Chanakya Niti: पत्नी नेहमी पतीपासून या 3 गोष्टी लपवून ठेवते, त्यातली दुसरी आहे खूपच धोकादादक..

0

Chanakya Niti For Husband Wife: पती आणि पत्नीच्या नात्यात आदर, प्रेमभावना, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असेल तर नाते खूप सुंदर होते. आपल्या संस्कृतीत या नात्याला खूप महत्व देण्यात आले आहे. पत्नी आणि पतीच्या नात्यात विश्वासाला खूप मोठे स्थान आहे. पत्नी आणि पती हे संसाराची दोन चाके आहेत. पत्नी आणि पतीच्या नात्यात पारदर्शिकता असायला हवीच. कुठेही ह्या नात्यात विश्वासाला तडा गेल्यास नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकमेकांबद्दल विश्वास असणे देखील खूपच महत्वाचे असते. (Chanakya Niti)

 

बऱ्याचदा पती आणि पत्नी एकमेकांपासून काही गोष्टी लपवून ठेवत असतात. परंतु छोट्या छोट्या गोष्टी लपवून ठेवल्या आणि त्या न सांगता एकमेकांना समजल्या तर मग वादविवाद होण्याची शक्यता निर्माण होत असते. दोघांनाही असे वाटते की मला कसे सांगितले नाही? माझ्यापासून कसे काय हे लपवून ठेवले? त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीदेखील एकमेकांशी शेअर करणे गरजेचे आहे. याबाबत चाणक्य (Chanakya Niti) म्हणतात, पत्नी पतीला या तीन गोष्टी सांगत नाही. अर्थात या तीन गोष्टी ती आपल्या पतीपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते.

 

पैशांची बचत करणे: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार (Chanakya Niti) पत्नी नेहमी आपल्या घरासाठी कशी बचत करता येईल याचा विचार करत असते. आपला नवरा जर अधिकच खर्चिक असेल तर त्याला नेहमी बचतीचे धडे देत असते. कमावलेल्या पैशांमधून बचत करणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. पत्नीला नेहमी या गोष्टीची जाण असते. तसेच पत्नीला घरातील लक्ष्मी म्हणून देखील संबोधले जाते. पत्नी पतीच्या पश्चात देखील कुटुंबासाठी थोडी थोडी बचत करत असते. अचानक गरज पडल्यानंतर कुणाच्यातरी पुढे हात पसरण्याऐवजी ते पैसे उपयोगी पडतात. पत्नीला या सर्व गोष्टींची जाण असते. त्यामुळे पत्नी नेहमी थोड्या थोड्या पैशांची बचत करत असते. त्या पैशांबाबत पत्नी आपल्याला पतीला काहीही सांगत नाही. कारण याबाबत पतीला समजल्यानंतर काही कारण नसताना देखील ते पैसे खर्च होऊ शकतात.

 

आजारपणाचे कारण: चाणक्यांच्या नीतीशास्त्रानुसार (Chanakya Niti) पत्नी आपल्या पतीपासून आपल्या शारीरिक स्वास्थ्य संबंधित गोष्टी पतीला सांगत नाही. जर पत्नीला काही झाल्याचे पतीला समजले तर पती तणावात जाईल, या चिंतेने ती आपल्या पतीला बऱ्याच गोष्टी सांगत नाही. कौटुंबिक गरजा भागवता भागवता आपला पती अगोदरच तणावात असतो, त्यामुळे माझ्या आजारपणाबाबत काही सांगितले तर त्याला आणखीच त्रास होईल म्हणून पत्नी पतीला काही गोष्टी सांगत नसते. परंतु कधीकधी ह्या गोष्टीचा तोटा देखील होऊ शकतो. कारण एखादा छोट्यातला छोटा आजार देखील दुर्लक्ष केल्याने आणखीच बळावू शकतो. त्यामुळे याबाबत आपल्या पतीला सांगणे गरजेचे आहे.

 

प्रेमभावना व्यक्त न करणे: आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार (Chanakya Niti) पत्नी बऱ्याचदा आपली प्रेम भावना पती जवळ व्यक्त करत नाही. पत्नी शारीरिक गरजा देखील आपल्या पतीला सांगण्याचे धाडस करत नाही. आपल्या भावनांना पत्नी आवर घालत असते. बऱ्याचदा तिचे शारीरिक सबंध ठेवण्याची इच्छा नसेल तरी देखील पत्नी पतीला नकार देत नाही. आपला पती नाराज होऊ नये, अशी तिची भावना असते. बऱ्याचदा काही विषयात तिचे वेगळे मत असेल, तरीदेखील ती आपल्या पतीला याबाबत काही बोलत नाही. कारण ती काही बोलल्याने वादविवाद होऊ नये, असे तिला वाटत असते.

हेही वाचा: Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

Chanakya Niti: चुकूनही करू नका हे  काम, नाहीतर तुमचे जवळचे लोकदेखील घेतील फायदा.

Chanakya Niti: पुरुषांच्या बर्बादीचं कारण ठरतात अशा गुणांच्या स्त्रिया; काय सांगते चाणाक्य निती? अशा ओळखता येतात त्या स्त्रिया..

Arjun Kapoor च्या बहिणीने चक्क कॅमेऱ्यासमोरच दाखवलं नको ते, व्हिडिओ व्हायरल..

Job: काम न करता 1 कोटी पगार, तरीही पट्ट्या म्हणतोय नको झालंय जीवन; पाहा काय आहे भानगड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.