Hair fall tips: आहारात या दोन पदार्थाचा समावेश केल्यास केस गळती थांबून १५ दिवसांत येतात घनदाट केस..

Hair fall tips: पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात केसांची समस्या उद्भवते. अलीकडच्या काळात अनेकांनाही केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे पाहायला मिळते. केस गळण्याची समस्या ही काहींना अनुवंशिक असू शकते. मात्र बहुतेक प्रमाणात केस गळतीला लाइफस्टाईल कारणीभूत असते. तणाव, धावपळ, वेळेवर योग्य आहार न मिळणे, यामुळे केस गळतीची समस्या उद्भवते. अनेकांना तरुण वयामध्येच टक्कल पडल्याचे देखील पाहायला मिळतं. तुम्हाला देखील केस गळतीची समस्या असेल आणि डोक्याचे घनदाट केस पुन्हा मिळवायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

स्त्री असो की पुरुष प्रत्येकाच्या सौंदर्यात केस हा महत्त्वाचा भाग आहे. केसामुळे सौंदर्य अधिक उठून दिसतं. सुरुवातीला केस गळतीकडे लक्ष दिलं नाही, तर मोठ्या प्रमाणात डोक्यावर टक्कल पडू शकतं. साहजिकच टक्कल पडल्यामुळे वीस एकवीस वर्षाचा मुलगा देखील तीस-पस्तीस वर्षाचा पुरुष वाटू लागतो. आणि म्हणून केस गळतीच्या समस्येला गांभीर्याने घेऊन यावर वेळेतच उपाययोजना करणे आवश्यक आहे. केस गळती पासून स्वतःला दूर ठेवायचं असेल, आणि डोक्यावरील गेलेल्या केसांना देखील परत मिळवायचे असेल, तर तुम्हाला फार काही करावे लागत नाही. फक्त दैनंदिन आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही या समस्या मुळासकट दूर करू शकता. जाणून घेऊया सविस्तर.

केसाची समस्या उद्भवल्या नंतर अनेक जण बाजारात मिळणाऱ्या उत्पादकांवर विश्वास ठेवून उपचार घेतात. कालांतराने लक्षात येतं, याचा कसलाही परिणाम आपल्या केस गळतीवर झालेला नाही. कोणत्याही केमिकल युक्त प्रोडक्टचा वापर करण्याऐवजी आपण नेहमी नैसर्गिक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असतं. केमिकल युक्त प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या डोक्यावरची केस आणखीनच गळायला सुरुवात होतात. हा अनुभव प्रत्येकाला आला असेल. कोणत्याही समस्येचे मूळ ओळखून नष्ट करणे आवश्यक असते. केसाला पोषक असणारे जीवनसत्त्व आपल्या आहाराद्वारे मिळाले नाही, तर केस गळती उद्भवते. हा बेसिक प्रश्न आपण लक्षात घेण आवश्यक आहे. आणि म्हणून केसाला उपयुक्त असणाऱ्या जीवनसत्त्वाचे आहारातून सेवन करणे आवश्यक आहे.

केस गळती थांबून घनदाट केस येण्यासाठी तुम्हाला काही पदार्थांच्या बियांचे सेवन करणे आवश्यक आहे. या बियांमधून केसांसाठी उपयुक्त असणारे गुणधर्म तुम्हाला मिळतात. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. निरोगी आरोग्य ठेवायचं असेल, तर निरोगी आहार घेणं फार आवश्यक असतं. त्याचप्रमाणे शरीरातील कोणत्याही अवयवांना निरोगी ठेवायचे असेल, तरीदेखील तुम्हाला निरोगी आहारच उपयुक्त ठरतो. आळशी, भोपळ्याच्या बिया, मेथीचे दाने याचा वापर करून तुम्ही केस गळती थांबवू शकता. जाणून घेऊया सविस्तर.

अळशी

केसाच्या निरोगी आरोग्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड खूप महत्त्वाचं कार्य पार पाडते. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात असेल, तर तुम्हाला केसाची समस्या अजिबात जाणवणार नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी अळशीच्या बिया खूप उपयुक्त ठरतात. नियमित सेवन केल्याने शहरांमध्ये असणारे खराब कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, इत्यादी घटक देखील या बियांमधून तुम्हाला मिळू शकतात. आणि म्हणून या बियाचे नियमित सेवन करणे फार आवश्यक आहे.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियाचं नियमित सेवन केल्याने तुम्हाला ‘क’ ‘ए’ ‘बी’ हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. हे जीवनसत्व केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. या जीवनसत्वाबरोबरच भोपळ्याच्या बियांमध्ये तांबे हे जीवनसत्व देखील केसांच्या वाढीसाठी खूप प्रभावी ठरते. भोपळ्यांच्या बिया जर तुम्हाला खाताना चव देत नसतील, तर तुम्ही त्या भाजून देखील खाऊ शकता. भाजल्यानंतर या बिया खूप टेस्टी लागतात. किंवा याच बिया तुम्ही ओट्स खाताना देखील त्यात मिसळून खाऊ शकता.

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यामुळे मधुमेहावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकतं, हे तुम्हाला देखील माहिती असेल. मेथीचे दाणे केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी आणि केसाच्या आरोग्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरतात. मेथीच्या दाण्यांमध्ये असणारे पोषक घटक केसांमध्ये असणारा कोंडा त्याचबरोबर केस गळतीवर देखील मोठ्या प्रमाणात काम करतात. मेथीच्या दाण्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटेन्शिअम मिळते. जे केसांसाठी खूप उपयुक्त ठरते. मेथीचे दाणे खाण्याची पद्धत म्हणजे, हे दाने तुम्ही रात्री भिजत ठेवा. आणि सकाळी उठल्यानंतर बारीक करून खावा.

हे देखील वाचा SSC JE Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या पदांसाठी निघाली मेगा भरती; असा करा अर्ज..

Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

Beauty Tips: हे पाच जीवनसत्व वाढवतात चेहऱ्याची चमक; जाणून घ्या कोणत्या पदार्थामधून मिळतात हे जीवनसत्व..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.