Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

0

Bigg Boss 16: पुण्याचे गोल्डन गाइज (Golden Guys) अशी ओळख असलेल्या सनी वाघचौरे आणि संजय गुजर या दोघांनी कलर्स टीव्ही वाहिनीवरील बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये नुकतीच त्याने वायल्ड कार्डद्वारे एंट्री केली आहे. कलर्स टिव्हीच्या (Colors Tv) ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत पोस्ट देखील करण्यात आली आहे.

 

अंगावर किलोने सोने घालणारे हे ‘गोल्डन गायज’ म्हणजेच सनी वाघचौरे (Sunny Waghchoure) आणि संजय गुजर (Sanjay Gujar). या दोघांच्या अंगावर सोने घालून फिरण्याच्या स्टाईलमुळे या दोघांचे फॅन्स भरपूर आहेत. सनी वाघचौरे याचे इंस्टाग्रामवर 16 लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तर संजय गुजर याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला 10 लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

 

हे दोघेही काही ना कारणास्तव चर्चेत असतात. तसेच फिल्म प्रॉडक्शन हाऊसला हे दोघे फायनान्स करत असल्याचे देखील बोलले जाते. तसेच बॉलीवूडमध्ये त्यांची चांगली ओळख देखील आहे. या अगोदर तो काही रिॲलिटी शो मध्ये देखील पाहायला मिळाले आहेत. विवेक ओबेरॉय सोबत देखील गोल्डन गायज्‌ यांची घट्ट मैत्री आहे. परंतु त्यातील एक सनी वाघचौरे याच्या बाबतीतील काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. तर चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

 

आपल्या अंगावर परिधान केलेल्या सोन्यामुळे अगोदर फारशी ओळख नसलेला सनी वाघचौरे अल्पावधीतच सगळीकडे चर्चेचा विषय झाला. त्यानंतरच्या काळात त्याचे बॉलिवुड मधील अभिनेत्यांसोबत फोटो व्हायरल होऊ लागले. त्यामुळे सनीची प्रसिध्दी आणखीच वाढली. त्याचे चाहते लाखांमध्ये झाले.

 

परंतु मध्यंतरी सनी वाघचौरे याच्यावर त्याच्या दुसऱ्या पत्नीने गंभीर आरोप केले होते. त्याच्या दुसऱ्या पत्नीने मारहाण करत गर्भपात केल्याचा आरोप केला होता. आपल्या आई वडिलांकडून गृहउपयोगी वस्तू घेतल्या तसेच मारहाण, शिवीगाळ करत गर्भपाताची औषधे देऊन माझा गर्भपात केला असा आरोप सनीच्या पहिल्या पत्नीने केला होता. पिडीत महिलेने मार्च 2011 ते ऑक्टोबर 2020 या दरम्यानच्या 9 वर्ष आपल्यावर हा अन्याय झाल्याचे सांगितले होते.

 

या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये सनी आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनी वाघचौरे, त्याचे वडील नाना वाघचौरे तसेच त्याची आई आशा वाघचौरे आणि सनीची बहीण निता यांच्यावर २६२/२०२० भा.द.वि. क. ४९८ (अ), ३१३, ५०४, ३३६, २९२, ३४ कलमांनुसार पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सनीच्या अंगावर असलेल्या सोन्यापैकी बरेचसे सोने हे त्याच्या पहिल्या बायकोकडून घेतले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे. सोन्याचे दागिने दाखवून त्याने बऱ्याच महिलांना आपल्या जाळ्यात खेचले असल्याचे देखील बोलले जाते. त्याची दुसरी पत्नी घरी असताना देखील तो तिसऱ्याच महिलेला घरी घेऊन यायचा. परंतु यावर त्याची पहिली पत्नी सोडून कोणच आक्षेप घेतला नव्हता, असे देखील त्याच्या पत्नीने म्हटले होते.

हेही वाचा: Health Benefits of Sex: शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..

Bajaj ची ही जबरदस्त बाईक मोबाईल पेक्षा स्वस्त, 100 किमी मायलेज; एवढंच नव्हे तर.. 

Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार 

weather update: शेतकऱ्यांवर पुन्हा संकट, या पाच दिवसांत सात राज्यामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; थंडीही गाठणार उच्चांक.. 

Yuzvendra Chahal: शिखर धवनने धनश्री वर्माचं सिक्रेट पकडलं रंगेहाथ; चहल बिचारा खाली मान घालून गेला निघून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.