Omicron Variant: कोरोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला धोका, सरकार घेणार लॉकडाऊनचा निर्णय..

0

Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेत आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळला आहे. या नव्या व्हेरिएंटने जगातील शास्त्रज्ञांची डोकेदुखी वाढवली आहे. काही देशांकडून दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदीसुध्दा घालण्यात आली आहे. हा नवा व्हेरिएंट डेल्टा व्हेरियंट पेक्षाही अधिक घातक असल्याचा प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीची बैठक बोलवून यावर चर्चा केली आहे. महाराष्ट्रात या नव्या व्हेरिएंटच (Omicron Variant) परिणाम कितपत आहे किंवा जाणवू शकेल, याबाबत आता लोकांच्या मनात भिती निर्माण होत नाही.या नव्या व्हेरियंटविषयी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे बोलताना खुलासा केला आहे.

महाराष्ट्रात नव्या व्हेरियंटचा धोका वाढणार? कोरोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरियंटमुळे (Omicron Variant) महाराष्ट्रात आणि देशात सध्या तरी लगेच परिणाम होईल असे सध्यातरी वाटत नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. “दुसरी लाट डेल्टाने निर्माण केली, तशी तिसरी लाट अशा वेगळ्या एखाद्या व्हेरिएंटमुळे निर्माण होण्याची शक्यता असली, तरी त्याचा प्रसार आपण वेळेत थांबवला, तर आज चिंता करण्याचं कारण नाही. फक्त सतर्क राहावं लागेल एवढं मात्र नक्की”, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात नव्या व्हेरिएंटचचे रुग्ण आढळले का?
आरोग्य विभाग प्रत्येक जिल्ह्यातून साधारणपणे महिन्याला १०० सॅम्पल्स घेत आहे. त्या सॅम्पल्सचे जिनोमिक सिक्वेन्सिंग करत असतात.  डेल्टा व्हेरिएंटच आहे की अजून काही नवीन व्हेरिएंट आहेत याची तपासणी होत असते. आरोग्य विभाग अजून यावर काम करतच आहे. यामध्ये अद्याप नवीन (Omicron Varient) व्हेरिएंट आढळून आला नाही.

दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या लोकांवर बारकाईने पाळत ठेवण्याचं काम आम्ही करू”, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १ डिसेंबर पासून राज्यातील सर्व  शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री आरोग्य विभाग आणि प्रशासन यांची बैठक घेणार आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.