weather update: शेतकऱ्यांवर पुन्हा संकट, या पाच दिवसांत सात राज्यामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; थंडीही गाठणार उच्चांक..

0

weather update: गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये (weather) सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस (rain) पडत आहे. हवामानामध्ये होणाऱ्या सतत बदलामुळे शेतकऱ्यांना (farmers) अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेकदा हातातोंडाशी आलेला घास अचानक कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने आणि हवामानात होणाऱ्या सतत बदलामुळे हिरावून घेतला जातो. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारी माहिती भारतीय हवामान खात्याने (Meteorological Department of India) प्रसारित केली आहे.

अवकाळी पाऊसाने (Unseasonal rain) खरीप हंगामाचे (Kharif season) खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने, शेतकरी अक्षरशः रत्यावर आल्याचं पाहायला मिळालं. यावर्षीची दिवाळी (Diwali) शेतकऱ्यांसाठी खूप कडू होतो. खरीप हंगाम अवकाळी पावसामुळे धुवून गेल्यानंतर, शेतकरी पुन्हा जोमाला लागला. मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या डोक्यावर संकट उभा राहिलं आहे. भारतीय हवामान खात्याने पुढच्या चार-पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढच्या चार-पाच दिवसांमध्ये केरळ (Kerala) लक्षद्वीप (lakshadweep) कर्नाटक (karnatka) गोवा (Goa) तमिळनाडू (Tamilnadu) अंदमान निकोबार आंध्र प्रदेशात (Andra Pradesh) या राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर, आज मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश (himachal pradesh) तसेच उत्तराखंडच्या भागामध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस कोसळणार असल्याचं अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

या राज्यात हवामान कोरडे 

पुढच्या चार दिवसांमध्ये देशातल्या सात राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असला तरी महाराष्ट्र (Maharashtra) पंजाब (Punjab) हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या राज्यांमध्ये (State) मात्र दोन डिसेंबर पर्यंत हवामान कोरडे (Weather dry) राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Maharashtra farmers) हवामान खात्याने वर्तवलेला हा अंदाज सुखद आणि दिलासादायक (Pleasant and comforting) असला तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये वातावरणात सातत्याने बदल होणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोणत्या राज्यांत कोसळणार पाऊस?

भारतीय हवामान खात्याने तामिळनाडू राज्याचा काही भाग, तसेच गोवा दक्षिण कर्नाटक अंदमान निकोबार बेट अशा स्वरूपात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. इतर भागांमध्ये मात्र हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. सोबतच ओडिशामध्ये येणाऱ्या पाच दिवसांमध्ये तापमान तब्बल चार ते पाच अशांनी कमी होणार आहे.

कुठे वाढणार थंडी

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामध्ये आज किंवा उद्या उत्तर अंदमान समुद्रावरती चक्रीवादळ निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. याचा परिणाम म्हणून, काही दिवसांमध्ये हरियाणा, पंजाब, , मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

हे देखील वाचाHealth Benefits of Sex: शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..

Today’s Horoscope: 29 नोव्हेंबरचे राशिभविष्य, काहींसाठी सोन्यासारखा दिवस तर काहींची होईल मोठी फसवणूक..

Yuzvendra Chahal: शिखर धवनने धनश्री वर्माचं सिक्रेट पकडलं रंगेहाथ; चहल बिचारा खाली मान घालून गेला निघून..

Success Story: गाईंच्या शेणावर बांधला एक कोटींचा बंगला, दुधातून घेतात दीड कटी वार्षिक उत्पन्न..

Tips To Reduce Electricity Bill: वीजबिल येणार अर्ध्यावर, फक्त बसवा हे उपकरण बसवा..

Bank Holiday December 2022: डिसेंबरमध्ये तब्बल 13 दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या तारखा..

Railway Bharti: 35,281 रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.