Health Tips: शारीरिक संबंधामध्ये खंड पडल्यास मानसिकतेवर आणि शरीरावरही होतात हे गंभीर परिणाम..

Health Tips: शारीरिक संबंध हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. खरंतर अशा विषयांवर आपल्या समाजात उघडपणे बोलणं टाळलं जातं. मात्र शारीरिक संबंध हे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा विषय आहे. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र एका संशोधनातून शारीरिक संबंधात दीर्घकाळ खंड पडला असेल, तर अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही अनेक दिवसांपासून शारीरिक संबंध ठेवले नसतील, तर तुम्हाला कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागू शकतं, जाणून घेऊया सविस्तर.

निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. याविषयी प्रत्येकाला माहिती आहे. मात्र जर निरोगी आरोग्य त्याचबरोबर मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचं असेल, तर तुम्हाला नियमित सेक्स करणं देखील आवश्यक आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? होय तुम्ही बरोबर वाचलंय. मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल, तर तुम्ही नियमित सेक्स करणं आवश्यक आहे. NCBI च्या अहवालानुसार, शारीरिक संबंधांमध्ये खूप मोठा खंड पडला असेल, तर कोणकोणत्या समस्या निर्माण होतात, याविषयी जाणून घेऊया सविस्तर. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

NCBI या संस्थेकडून या संदर्भात एक सर्वे करण्यात आला. यामध्ये अनेक स्त्रिया आणि पुरुषांनी गेल्या एका वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले नसल्याचा समावेश होता. यात असेही असंख्य स्त्री-पुरुष होते, ज्यांनी गेल्या चार, पाच वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले नाहीत. NCBI संस्थेने या विषयावर अभ्यास केल्यानंतर, काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये काही वर्षापासून शारीरिक संबंध न केलेल्या हजारो जोडप्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. सेक्स आणि आनंद या दोन गोष्टींना वेगळे करता येत नसल्याचं देखील या सर्वेतून समोर आलं आहे. जाणून घेऊया अधिक.

मानसिक तणाव: सेक्स करताना तुमच्या शरीरात Endorphins त्याचबरोबर Oxytocin नावाचे आनंदी हार्मोन्स’ संचारत असते. हे हार्मोन्स आनंदी आणि तणावापासून स्वतःला मुक्त ठेवण्यासाठी खूप आवश्यक असते. साहजिकच जर तुमच्या लैंगिक संबंधांमध्ये खूप अंतर पडलं असेल, तर हे हार्मोन्स शरीरामध्ये संचारत नाही. आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिक तणावावर होतो. तुमचं मानसिक आरोग्य त्याचबरोबर तणावापासून स्वतःला दूर ठेवायचं असेल, तर तुमच्या लैंगिक संबंधांमध्ये अंतर पडणे योग्य नाही. मानसिक तणावामुळे तुम्ही नैराश्यामध्ये देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हृदयविकाराच्या समस्या: तुमच्या शारीरिक संबंधांमध्ये खूप अंतर पडलं असेल, तर तुमच्यासाठी हे योग्य नाही. कारण यामुळे तुम्हाला हृदयविकाराच्या समस्या उद्भवू शकतात. से क्समुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामधील कॅलरीज बर्न होतात. हे तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं वाचलं देखील असेल. से क्स करतेवेळी तुमचं हृदय जोर जोरात धडकत असतं. साहजिकच यामुळे रक्त प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात संचारला जातो. आणि यामुळे तुम्ही हृदयांच्या आजारांपासून लांब राहतात. तुमच्या शारीरिक संबंधामध्ये खंड पडला असेल, तर तुम्हाला या समस्या उद्भवू शकतात.

स्मरणशक्तीवर परिणाम: नियमित सेक्स करणाऱ्या आणि महिन्यातून सेक्स करणाऱ्यांचा एक सर्वे करण्यात आला. या अभ्यासातून स्मरणशक्तीवर परिणाम होत असल्याची माहिती समोर आली. नियमित सेक्स करणाऱ्यांची स्मरणशक्ती कधीतरी सेक्स करणाऱ्यांपेक्षा उत्तम असल्याचं समोर आलं. हा सर्वे 50 ते 90 वयोगटाततील सदस्यांचा करण्यात आला होता. नियमित सेक्स केल्याने तुमची स्मरणशक्ती उत्तमरित्या काम करते. आणि तुम्ही ताजे तणाव राहण्यास देखील मदत होते.

नातेसंबंधावर परिणाम: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास नातेसंबंधावर देखील परिणाम होतात. अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. नियमित सेक्स केल्यास तुमच्या नात्यांमधील ओलावा टिकून राहतो. शारीरिक संबंधामध्ये अधिक अंतर पडल्यास तणाव निर्माण होतो. साहजिकच याचा तुमच्या नात्यावर परिणाम होतो.

रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम: शारीरिक संबंधामध्ये अधिक अंतर पडलं असेल, तर तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर देखील याचा परिणाम होतो. रोगप्रतिकारशक्तीवर याचा परिणाम झाल्यामुळे तुम्ही अनेक आजारांना देखील आमंत्रण देता. सर्दी त्याचबरोबर वायरल इन्फेक्शन यासारख्या समस्या तुम्हाला सामान्य माणसाच्या तुलनेत अधिक प्रमाणात उद्भवण्याची शक्यता असते. ‘से’ क्स केल्याने तुमच्या शहरांमधील अँटीबॉडीचे प्रमाण वाढण्याचे काम होते. यामुळे तुमचं शरीर आजारांशी सामना करण्याची ताकद निर्माण होते.

इच्छा कमी होते; शारीरिक संबंधमध्ये खंड पडत गेला, तर हळूहळू तुमची सेक्स करण्याची इच्छा देखील कमी होत जाते. साहजिकच याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो, याविषयी आपण सविस्तर जाणून घेतलंच. नियमीत सेक्स करणाऱ्यांमध्ये सेक्स करण्याची इच्छा देखील वाढत जाते.

 हे देखील वाचाTea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे सात गंभीर परिणाम..

व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Relationship Tips: मुलं आपल्या वयापेक्षा कमी मुलींकडेच जास्त आकर्षित का होतात? ही 5 कारणे जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Second hand bike: 15, 22 आणि 28 हजारांच्या तीन Honda CB Shine विकल्या जात आहेत या ठिकाणी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Hyundai i20‌; जाणून घ्या कुठे सुरू ऑफर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.