पादणं म्हणजे नेमकं असतं तरी काय? त्याला थांबवलं जाऊ शकते का? कशामुळे जास्त वास येतो?

0

पादणे शब्द उच्चारला तरी काही लोकांना विचित्र वाटते. कोण पादलं तर लगेच आपण त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पहात असतो. आम्ही शाळेत असताना तर काही मुलं कोण पादल तर त्याचा शोध घ्यायची. कुठून वास येतोय त्याच्यावरून अंदाज घ्यायची. चला हा झाला विनोदाचा भाग परंतु हा लेख वाचल्यानंतर पोटाच्या बऱ्याच समस्येबाबत तुम्हाला नवी माहिती मिळेल.

परंतु पादणं किंवा फार्ट म्हणजे आतड्यातला गॅस बाहेर काढण्याची एक प्रक्रिया आहे. यामुळे आपण खाल्लेलं अन्न पचतं. आपल्या पचनसंस्थेतील पोट, छोटे आतडे, मोठे आतडे, कोलन, गुदाशय या सर्व ठिकाणी गॅस असतो. आपल्या शरीरात जेव्हा गॅसेसचे प्रमाण वाढते त्यामुळे आपण पादत असतो. चला आपण सविस्तर जाणून घेऊया.

दिवसभर आपल्या शरीरात हवा जात असते. आपण जेव्हा काही खातो किंवा कार्बोनेटेड पेय घेतो तेव्हा आपल्या शरीरात जास्त प्रमाणात हवा जाते. आपल्या छोट्या आतड्यांत बॅक्टेरियाचं प्रमाण वाढल्याने सुद्घा आपल्या शरीरात गॅसेसचे प्रमाण वाढत असते. त्याचसोबत टाईप 2 प्रकारचा मधुमेह, जठराचा आजार असेल तरीसुद्धा तुमच्या शरीरात गॅसेसचे प्रमाण वाढते.

आपल्या छोट्या आतड्यातील विकरं खाल्लेलं सर्व अन्न पचवू शकत नाही. जेव्हा कमी पचलेली कर्बोदकं कोलोन किंवा गुद्द्वाराकडे पोहोचतात, तेव्हा बॅक्टेरिया त्या पदार्थाला हायड्रोजन किंवा कार्बन डायऑक्साईडमध्ये बदलवण्याचे काम करतात. शरीरात तयार झालेले सर्व गॅसेस बाहेर पडतात तर शरीर काही शोषून घेते.

शरीर काही गॅस शोषून घेत असते. परंतु त्याचा मोठा भाग मलाशयाच्या वरच्या भागात एकत्र येतो. कोलनच्या भिंतीवर प्रेशर यायला सुरुवात होते आणि आपलं पोट दुखण्यास सुरुवात होत असते. शिवाय आपल्या छातीतही अस्वस्थ वाटायला लागतं. अशा परिस्थितीत जर आपण पादलो तर आपल्याला शरीरातले गॅसेस बाहेर काढता येतात.

खरंतर आपल्या शरीरात तयार होणाऱ्या गॅसेसला थांबवण्याचा प्रयत्न करू नये. पादून आपल्या शरीरातील गॅस बाहेर काढायला हवा. परंतु आपण हे लक्षात घ्यावे की शरीरातील गॅस काही वेळानंतर बाहेर काढणं गरजेचं असतं. आपल्या शरीराला देखील तसे वाटत असतं. जर तुम्ही दिवसभरात गॅसेस जास्त तयार होणारे अन्नपदार्थ खाल्ले असतील आणि जास्त हवा शरीरात घेतली असेल तर रात्री तुम्हाला गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात होतो.

जेव्हा आपले आतडे आकुंचन पावतात तेव्हा तुमच्या शरीरात गॅसचे प्रमाण वाढू शकते. जेव्हा आपण प्रातर्विधीला जातो तेव्हा मलासोबत हवासुद्धा बाहेर पडते. व्यायाम करणारे किंवा खोकणाऱ्या लोकांना गॅस पास करण्याची सवय असते. जर तुम्ही किंवा तुमचा मित्र, घरातील व्यक्ती पादत असेल तर यामध्ये काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

कितीही नाही म्हटले तरी प्रत्येक व्यक्ती पादत असतो. परंतु काही लोक जास्त पादतात. साधारण एक व्यक्ती दिवसाला 5-15 वेळा पादत असते. परंतु काही लोकांना वाटत असेल की आपण जास्तच पादत आहोत तर त्यांनी उपाययोजना करायला हव्यात. आपण काय खातो? काय पितो यावर देखील पादणे अवलंबून आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे गरजेचे आहे.

पादल्यानंतर खूप घान वास येतोय मग हे करा:
वेळच्या वेळी जेवण करा. जेवढी भूक असेल त्यापेक्षा थोड कमी आणि चावून खा. कोणीतरी पाठलाग करत असल्यासारखं खाऊ नये. त्याचसोबत तुम्ही नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याचसोबत बऱ्याच लोकांना दिवसभर चघळायची सवय असते. विशेषत: चुईंगम खाणारे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात हवा घेत असतात.

सोडा, बियर सारखे बुडबुडे निघणारे पेय घेतल्याने शरीरात गॅस जास्त प्रमाणात तयार होत असतो. त्याऐवजी तुम्ही चहा, कॉफी, नॅचरल ज्यूस हे पेय प्यायला हवीत. सिगारेट ओढणाऱ्या लोकांना गॅसची समस्या जाणवू शकते. मलाषयात जास्त काळ मल राहिल्याने कुजतो आणि त्यामुळेच जेव्हा आपल्याला हगवण लागते तेव्हा बाहेर पडलेला मल जास्त दुर्गंधीदायक असतो.

महत्वाच्या बातम्या: Omicron Variant: कोरोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला धोका, सरकार घेणार लॉकडाऊनचा निर्णय.. 

Helath: हे 5 पदार्थ जे पुन्हा गरम करुन खायचे नाहीत? नाहीतर होतील हे गंभीर परिणाम 

Immunity Booster Fruits: आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी फळे 

Detergent In Fast Food: तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थात वापरतात कपडे धुण्याची पावडर, होतात असे परीणाम.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.