Job: काम न करता 1 कोटी पगार, तरीही पट्ट्या म्हणतोय नको झालंय जीवन; पाहा काय आहे भानगड…

0

Job: सध्या जागतिक मंदीचे सावट संपूर्ण जगभर पाहायला मिळत आहे. जगातील दिग्गज कंपन्यांनी आपल्या कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. आज कितीतरी नोकरीवर (Job) असणारे लोक बेरोजगार झाले आहेत. अचानक नोकरीवरून काढून टाकल्याने पुढील कंपनीमध्ये नोकरी (Job) देखील मिळवणे खूप अवघड झाले आहे. मेटा (फेसबुक, व्हॉट्सॲप, Instagram), अमेझॉन, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहे. जागतिक मंदीचे सावट आता जगभर पाहायला मिळत आहे. या मंदीच्या काळात आपल्या कंपनीला आर्थिक तोटा होण्यापासून वाचवण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता.

 

परंतु एकीकडे हे सर्व असताना, एक व्यक्ती मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. भरमसाठ पगार असणारा हा व्यक्ती एका कारणामुळे चिंताग्रस्त आहे. आपल्याला आपल्या ऑफिस मध्ये काहीच काम नसल्याची तक्रार त्याने केली आहे. एकीकडे खासगी कंपन्यात काम करणारे कर्मचारी प्रचंड तणावात पाहायला मिळतात. कंपन्या तुटपुंजा पगार देऊन कर्मचाऱ्यांकडून रात्रंदिवस काम करून घेत असतात. त्यामुळे कर्मचारी देखील सतत तणावात असतात. खासगी क्षेत्रात काम (Job) करायचे म्हणले की, हे सर्व सहन करण्याची क्षमताच जणू अंगी असायला हवी, असे वातावरण झालेले असते. त्यातही एवढे सगळे काम करून देखील मनस्ताप सहन करावा लागतो.

 

एकीकडे लोक खूपच काम असल्याची तक्रार करतात तर दुसरीकडे डमार्ट नामक व्यक्ती आपल्याला कंपनीत कामच नसल्याची तक्रार करतो. तो आयर्लंडचा रहिवाशी आहे. तो आयरिश मेल या कंपनीत नोकरी करत आहे. ते फायनान्स मॅनेजर या पदावर काम करत आहेत. त्या ठिकाणी त्याला खूपच कमी काम असल्याची तक्रार त्याने केली आहे. त्यामुळे ही व्यक्ती खूपच चर्चेत आली आहे. कधीतरी एखादा ईमेल आल्यास ते काम लगेच ते पूर्ण करत असल्याचे त्याने या तक्रारीवरील सुनावणी दरम्यान सांगितले. बचाव म्हणून तो काम करत असलेल्या कंपनीने यामुळे सदर कर्मचाऱ्याला कसलाही तोटा झाला नसल्याचे कंपनीने सांगितले.

 

सहसा बऱ्याच कंपन्यांमध्ये ५ दिवसांचा आठवडा असतो. डमार्ट यांच्या कंपनीमध्ये देखील 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा आहे. तसेच त्यांच्या कंपनीमध्ये आधुनिक पद्धतीने कामकाज केले जाते. तो ज्यावेळी ऑफिस मध्ये जातो (Job), त्यावेळी तो नाश्ता करतो, तसेच वर्तमानपत्रे वाचत बसतो आणि कार्यालयीन कामे करतो. त्याला ऑफिस मधील कामाबाबत ई-मेल अथवा मेसेज केला जात नाही. त्याच्याशी याबाबत कसलाही संवाद केला जात नाही. त्याचा वार्षिक पगार देखील 1 कोटी रुपये आहे. एवढा गलेलठ्ठ पगार असताना त्याच्यावर अशी वेळ का आली? हे जाणून घेऊया.

 

त्याच्यावर अशी वेळ का आली?                      बऱ्याचदा बरेच लोक म्हणत असतात. चांगल्या कामाची शिक्षा मिळाली. कारण बऱ्याचदा जो व्यक्ती प्रामाणिकपणे आपल्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्या व्यक्तीला बऱ्याचदा त्रास सहन करावा लागतो. आपल्याकडे देखील प्रशासनात तुकाराम मुंढे हे अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असतात म्हणून त्यांची कित्येकदा बदली केली जात आहे. असाच काही प्रकार या व्यक्तीच्या बाबतीत देखील झाला आहे. डमार्ट यांच्या बाबतीत देखील असेच घडले. त्याने कंपनीमधील चुकीच्या अकाउंटिंगला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला सध्या कुठलेही काम दिले जात नाही.

हेही वाचा: Business Idea: पाच हजार गुंतवा, अन् सुरू करा हा व्यवसाय; दरमहा कमवाल लाखों रुपये, सरकारही करतंय मदत..

Infrared Lamp: लाईट बरोबर रूमही गरम करतात हे बल्ब; किंमतही आहे सामान्य बल्ब एवढीच..

Chanakya Niti: चुकूनही करू नका हे काम, नाहीतर तुमचे जवळचे लोकदेखील घेतील फायदा.

Urea Subsidy: युरिया खरेदीची चिंता मिटली; सरकार देतय 2,700 रुपये अनुदान, असा घ्या लाभ..

Ration Card: रेशन घेतल्याचा SMS तुम्हाला येतो का? SMS द्वारे कळतंय दरमहा किती रेशन घेतले, जाणून घ्या लगेच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.