Helath: हे 5 पदार्थ जे पुन्हा गरम करुन खायचे नाहीत? नाहीतर होतील हे गंभीर परिणाम

Health: आपण आपल्या घरात तयार केलेले  किंवा हॉटेल मध्ये ऑर्डर दिलेले जेवण टाकून देऊ नये असे सर्वजण सांगत असतात. कारण अन्न हे पूर्णब्रह्म! त्यामुळे ही गोष्ट देखील खरी आहे की अन्न वाया घालवू नये. बऱ्याचदा आपण शिल्लक राहिलेले अन्न गरम करून आपण खात असतो. शिळे अन्न गरम करून खात असाल तर त्याचे परिणाम देखील आपल्या शरीरावर होत असतो.  ते अन्न आपल्या स्वास्थ्यासाठी  घातक ठरु शकते.

पालक किंवा  हिरव्या पालेभाज्या ह्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. पालेभाज्यांमध्ये आपल्या शारीसाठी लागणारे महत्वाचे घटक असतात. परंतु रात्री या पालेभाज्या शिल्लक राहिल्यास त्या पुन्हा गरम करुन खाऊ नये. पालक या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आयर्न (Iron) असते. आयर्न आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. परंतु भाजी पुन्हा गरम केल्यामुळे या आयर्न ऑक्सिडाईजमध्ये (Oxidise) मध्ये रुपांतरीत होते आणि लोहाचे (Iron) ऑक्सिडेशन झाल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते.

बऱ्याचदा आपण सर्वांनी एक गोष्ट ऐकली असेल की शिळा भात गरम करून खाऊ नये. वास्तविक पाहता भात एकदा शिजल्यानंतर थंड झाला म्हणून पुन्हा गरम करून खाऊ नये. कारण  कच्चा तांदुळामध्ये शरीराला फायदेशीर असणारे जीवाणू असतात. तांदूळ शिजवून त्याचा भात केल्यानंतर देखील ते जिवाणू तसेच राहतात. परंतु  शिजलेला भात पुन्हा गरम करुन खाल्ल्यास या जीवाणूंचं रुपांतर विषाणूत होत असते. हे विषाणू शरीराला हानिकारक ठरू शकतात. पुन्हा गरम केलेला भात खाल्यामुळे शरीरात विष तयार होऊ शकते.

त्याचसोबत अंडे देखील आपण नेहमी खात असतो. अंडे उकडून, भुर्जी करून किंवा अन्य प्रकारे खात असतो. अंडे हे शरीरात प्रोटीन्स वाढवण्यासाठी  खाल्ले जाते. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणत प्रथिने (Proteins) असतात.  अंडे वारंवार उष्णतेच्या संपर्कात येते  त्यावेळी प्रथिनांना बाधा होत असते. त्यामुळेच अंडे गरम केल्यानंतर किवा त्याची भाजी असेल हे पुन्हा  गरम करून खाऊ नये.  पुन्हा गरम केल्यामुळे अंड्यामध्ये असणाऱ्या प्रथिनासोबत असणाऱ्या नायट्रोजनमुळे कॅन्सरचा होण्याची  शक्यता असते.

चिकन देखील पुन्हा गरम करुन खाऊ नये. त्यामुळे देखील शरीराला हानी होऊ शकते. मशरूमसुद्धा एकदा शिजवल्यानंतर थंड झाल्यानंतर पुन्हा गरम करू नये.  व शिळे  मशरूम देखील खाण्यासाठी ठेऊ नये. कारण त्यातील काही घटकांमुळे पचन प्रक्रियेला बाधा होत असले.

या प्रकारे जर आपण आपल्या आहाराबाबत नियम पाळले तर आपण आपल्या शरीराला जास्त काळ तंदुरुस्त ठेऊ शकतो. आपले शरीर ही आपली फार मोठी संपत्ती आहे. आपण निरोगी असेल तरच आपण आपले जीवन समाधानी जगू शकतो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी काय फायदेशीर आहे आणि काय हानिकारक आहे? हे पाहणे खूप महत्वाचे असते. ( Helath is very important for happy lifestyle)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.