Today’s Horoscope: 29 नोव्हेंबरचे राशिभविष्य, काहींसाठी सोन्यासारखा दिवस तर काहींची होईल मोठी फसवणूक..

0

Today’s Horoscope:मंगळवार दि. 29 नोव्हेंबर 2022, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार आज विक्रम संवत 2079 शके 1944 दक्षिणायन आहे. आजपासून, पंचक संध्याकाळी 07:52 वाजता सुरू होत आहे आणि 04 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 06:16 वाजता संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाऊ नये.  (Today’s Horoscope: 29 November)

 

राशिभविष्यानुसार आजचा दिवस सर्वच राशींसाठी उत्तम असणार आहे. विद्यार्थी आणि व्यावसायिक लोकांना आज फायदा होण्याची शक्यता आहे. पंचांगानुसार, आज दुपारी 03:00 ते 04:30 हा राहुकाल असेल आणि दिशाशूल उत्तर असणार आहे. तर आता आपण आजचे राशिभविष्य कसे असणार आहे. हे विस्तृत पणे पाहूया. (Today’s Horoscope: 29 November)

 

मेष: आजचा दिवस सामान्य जाईल. आज लोकांचा विश्वास जिंकू शकता. व्यवसायिक कामात गती येईल आणि तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांपासून सावध राहावे लागेल. जर एखादा व्यवहार केला असेल तर त्या व्यवहाराची व्यवस्थित चौकशी करा आणि पडताळणी करा. शेअर बाजार आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या बाबतीत आजचा दिवस रेंगळत  जाईल. तुमची एखादी ईच्छा पूर्ण होऊन तुम्ही आनंदी असाल.

 

वृषभ: आजचा दिवस भाग्याच्या दृष्टीकोनातून चांगला जाईल. तुमच्या भविष्यातील वाटचालीबद्दल चिंता कराल. घरातील व्यक्तीकडून तुम्हाला चांगले स्थान मिळू शकते. अविवाहितांना लग्नासाठी प्रस्ताव येतील. एखाद्या मित्राच्या प्रकृतीची चिंता तुम्हाला होऊ शकते. मोठ्यांना कुठलीही बाब नम्रपणे सांगा, तरच ते तुमच्या तुमचा आदर करतील. घरातील व्यक्तीला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल.

 

मिथुन: आजचा दिवस (Today’s Horoscope) खूपच लाभदायक असेल. आजच्या दिवशी करिअरची कसलीही चिंता करण्याची गरज नाही. कुठलेही काम शांत चित्ताने करा. तुमचे लक्ष कामात ठेवा. आर्थिक परिस्थितीमुळे आज थोडे चिंताग्रस्त असाल. तरीदेखील मन शांत ठेवून तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आदर करावा लागेल. मोठ्यांचे सहकार्य व सहवास मिळेल. आजचा दिवस प्रसन्न वाटेल. काही कारणास्तव प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

 

कर्क: तुमचे वैवाहिक जीवनात सुख, आनंद मिळेल. व्यवसायिक त्यांच्या व्यवसायात सुरळीत पणा येण्यासाठी व्यस्त राहतील. काही महत्त्वाच्या बाबींमध्ये परिवारातील एखाद्या व्यक्तिवर अवलंबून राहायला लागू शकते. तुमच्या आयुष्याच्या साथीदाराला तुमच्या बद्दल काही वाईट वाटू शकते. मन शांत राहील. पद आणि प्रतिष्ठा मिळू शकेल. व्यवहार करणे टाळा, अडचणीला सामोरे जावे लागेल. आजच्या दिवस सावधगिरीने पाऊल टाका.

 

सिंह: नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला असेल, तुम्हाला काही अनुभवी लोकांचा सल्ला घेण्याची गरज पडू शकते. व्यवसायिक लोकांनी व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आज तुमच्या कामात समर्पण आणि कष्ट घ्याल. स्वतः च्या प्रकृतीची काळजी घ्या. काही समस्या असल्यास गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आत्मिश्वास वाढेल त्यामुळे सर्व अडचणी सुटतील.

