Bajaj ची ही जबरदस्त बाईक मोबाईल पेक्षा स्वस्त, 100 किमी मायलेज; एवढंच नव्हे तर..
Bajaj Platina 110 Launch: आजकाल पेट्रोलचे भाव खिशाला कात्री लावण्याचे काम करतात. मध्यंतरी सरकारच्या काही निर्णयामुळे पेट्रोलचे भाव थोडे कमी झाले होते, परंतु तरीदेखील सध्या पेट्रोलचा भाव १०६ रुपयांच्या आसपास प्रति लिटर एवढा आहे. एकतर आजकालच्या महागाईने सर्वसामान्य लोक प्रचंड त्रस्त झालेले आहेत. त्यात पुन्हा आर्थिक मंदीचे सावट जगभर यायला लागल्याचे पाहायला मिळत आहे. (Bajaj Platina 110 Launch)
त्यामुळे बाईक घेताना लोक तिच्या मायलेजचा देखील विचार करून बाईक घेतात. अशाच बाईक बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उत्तम मायलेज बाईक म्हणलं की, बजाजचे (Bajaj) नाव समोर येतेच. बजाज उत्तम मायलेज आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत बाईक बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. बजाजने आत्तापर्यंत अनेक उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक बनवल्या आहेत. (Bajaj Platina 110 Launch)
जर तुम्ही कमी बजेट मध्ये स्वस्तात मस्त आणि जबरदस्त मायलेज देणारी बाईक बघत असाल, तर तुम्ही बजाज प्लॅटिना 110 (Bajaj Platina 110) या बाईकला पर्याय म्हणून बघू शकता. प्लॅटिना 110 (Bajaj Platina 110) पूर्वीच्या प्लॅटिना सारखीच डिझाईन असली, तरीदेखील स्टायलिश लूक देण्यात आला आहे. त्यामुळे बाईक आणखीच उठून दिसते. हेडलॅम्पच्या वरच्या LEDs सह आणखी बल्ब देण्यात आलेले आहेत. तसेच काळ्या अलॉय व्हीलमुळे बाईक अधिक आकर्षक वाटते.
बजाज प्लॅटिना 110 (Bajaj Platina 110) मध्ये ब्रेक्ससाठी अँटी-स्किड सिस्टम आहे, जे आपल्याकडील ट्रॅफिकसाठी आणि रस्त्यांच्या असलेल्या दुरावस्तेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अँटी स्कीड या फिचरमुळे बरेच रस्ते अपघात टाळण्यात मदत होईल आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देखील घेता येईल. या बाईकमध्ये अद्ययावत सस्पेंशन सिस्टीम देण्यात आली आहे. या बाईकवरून तुम्हाला स्मूथ राइड करण्यास मदत करेल. या बाईकची आसन व्यवस्था देखील उत्कृष्ट देण्यात आली आहे. तसेच आरामदायी बॅक सीट अनुभव घेता येईल.
या बाईकमध्ये अँटीलॉक ब्रेकिंग फीचर देण्यात आले आहे. अँटीलॉक ब्रेकिंग हे एकप्रकारचे इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर आहे. जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अचानक ब्रेक लावल्यावर बाईकच्या चाकांचा वेग कंट्रोल करते. या फीचरमुळे बाईकचे आणि बाईकस्वाराचे देखील अपघात होण्यापासून संरक्षण करते. त्यामुळे अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम खूपच फायदेशीर आहे.
या बाईकला 115.45 CC चे 4 स्ट्रोक BS-6 DTS-i एअर कूलड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. या बाईकला 5 स्पीड गेअर्स देण्यात आले आहेत. पेट्रोलसाठी 11 लिटर क्षमता असलेली टाकी देण्यात आली आहे. ही बाईक वेगवेगळ्या कलर्स मध्ये उपलब्ध आहे. बाइक चारकोल ब्लैक (Charcoal Black), वोल्कैनिक रेड और बीच ब्लू कलर या कलर्स मध्ये उपलब्ध आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमत 65,920 रुपये आहे. तर आयफोनची किंमत 78 हजार रुपयांच्या आसपास आहे.
Baiaj Platina 110 च्या मायलेजचा विचार केल्यास 75 ते 90 किमीचे मायलेज कंपनीने दिले आहे. परंतु काही लोकांना यापेक्षा अधिक देखील मायलेज मिळत आहे. 100 किमी प्रति लिटर एवढे मायलेज मिळाले आहे. परंतु मायलेज हे रस्त्यावर आणि तुमच्या बाईक चालवण्यावर अवलंबून असते.
हेही वाचा: Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह..
Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार
Tips To Reduce Electricity Bill: वीजबिल येणार अर्ध्यावर, फक्त बसवा हे उपकरण बसवा..
UPI Payment करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम