Virat Kohli: टी ट्वेण्टी क्रिकेट मधून विराटने जाहीर केली निवृत्ती; कोहलीच्या पोस्टमुळे एकच खळबळ..

0

Virat Kohli: नुकत्याच पार पडलेल्या टी-ट्वेंटी (T20 World Cup) विश्वचषकामध्ये भारतीय संघाची (Indian cricket team) कामगिरी सुमार राहिली. सूर्यकुमार यादव, (suryakumar Yadav) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) विराट कोहली (Virat kohli) वगळता एकाही भारतीय खेळाडूला ऑस्ट्रेलियामध्ये (australia) झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ करता आला नाही. भारतीय संघाकडून t20 विश्वचषकामध्ये सांघिक खेळ झाला नसल्याने भारताला सेमी फायनलमध्येच (semifinal) आपला गाशा गुंडाळावा लागला. खरंतर सेमी फायनलमध्ये देखील आपली जागा निश्चित करण्यासारखा खेळ भारतीय संघाकडून झाला नाही.

भारताच्या गटात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे दोनच बलाढ्य संघ होते. याव्यतिरिक्त भारताच्या गटात नेदरलँड, झिम्बाब्वे, आणि बांगलादेश या संघाचा समावेश होता. त्यामध्ये भारताने फक्त पाकिस्तान या बलाढ्य संघाला पराभूत केले. तेही विराट कोहलीच्या एका अविस्मरणीय खेळाच्या जोरावर. विराट कोहलीने आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ करत, हरलेला सामना चमत्कारिकरित्या जिंकून दिला. विराट कोहलीने (Virat Kohli) याच सामन्याची आज आठवण करून देताना, आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर social media account) चाहत्यांना (cricket fan) धक्का देणारं ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही संघाचा टी-ट्वेंटी विश्वचषकामधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne cricket ground) खेळवण्यात आला. भारत या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणून, मैदानात उतरला खरा, मात्र गोलंदाजांनी ठीक थांब कामगिरी केल्यानंतर, सुरुवातीच्या फलंदाजांनी पाकिस्तान गोलंदाजा समोर नांग्या टाकल्या. 6.1 षटकात केवळ 31धावांत भारताने चार फलंदाज गमावले. महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा भारताची मदार विराट कोहलीच्या खांद्यावर आली. आणि पुन्हा एकदा विराट कोहलीने इम्पॉर्टंट सामन्यांचा (important matches) किंग आपणच असल्याचे सिद्ध करून दाखवले.

चेस मास्टर (chase master) म्हणून नावलौकिक मिळवलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) सुरुवातीच्या षटकांमध्ये संयमी खेळ करत डावाला आकार दिला. संधी मिळेल तिथे चौकार षटकार खेचत विराट कोहलीने शेवटपर्यंत या सामन्याच्या आशा जिवंत ठेवल्या. सामना जसा जसा पुढे जाऊ लागला, तसं पार्ड पाकिस्तानच्या बाजूने झुकू लागलं. मात्र विराट कोहलीला आपल्या खेळावर पूर्ण विश्वास होता. आठ चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता होती. (8 ball 28 run to win) तेव्हा मात्र भारत हा सामना पराभूत होईल, असं चित्र होतं. समालोचकांनी देखील भारत हा सामना जिंकण जवळपास अशक्य असल्याचे म्हटलं.

मात्र विराट कोहलीने हरिस रौफला (Harish Rauf) दोन चेंडूवर सलग दोन अप्रतिम षटकात खेचत सामन्यात जीव आणला. (Two ball back to back two sixes) विराट कोहलीने लगातार खेचलेले दोन षटकार क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट षटकार असल्याचं अनेक दिग्गजांनी म्हटलं. आयसीसीने (ICC) देखील या विश्वचषकामधला विराट कोहलीने बॅक फुटवर (back foot) जाऊन गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला षटकार हा या स्पर्धेतला सर्वोच्च षटकार असल्याचं निश्चित केलं. अखेरचा षटकात भारताला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्या Hardik (Pandya) झेलबाद झाला.

