Railway Bharti: 35,281 रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Railway Bharti: महागाई (inflation) बरोबरच बेरोजगारीने (unemployment) देखील उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत नोकरी असणं खूप आवश्यक असलं तरी, नोकरी मिळणं खूप कठीण झालं आहे. बेरोजगारीचा उच्चांक दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी काही विभागांमध्ये नोकरीच्या (nokari) संधी देखील उपलब्ध होत आहेत. साहजिकच यामुळे ज्या विभागात नोकरीच्या (job) संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्याची तयारी आणि प्रयत्न तुम्ही करणं गरजेचे आहे. जर तुम्ही रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्यासाठी तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.
भारतीय रेल्वे विभागामध्ये (Indian railway department) मार्च 2023 अखेरपर्यंत तब्बल 35,281 जागांची भरती (railway bharti) केली जाणार आहे. रेल्वे विभागाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली असून, मार्च 2023 पर्यंत या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेचे कार्यकारी संचालक अमिताभ शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian railway) भरण्यात येणाऱ्या या जागा केंद्रीय केंद्रीकृत सूचना यांच्या मार्गदर्शनाखाली भरण्यात येणार आहेत.
या भरती प्रक्रियेसंदर्भात बोलताना अभिताभ शर्मा म्हणाले, निकाल एकदम जाहीर होत असल्याने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना रोजगाराचा लाभ योग्यरीत्या मिळत नाही. अनेकजण यापासून वंचित राहतात. एका परीक्षेचा निकाल हा एकाच वेळी जाहीर झाल्यानंतर, उमेदवार विविध पदांसाठी एकाचवेळी पात्र होतात. सहाजिकच यामुळे, अनेकांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या जातात. असे देखील रेल्वे भरती प्रक्रिया संदर्भात बोलताना अमिताभ शर्मा म्हणाले.
मार्च 2023 पर्यंत भारतीय रेल्वे विभागामध्ये भरण्यात येणाऱ्या एकूण 35,281 जागांमध्ये पर्यवेक्षकीय संवर्गाकरिता नव्या तरतुदींबाबत देखील घोषणा करण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संदर्भात अनुकूल प्रतिसाद देत पर्यवेक्षकीय संवर्गाकरिता नव्या तरतुदींबाबत घोषणा केली. त्यामध्ये उमेदवारांना गट अ अधिकाऱ्यांसोबत वेतन श्रेणी गाठण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
यासंदर्भात मंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा करत येणाऱ्या चार वर्षांमध्ये त्याचबरोबर नव्या लेवल पर्यंत तब्बल पन्नास टक्के लोकांना गैरकार्य ग्रेडच्या माध्यमातून पदोन्नती देण्यासंदर्भात तरतूद देखील करण्यात येणार आहेत. साहजिकच त्यामुळे इलेक्ट्रिकल, एस अँड टी, ट्रॅफिक केमिकल, त्याचबरोबर मेकॅनिकल, सिव्हिल, मेटलर्जिकल, स्टोअर्स तसेच कमर्शियल विभागामध्ये तब्बल ऐंशी हजार पर्यवेक्षक फायदा घेणार आहेत.
जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत, अशांसाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. मार्च 2023 पर्यंत भारतीय रेल्वेत 35,281 रिक्त पदे भरण्यात येणार असल्याने, तुम्हाला या विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या विभागात भरती होण्याकरिता तुम्हाला तयारी करण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळणार आहे.
हे देखील वाचा MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..
Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..
Android मोबाईल वापरकर्त्यांचा मोबाईल होऊ शकतो हॅक, Google ने दिला हा इशारा..
Bank Holiday December 2022: डिसेंबरमध्ये तब्बल 13 दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या तारखा..
Google Search: असं नेमक झालं तरी काय? गूगलवरून कस्टमर केअरचा घेतला नंबर आणि पीएफमधून १.२३ लाख गायब
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम