Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

0

Relationship tips: प्रत्येकाला आयुष्यात आपल्यावर जीवापाड प्रेम ( love) करणारा एखादा पार्टनर (partner) हवा असतो. मात्र प्रत्येकाला आपल्या म्हणण्यानुसार पार्टनर मिळेलच असं नाही. अलीकडच्या काळात तर खरं प्रेम (true love) मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे. अनेक जण आपल्या गरजेनुसार नातेसंबंधात (relationship) येतात, आणि खोटं प्रेम करण्याचे नाटक देखील करतात. साहजिकच यामुळे समोरच्या व्यक्तीचा विश्वासघात होतो, आणि मग पश्चातापाशिवाय त्याच्याकडे काहीही शिल्लक राहत नाही. तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

माणूस एखाद्याच्या प्रेमात पडला की, किळसवाणे वाटणारं जग त्याला अचानक सुंदर वाटू लागतं. प्रेम ही भावना असते, ती शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही. असं अनेकांनी म्हंटल आहे. मात्र तुमच्यावर खरंच कोणी प्रेम करत आहे की फक्त गरजेमुळे नातेसंबंधात आहे, हे ओळखणे देखील फार आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खरंतर अशा विषयांवर आपण उघडपणे बोलायला तयार नसतो, मात्र या विषयावर बोलणं अलीकडच्या काळात खूप आवश्यक बनलं आहे. समोरचा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत आहे, की नाही हे कसं ओळखायचं? जाणून घेऊया सविस्तर.

समोरच्या व्यक्तीच आपल्यावर प्रेम आहे की नाही? की फक्त आकर्षण आहे? हे ओळखण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. कोणत्याही नात्यांमध्ये वादविवाद होत असतात. हे अधिक सांगण्याची गरज नाही. मात्र वादविवाद झाल्यानंतर देखील समोरचा व्यक्ती नातं टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असेल, तर त्याला या नात्याची किंमत आहे. आणि तो तुमच्यावर प्रेम करत आहे. असं आपण म्हणू शकतो. प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट असतो, मात्र प्रेमात असणारी व्यक्ती कधीही सेल्फ रिस्पेक्टचा विचार करत नाही.

नाते वाचवण्यासाठी हे करत असेल तर..

प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे कितीही वाद-विवाद झाले, तरी देखील आपले नातेसंबंध तुटावेत असं वाटत नाही. प्रेमात पडलेल्या व्यक्तीं एकमेकांच्या सेल्फ रिस्पेक्टचा विचार करतात. खरं प्रेम असेल तर, पार्टनरचा आत्मसन्मान दुखावला जाऊ नये, याचा दोघांकडूनही विचार होतो. मात्र एखाद्या वेळेस जर सेल्फी रिस्पेक्ट दुखवण्याची परिस्थिती निर्माण झालीच तर आपलं नातेसंबंध टिकवण्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट विषयी फारसं काही वाटत नसेल, तर आपण समोरच्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करत आहोत, असं समजण्यास हरकत नाही.

या गोष्टी वाटतात चांगल्या: जर तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करत असाल, तर समोरच्या व्यक्तीची कोणतीही गोष्ट तुम्हाला चांगली वाटू लागते. अगदी बालिश वर्तन असेल, तरीदेखील ते चांगलं वाटू लागतं. तुमच्या बाबतीत देखील असं होत असेल, तर समजून जावा तुम्ही किंवा समोरची व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत आहे. असं म्हणतात, प्रेम हे आंधळ असतं त्याचप्रमाणे लहान मुलांसारखे वर्तन देखील प्रेमात चांगलं वाटू लागतं, याचाच अर्थ तुम्ही खऱ्या प्रेमात आहात.

गमावण्याची भीती नसते: तुम्ही खऱ्या प्रेमात असता, तेव्हा तुम्हाला आपला पार्टनर एखाद्या कारणाने दुखावेल आणि तो आपल्यापासून लांब जाईल, याची अजिबात भीती नसते. कारण तुम्हाला माहिती असतं, वाद-विवाद झाले तरीदेखील आपला पार्टनर आपल्याला सोडून जाणार नाही. तुमच्या नात्यांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झालेला असतो, याचा अर्थ तुम्ही खऱ्या प्रेमात असता.

त्याग

जर तुम्ही खऱ्या प्रेमात असाल, तर तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही कोणत्याही गोष्टीचा त्याग करता. मात्र त्याग करताना किंचितही दुःख जर होत नसेल, तर समजून जा तुम्ही खऱ्या प्रेमात आहात. त्याग हा माणसाला सर्वोत्कृष्ट बनवतो, हे वाक्य तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं किंवा वाचलं असेल. प्रेमात देखील त्यागाला खूप महत्त्व आहे. प्रेमात जर तुम्ही त्याग करण्याची भावना ठेवत असाल, तर तुमचं प्रेम आणखीन फुलतं. त्याचबरोबर तुम्ही खऱ्या प्रेमात आहात याची प्रचिती देखील तुम्हाला येते.  विरोधात बोललं तर..: तुमच्या पार्टनर विषयी कोणीही विरोधात किंवा तुम्हाला न पटणारं बोललं, तर तुम्हाला पटकन राग येत असेल, तर तुम्ही खऱ्या प्रेमात आहात. मग समोरचा व्यक्ती तुमच्या कितीही जवळचा असला, तरी देखील तुम्हाला त्याचा फरक पडत नाही.

दुःख होत असेल तर

तुमचा पार्टनर दुःखी झाला, तर तुम्हाला देखील वेदना होत असतील तर समजून जा तुम्ही खऱ्या प्रेमात आहे. जेव्हा तुम्ही खऱ्या प्रेमात असतात, तेव्हा तुमच्या पार्टनरची प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगली तर वाटतेच, मात्र काळजी देखील तितकीच वाटते. जर तुमच्या बाबतीत देखील असं होत असेल, तर समजून जा तुम्ही खऱ्या प्रेमात आहात. आठवण येणे: जर तुम्ही तुमच्या पार्टनर पासून खूप लांब राहत असाल, आणि तुम्ही एकटे असाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरची आठवण येत असेल, पार्टनरला भेटू वाटत असेल, तर तुम्ही खऱ्या प्रेमात आहात, असा त्याचा अर्थ होतो.

हे देखील वाचा Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..

Relationship tips: या  तीन गोष्टींमुळे पती आपल्या पत्नीवर घेतात संशय; आजच सुधारा या चुका अन्यथा.. 

Tea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे सात गंभीर परिणाम..

Hair fall tips: आहारात या दोन पदार्थाचा समावेश केल्यास केस गळती थांबून १५ दिवसांत येतात घनदाट केस..

Beauty Tips: हे पाच जीवनसत्व वाढवतात चेहऱ्याची चमक; जाणून घ्या कोणत्या पदार्थामधून मिळतात हे जीवनसत्व..

SSC JE Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या पदांसाठी निघाली मेगा भरती; असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.