Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..

Steel Rate: आपल्यालाही पक्क सुंदर घर असावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी प्रत्येक जण दिवस-रात्र मेहनत देखील करतो. मात्र तरी देखील अनेकांना आपल्या स्वप्नातलं घर बांधणं शक्य होत नाही. त्याची कारणे देखील तशीच आहेत. गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला कात्री लागल्याने अनेक जण नवीन घर बांधण्यासाठी दहा वेळा विचार करताना पाहायला मिळत आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच घरासाठी लागणारे स्टील (Steel) सिमेंट (Cement) वीट (Bricks) वाळूच्या (Sand) किंमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मात्र आता स्टीलच्या किंमती कमालीच्या उतरल्या असल्याने, नवीन घर बांधणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

जर तुम्ही देखील आता नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी स्टीलच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता त्याच किंमती तब्बल निम्म्यावर आल्या आहेत. स्टीलच्या किंमती निम्म्यावर आल्या असल्याने, आता घर बांधण्यासाठी जो खर्च लागणार होता, त्याची आता बचत होणार आहे. जर तुम्ही नवीन घर बांधणार असाल, तर घर बांधण्यासाठी हा सुवर्णकाळ आहे. स्टील (Steel) त्याचबरोबर वाळू (Sand) सिमेंट (Cement) वीट (Bricks) यांच्या किंमतीत मोठी घट झाली असल्याने, तुमचा अतिरिक्त होणारा खर्च आता वाचणार आहे. जाणून घेऊया आजच्या दराविषयी सविस्तर.

या महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यामध्ये स्टीलचे दर विक्रमी कमी झाल्या होत्या. मात्र आता देशातील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा स्टीलच्या किंमती वाढताना पाहायला मिळत आहेत. मात्र जानेवारी मार्चच्या तुलनेत सध्याचा स्टीलचा दर हा 30,000 ते 32,000 रुपयांनी स्वस्त असल्याने, तुमची मोठी बचत होणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असणाऱ्या मुंबईमध्ये देखील स्टीलचे दर हे प्रति टन 900 रूपयांनी वाढले असल्याने आता अनेकांच्या स्टील खरेदीसाठी हालचाली वाढल्याचे चित्र आहे. सध्या पावसाळ्यामुळे दरात घसरण झाली होती. आणि म्हणून स्टीलला मागणी वाढली. त्यामुळे आता स्टीलचे दर वाढू लागले आहेत. असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

जूनमध्ये स्टीलच्या किंमती घसरल्या

वर्षाच्या सुरुवातीला बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतींनी उच्चांक गाठला होता. देशाच्या इतिहासात आतापर्यंत स्टीलच्या किंमती एवढ्या कधीही वाढल्या नव्हत्या. मात्र त्यानंतर जून जुलैमध्ये स्टीलच्या किंमतीत सातत्याने घसरण होत गेली. दिवसेंदिवस स्टीलचे दर उतरत तब्बल निम्म्यावर आले. या काळात स्टील खरेदी करणाऱ्यांची मोठी झुंबड उडाल्याचे देखील पाहायला मिळाले. स्टीलला मागणी वाढल्याने स्टीलचे दर गेल्या दीड महिन्यांपासून दीड हजार रुपये वाढले आहेत. मात्र सध्या देशभरात जवळपास सगळीकडेच जोरदार पाऊस पडत असल्याने, बांधकाम क्षेत्राची कामे मंदावली आहेत. पाऊस उघडल्यानंतर बांधकाम क्षेत्राला वेग येणार असल्याने, स्टीलचे दर पुन्हा गगनाला भिडणार असल्याचं तज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

मार्चमध्ये स्टीलने गाठला होता उच्चांक

यावर्षी मार्चमध्ये अनेक ठिकाणी स्टीलच्या किमतींनी विक्रम केला होता. मार्चमध्ये स्टीलच्या किंमती जवळजवळ 90 हजार रुपये प्रतिटनापर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र आता हेच स्टील सध्याच्या दराविषयी सांगायचं झालं, तर 51 हजार ते साठ हजार रुपयांच्या आसपास प्रतिटन किंमतीने विकले जात आहे. जून महिन्यांत मात्र स्टीलचे दर तब्बल 40 ते 44 हजार रुपये प्रति टनांपर्यंत पर्यंत देखील आल्याचं पाहायला मिळाले होते.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्टीलच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा वाढू लागल्याचं चित्र असल्याने, नवीन घर बांधणाऱ्यांसाठी आता स्टील खरेदी करणे हे खूप फायद्याचे ठरू शकतो. स्टीलचे दर हे रोज बदलत असतात. तुम्हाला देखील तुमच्या शहरात स्टीलचे दर किती आहेत? हे जाणून घ्यायचं असेल, तरीदेखील जाणून घेऊ शकतो. आम्ही त्याविषयी देखील माहिती देतो आहोत.

जाणून घ्या तुमच्या शहरातील स्टीलचे आजचे दर

स्टीलचे दर हे वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे अपडेट करण्यात येतात. तुम्हाला देशातील महत्त्वाच्या शहरांमधील स्टीलचे दर पाहिजे असतील, तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन Ironmart असं सर्च करायचं आहे. ही वेबसाईट स्टीलच्या किंमतींच्या होणाऱ्या रोजच्या उपडेट विषयी माहिती प्रोव्हाइड करते. भारतातल्या प्रमुख शहरांमधील आजच्या स्टील दराविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. सध्या पश्चिम बंगालमध्ये त्याचबरोबर कोलकत्तामध्ये स्टीलचे दर 50 ते 51 हजार रुपये प्रति टन विकले जात आहे. उत्तर प्रदेश मधील कानपूरमध्ये मात्र हेच स्टील 9 ते 10 हजार रुपयांनी महाग विकले जात आहे.

हे देखील वाचा Tea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे सात गंभीर परिणाम..

Hair fall tips: आहारात या दोन पदार्थाचा समावेश केल्यास केस गळती थांबून १५ दिवसांत येतात घनदाट केस..

Beauty Tips: हे पाच जीवनसत्व वाढवतात चेहऱ्याची चमक; जाणून घ्या कोणत्या पदार्थामधून मिळतात हे जीवनसत्व..

Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

खोकला उपाय: खोकल्यासाठी हे पाच घरगुती उपाय आहेत रामबाण औषध..

पादणं म्हणजे नेमकं असतं तरी काय? त्याला थांबवलं जाऊ शकते का? कशामुळे जास्त वास येतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.