 

कन्या: वेगवेगळ्या विषयात तुम्हाला आवड निर्माण होईल. आजच्या दिवशी आर्थिक लाभ होण्याची शक्यता अधिक आहे. तुमचे महत्वाचे काम वेळेत पूर्ण करावे लागेल, नाहीतर त्यामुळे परत अडचणींना सामोरे जावे लागेल. तुमचे अगोदर पासून चालू असलेल्या महत्त्वाच्या कामात चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्हाला मन शांत ठेवून आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल नाहीतर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. भविष्यातील डोक्यात असणाऱ्या कामांवर लक्ष ठेवा.

 

तूळ: तुमच्या कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले असू शकते. कुठलाही विषय ताणून धरू नका. कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागेल. मन शांत ठेवा, अतिउत्साही होऊ नका. अन्यथा अडचणीला सामोरे जावे लागू शकते. कुठल्याही निर्णय घेत असताना, शांत आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे, जपून रहा.

 

वृश्चिक: सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला कुटुंबीयांचे संपूर्ण सहकार्य राहील. तुमचे भाऊ तुमच्या कामाला चालना देतील, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. तुमचा आनंद द्विगुणित करणारी एखादी चांगली घटना घडू शकते. तुमचे मन शांतापूर्ण ठेवा. आनंदाच्या भरात अतिउत्साही होऊ नका. व्यवहाराशी संबंधित कुठलेही काम करत असताना अति उत्साही होऊन आणि संयम सोडून चालणार नाही.

 

धनु: या राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुमचे वागणे आज सौम्य असेल, त्यामुळे तुम्हाला देखील आदर मिळेल. आर्थिक फायदा झाल्यामुळे तुम्ही देखील खुश असाल. व्यवसायातून आर्थिक लाभ मिळू शकेल. कुटुंबातील कलह होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे तुमची बरीच कामे मार्गी लावण्याची ऊर्जा मिळेल. कुटुंबातील व्यक्तीच्या भवितव्याचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका, येणाऱ्या काळात अडचणीला सामोरे जावे लागेल.

 

मकर: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खडतर असेल. तुम्ही ज्या कामाबाबतीत तणावात असाल तर ते काम मार्गी लागेल. आज तुम्हाला आदर मिळेल. सर्व क्षेत्रामध्ये योगदान देणारे लोक आज संभाषणाला पूर्ण महत्त्व देतील आणि त्यामुळे तुम्ही कुणाच्याही बोलण्यात फसू नये. शासन दरबारी असणारी प्रशासकीय कामे मार्गी लागतील. नवविवाहितांच्या जीवनात आनंद राहील.

 

कुंभ: या राशीच्या लोकांनी आज अतिउत्साही होऊ नये. मन आणि डोक शांत ठेवून समोरच्या व्यक्तीशी संवाद करा. आज तुमच्या कुटुंबातील लोकांना बोलत असताना देखील प्रमाणे आणि आदराने बोला. त्याग आणि सहकार्य भावना ठेवावी लागेल. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांत ऐकून घ्याल आणि त्यांच्या बोलण्याचा आदर कराल. धोरणीक वागून आज तुम्ही नवीन काही लोकांनाही जोडू शकता. कुठल्याही परिस्थितीत मोठ्यांचा सल्ला घ्या आणि त्याचे पालन करा.

 

मीन: या राशीसाठी आजचा दिवस धन लाभाचा आहे, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. वेगवेगळ्या कामांमुळे तुम्हाला तणावाला सामोरे जावे लागू शकते. व्यवसायिक लोक व्यवसायाच्या वृद्धीसाठी नवीन तंत्रांचा वापर करू शकतात. विद्यार्थ्यांच्या बाबतीत आज चांगल्या गोष्टी घडतील. बऱ्याच दिवसांचा आर्थिक व्यवहार मार्गी लागेल.

हेही वाचा:  चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..

 ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Yuzvendra Chahal: शिखर धवनने धनश्री वर्माचं सिक्रेट पकडलं रंगेहाथ; चहल बिचारा खाली मान घालून गेला निघून.. 

दिपीकाने स्वीकारला इस्लाम धर्म, नेटकऱ्यांची टीका थांबता थांबेना.. 

Health Tips: कमी वयात मुलांची दाढी का होतेय पांढरी ? ही आहेत कारणे, घ्या जाणून अन्यथा दाढी होईल पांढरी.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.