SSC JE Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या पदांसाठी निघाली मेगा भरती; असा करा अर्ज..

SSC JE Recruitment 2022: महागाई बरोबरच बेरोजगारीची (unemployment) देखील मोठी समस्या निर्माण झाली आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील अनेकांना नोकरी पासून वंचित राहावे लागत आहे. सद्या देशात बेजरगरीची मोठी समस्या निर्माण झाली असली तरी आता काही क्षेत्रात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत. मात्र अनेकांना याविषयी माहिती मिळत नाही. आणि अनेकजण पात्र उमेदवार यापासून वंचित राहताना पाहायला मिळतात. ही बाब लक्षात घेऊन आम्ही नोकरी संदर्भात प्रत्येक अपडेट उमेदवारापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने (staff selection commission) विविध पदांसाठी भरती आयोजित केली असून या संदर्भातली अधिसूचना देखील जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल & मेकॅनिक इंजिनिअर या पदांसाठी भरती असल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर 2022 ठेवण्यात आली आहे. तर उमेदवारांना १२ ऑगस्ट पासून अर्ज करता येणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निवड करण्यात येणाऱ्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिक इंजिनिअर या उमेदवारांची पात्रता त्याचबरोबर वयोमर्यादा, पगार, परीक्षा फी, आणि ऑनलाईन अर्ज कसा कार्याचा याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादे विषयी जाणून घेऊया.

वयोमर्यादा

सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिक इंजिनिअर या उमेदवारांची निवड स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी कॅटेगरी नुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांचे वय हे एक जानेवारी 2022 रोजी ३० वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. हे वय ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी ठेवण्यात आले आहे. तर SC आणि ST च्या उमेदवारांसाठी ३५ वर्षाची मर्यादा असणार आहे. त्याचबरोबर OBC उमेदवारांसाठी ही मर्यादा ३३ वर्षे असणार आहे. आता आपण उमेदवारांची पात्रता जाणून घेऊया.

शैक्षणिक पात्रता:

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवारांचे शिक्षण हे कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सिव्हिल डिप्लोमा, मेकॅनिकल पदवी किंवा डिप्लोमा, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा होणे आवश्यक आहे. नोकरी करण्याच्या ठिकाणा विषयी जाणून घ्यायचे झाल्यास उमेदवारांना भारतात कुठेही नोकरी करावी लागणार आहे.

परीक्षा फी आणि पगार

विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केल्यानंतर उमेदवारांना वेतन हे श्रेणी नुसार दिले जाणार आहे. यामध्ये ३५ हजार ४०० ते १ लाख बारा हजार चारशे रुपयांर्यंत असणार आहे. या परीक्षा ‘फी’ विषयी जाणून घ्यायचे झाल्यास परीक्षा फी ही उमेदवारांच्या कॅटेगीरी नुसार असणार आहे. यामध्ये ओपन आणि obc उमेदवारांसाठी १०० रूपये, तर SC/ST आणि PWD च्या अधिकाऱ्यांसाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी देखील फी आकारण्यात येणार आहे.

अशी केली जाणार निवड

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत करण्यात येणाऱ्या निवडीचा विचार कार्याचा झाल्यास उमेदवारांची निवड ही CBT चाचणीद्वारे करण्यात येणार आहे. CBT म्हणजे संगणक आधारित चाचणी होऊन मेरिट लावले जाणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर 2022 होणार आहे. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना तारीख देण्यात येईल.

असा करा ऑनलाईन अर्ज

इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज कार्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन https://ssc.nic.in/ असं सर्च करणे आवश्यक आहे. हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर स्टाप सिलेक्शन कमीशन अॉफ इंडियाची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल. त्यानंतर तुम्ही लगेच लॉगिन करून सविस्तर माहिती भरून तुमचा अर्ज करू शकता. अधिसूचना पाहण्यासाठी यावर क्लिक करा

डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

खोकला उपाय: खोकल्यासाठी हे पाच घरगुती उपाय आहेत रामबाण औषध..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

VIRAL VIDEO: भल्या मोठ्या सापाशी दोन हात करत कुत्र्याने असं वाचवलं मालकाला; व्हिडिओ पाहून होईल पाणी पाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.