Tea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे ‘सात’ गंभीर परिणाम..

Tea Side Effects: आपल्या देशात सकाळी उठल्यानंतर एक कप घेण्याची पद्धत जवळजवळ सगळीकडे पाहायला मिळते. अनेक जण तर “बेड-टी” म्हणजेच उठल्यानंतर बेडवरच चहा पितात. उठल्यानंतर चहा पिल्याने तात्पुरतं फ्रेश वाटतं, हे जरी खरं असलं तरी सकाळी उठल्यानंतर रिकामपोटी चहा पिण्याचे तोटे देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना सकाळी उठल्यानंतर एक कप चहा पिला नाही, तर दिवसभर कंटाळवाने देखील वाटते. थोडक्यात सांगायचं झालं तर, अनेकांच्या आयुष्यात चहा ही जीवनावश्यक वस्तू झाली आहे. तुम्ही देखील सकाळी उठल्या उठल्या चहा पीत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी निरोगी आहार घेणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये काय खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून असते. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात धावपळ वाढली असल्याने, आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे देखील झाले आहे. कदाचित चहा पिण्याचे फायदे आणि तोटे तुम्ही यापूर्वी वाचलेही देखील असतील. चहाचे तोटे जर तुम्हाला माहिती नसतील, तर तुम्हाला हे जाणून घेणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. माणसाचा लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य याचा थेट संबंध आहे. यावरूनच आपल्या आहाराला किती महत्त्व आहे, हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी चहा पिल्याने आपल्या शरीरावर कोणते सात गंभीर परिणाम होतात? याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊ.

ब्लोटिंग, गॅसची समस्या:

सकाळी उठल्यानंतर, जर तुम्ही रिकाम्यापोटी चहा पिला तर तुमच्या पचनसंस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात आघात होतो. ब्लोटिंग आणि गॅसच्या समस्येचा तुम्हाला सामना करावा लागतो. अनेकांना वर्षानुवर्ष सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची सवय लागल्याने ही सवय क्षणात सुटणार नाही, ही गोष्ट खरी आहे. मात्र त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर विदाऊट शुगर ‘ब्लॅक कॉफी’ देखील घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरात तुम्हाला ऊर्जा आल्यासारखं देखील वाटेल, आणि पचनसंस्थेवर देखील याचा परिणाम होणार नाही.

चक्कर येण्याचे प्रकार

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिल्याने चक्कर येण्याची शक्यता असते. चहात केफिन नावाचा घटक असतो, जो तुमच्या शरीरासाठी खूप घातक मानला जातो. चहा पिल्याने तात्पुरतं फ्रेश वाटत असलं तरी, दिवसभर याचा परिणाम तुमच्या शरीरावर देखील होत असतो. अनेकदा रिकाम्यापोटी चहा पिल्याने चक्कर किंवा ग्लानी आल्याचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे ‘डीहायड्रेशन’ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि म्हणून तुम्ही रिकाम्या पोटी सकाळी उठल्यानंतर चहा पिणे टाळणं आवश्यक आहे.

भूक न लागणे

जर तुम्ही नियमित रिकाम्यापोटी चहा पीत असाल, तर तुम्हाला दिवसभरात खूप कमी भूक लागते. साहजिकच याचा परिणाम तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर देखील होतो. आणि तुम्ही आजाराला आमंत्रण देता. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी शरीराला पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. जी तुम्ही घेत असलेल्या आहारातून मिळते. मात्र चहा घेत असल्याने, भूक कमी लागते. आणि आपण जेवणाकडे दुर्लक्ष करतो. साहजिकच याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात देखील चहा पिणं योग्य नाही.

झोप लागत नाही

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिल्याने याचा मोठा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. दिवसभर किंवा सकाळी उठल्यानंतर, चहा पिल्याने तुम्हाला खूप कमी प्रमाणात झोप लागते. जसं की तुम्हाला माहिती असेल, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे फार आवश्यक आहे. मात्र नियमित चहा पिल्याने तुमची झोप बिघडते. पुरेशी झोप न मिळाल्याने रक्तदाबासारख्या गंभीर आजाराला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण होते. आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात देखील चहा घेणं जितकं टाळाल, तितकं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

पोटात जळजळ

रिकाम्यापोटी चहा पिल्याने पोटाचे गंभीर आजार उद्भवतात. सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटात जळजळ तर होतेच, मात्र या व्यतिरिक्त मळमळ, उलट्या इत्यादी समस्या देखील उद्भवतात. जर तुम्ही चहा शिवाय जगू शकत नसाल, तर तुम्ही किमान रिकाम्या पोटी चहा पिणं टाळलं पाहिजे. आणि जितकं शक्य होईल, तितक्या कमी प्रमाणात चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

ऍसिडिटी

रिकाम्या पोटी चहा पिल्याने ऍसिडिटीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात उद्भवते. साहजिकच याचा गंभीर परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो. आणि मग तुम्ही लठ्ठपणाला देखील सामोरे जाता. ऍसिडिटी सारखी गंभीर समस्या टाळायची असेल, तर तुम्ही चहा पिणं टाळणं आवश्यक आहे. छातीत जळजळ: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने फक्त पोटाची समस्या उद्भवते असं नाही, तर छातीत देखील जळजळ होते. तुमच्या आतड्यांमध्ये चहामुळे ऍसिड निर्माण होऊ शकते. यामुळे छातीत जळजळ होते, आणि म्हणून चहा पिणं टाळणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा Hair fall tips: आहारात या दोन पदार्थाचा समावेश केल्यास केस गळती थांबून १५ दिवसांत येतात घनदाट केस..

Beauty Tips: हे पाच जीवनसत्व वाढवतात चेहऱ्याची चमक; जाणून घ्या कोणत्या पदार्थामधून मिळतात हे जीवनसत्व..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

SSC JE Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या पदांसाठी निघाली मेगा भरती; असा करा अर्ज..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.