाही.

हेही वाचा: Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह

 27 तारखेला सूर्याप्रमाणे या राशींचे चमकेल भाग्य..

Kidney Health: या वाईट सवयी तुम्हाला आहेत का? असतील तर तुमची किडनी होऊ शकते निकामी.. 

Aadhar Card: आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, सरकारने घेतलाय हा निर्णय..

थंडीत रूमला गरम करणारी मशीन मिळतेय अवघ्या 600 रुपयात, वीजबिल देखील खूपच कमी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.