हार्दिक पांड्या झेलबाद झाला असताना पुन्हा एकदा सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला. पुढच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) विराट कोहलीला स्ट्राइक दिली. विराट कोहलीने पुढच्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. तीन चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीच्या बॅटकडे (bat) लागून राहिल्या. तब्बल 90 हजार क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीत हा सामना अनेक चढउतार घेत असल्याचं पाहायला मिळत होतं. मोहम्मद नवाझच्या (Mohammed Nawaz) चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने फुलटॉस चेंडूवर जबरदस्त फटका मारला आणि चेंडू सीमारेषेपार केला.

शेवटच्या षटकामध्ये देखील प्रचंड चढउतार राहिलेला हा सामना अखेर शेवटच्या चेंडूवर भारताने जिंकला. विराट कोहलीने भारताला हा सामना चमत्कारिकरित्या जिंकून दिला. विराट कोहली हा फक्त किंगच नाही, तर अलौकिक आणि बुद्धिमान खेळाडू असल्याचे गौरवोद्गार अनेक समलोचकांनी काढले. कठीण काळामध्ये विराट कोहलीला अनेक दिग्गजांच्या टीकेचा सामना करावा लागला. एवढेच नाही, तर भारतीय नियमक मंडळाने (BCCI) विराट कोहलीची कर्णधार (captain) पदावरून देखील हकालपट्टी केली. अनेकांनी t20 विश्वचषकामध्ये विराट कोहलीला वगळण्यात यावं असे देखील म्हटलं.

कर्णधार रोहित शर्मा,विराट कोहली, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन यासह भुवनेश्वर कुमार या खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याची देखील चर्चा रंगली असतानाच, विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या सामन्याची आठवण करून देताना विराट कोहलीने एक भावनिक पोस्ट केल्याने चाहते चिंतेत आहेत.

कोहलीने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो आणि त्याला भावनिक कॅप्शन देत एक पोस्ट पोस्ट केली. विराट कोहलीने शेअर केलेली ही पोस्ट पाहून चाहते प्रचंड घाबरले. विराटने निवृत्ती घेतली की काय? (Virat Kohli retirement) अशी चिंता क्रिकेट चाहत्यांना पडली आणि चहात्यांनी निवृत्ती संदर्भात अनेक कमेंट्स देखील केल्या. सर कृपया धक्का बसणाऱ्या अशा पोस्ट आपल्या सोशल अकाउंटवरून शेअर करू नका. अचानक असा फोटो आणि कॅप्शन पाहिल्याने तुम्ही निवृत्ती घेतली की काय? असं वाटलं. आणि धक्का बसला.

विराट कोहलीने आपल्या सोशल अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये बॅट उंचावत पवेलियनमध्ये जाताना पाहायला मिळत आहे. साहजिकच यामुळे चहात्यांना विराट कोहली आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतो की काय? अशी शंका उपस्थित झाली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देखील अशाच प्रकारची पोस्ट करत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. विराट कोहली महेंद्रसिंग धोनीचा खूप आदर करतो. त्याला आपला आयडल मानतो. सहाजिकच त्यामुळे तो त्याच्याप्रमाणेच निवृत्ती घेतो की काय? अशी शंका चाहत्यांच्या मनात उपस्थित झाली.

कोहलीने आपल्या सोशल अकाउंटवरून एक फोटो पोस्ट करताना कॅप्शन देत लिहिलं आहे, भारत पाकिस्तान सामन्याचा तो दिवस माझ्या हृदयामध्ये कोरला गेला आहे. तो माझ्यासाठी नेहमी ऐतिहासिक असेल. 23 ऑक्टोंबरची ती रात्र माझ्या कायमस्वरूपी हृदयामध्ये कोरली गेली आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma Expulsion: टी-२० कर्णधार पदाच्या हकालपट्टीवर रोहित शर्माचा BCCI ला करारा जवाब; रोहितच्या उत्तराने राहूल द्राविडही अडचणीत..

Railway Bharti: 35,281 रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..

Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..

Bank Holiday December 2022: डिसेंबरमध्ये तब्बल 13 दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या तारखा..

Android मोबाईल वापरकर्त्यांचा मोबाईल होऊ शकतो हॅक, Google ने दिला हा इशारा.. 

Beauty Tips: हे पाच जीवनसत्व वाढवतात चेहऱ्याची चमक; जाणून घ्या कोणत्या पदार्थामधून मिळतात हे जीवनसत्व..

Breast Personality: स्तनाचा आकार सांगतो महिलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सर्व काही; अशा आकाराच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात वरदान..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.