Chanakya Niti: चुकूनही करू नका ‘हे ‘ काम, नाहीतर तुमचे जवळचे लोकदेखील घेतील फायदा.

0

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची आजतागायत सर्वत्र चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतेच. सोशल मीडियावर देखील वारंवार आपल्या आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्रातील (Chanakya Niti) वेगवेगळया पोस्ट पाहायला मिळतात. फेसबुक, इंस्टाग्राम, रिल्सच्या माध्यमातून त्यांचे विचार आपल्याला पहायला मिळतात. थोडक्यात चाणक्यांचे नितिशास्त्र (Chanakya Niti) आजदेखील लोकांच्या पसंतीस पडत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. कितीतरी वर्षापूर्वी लिहिलेले विचार आजच्या काळात हुबेहूब लागू पडतात.

आचार्य चाणक्य एक विद्वान, बुद्धिमान, अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व होते. चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये (Chanakya Niti) चांगल्या आयुष्यासाठी काही नियम सांगितले आहेत. त्यांनी सांगितले विचार आज देखील हुबेहूब जीवनात लागू पडतात. त्यांचे विचार आज देखील बरेच लोक आपल्या आचरणात आणत असतात. त्यांनी सांगितलेली काही तत्वे (Chanakya Niti) आपल्या आयुष्यात आपण लागू केली, तर आपले देखील आयुष्य खूपच सुंदर होऊन जाईल. कारण बऱ्याचदा माणसाला काही गोष्टी अनुभवातून विकत घ्याव्या लागतात. आपल्या आयुष्यातील बरीच तत्व अनुभव आल्यावर आपण निर्माण करतो.

जसे की, एखाद्या व्यक्तीवर तुम्ही खूप जीव लावला असेल, कदाचित तो तुमचा मित्रही असू शकतो. तुमचा जीव त्या व्यक्तिवर आहेच, परंतु तुम्ही त्या व्यक्तीला विश्वास ठेवण्यालायक देखील समजता. तुम्ही तुमच्या गोष्टी त्या माणसाला सांगता. तुमच्या आयुष्यातील काही गुपिते, महत्त्वाच्या गोष्टी त्या व्यक्तीला सांगता, कारण तुमचा त्या व्यक्तिवर प्रचंड विश्वास असतो. परंतु काही काळानंतर तुमच्या लक्षात येते की, ह्या व्यक्तीने तर माझ्या सगळ्या गोष्टी जगजाहीर केल्या आहेत. ज्या व्यक्तीला हे सगळं कळायला नको होते, त्या व्यक्तीला जाऊन ज्या व्यक्तीने सगळं काही शेअर केले आहे. तेव्हा तुम्ही किती मोठी चूक केली, हे तुमच्या लक्षात येईल.

तुमच्या लक्षात येते की, समोरच्या व्यक्तीने तर माझा विश्वासघात केला, त्यानंतर तुम्ही मग भावनिक होता. तुमचा विश्वास संपून गेलेला असतो. आता आपण प्रत्येक व्यक्तीला त्या व्यक्तीप्रमाणे समजायला लागतो. त्यामुळे कदाचित चांगली माणसे देखील तुम्ही गमावलेली असतात. परंतु मग आपण आपल्या आयुष्यात त्या बाबतीत तत्वे घालायला लागतो. कोणाला काय सांगायचे? हे विचारपूर्वक सांगायला सुरुवात करतो.  हे तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकता. अशाच काही चुका टाळण्यासाठी चाणक्यांनी काही तत्वे सांगितली आहे.

आचार्य चाणक्यांची काही तत्त्व (Chanakya Niti) आपण आपल्या जीवनात लागू केली तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीचा सामना अगदी चुटकी सरशी करायला शिकाल आणि तुम्ही कठीण प्रसंगांतून बाहेर पडाल. त्यामुळे सांगितलेली काही तत्वे आपल्या आचरणात आणणे खूपच फायदेशीर आहे. चाणक्यांच्या तत्वानुसार, कुठल्याही माणसाच्या वागण्याचा त्याच्या जीवनावर सर्वात मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे तुमचे वागणे कसे आहे, हे देखील खूप महत्वाचे आहे. बऱ्याचदा आपल्या वागण्यामुळे आपल्याला काही प्रसंगांना तोंड द्यावे लागते.

चाणक्य म्हणतात, भोळवट माणसाला लोक कुठेही गृहीत धरतात. त्याच्या विचाराला, त्याच्या मताला लोक काहीच किंमत देत नाहीत. त्यामुळे जेव्हा या लोकांच्या आयुष्यात अडचणींचा काळ असतो, तेव्हा या लोकांना इतरांपेक्षा जास्त त्रासाला सामोरे जावे लागते. चाणक्य म्हणतात, असे भोळ्या स्वभावाचे  लोक मूर्ख लोकांच्या श्रेणीमध्ये गणले जातात. अडचणीच्या काळात जर अशा भोळवट लोकांनी आपल्या स्वतः मध्ये आपल्या स्वभावात काहीच बदल केला नाही तर त्याला अजूनच कष्ट पडणार. चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार (Chanakya Niti) आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी स्वार्थी आणि हजरजबाबी असायला हवे असे सांगतात.

भोळा स्वभाव त्रासदायक:
आचार्य चाणक्य म्हणतात, जे लोक साधे आणि सरळमार्गी असतात, अशा स्वभाच्या लोकांना बऱ्याचदा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. चाणक्य म्हणतात, सरळमार्गी लोक हे  सरळ झाडासारखे असतात. कारण याच सरळ  झाडावर सर्वात अगोदर कुऱ्हाडीचे घाव घातले जातात. कारण हे झाड तोडण्यासाठी कमी कष्ट पडतात. हे झाड लगेच तोडले जाऊ शकते. परंतु याउलट वाकडीतिकडी झाडे वाचतात. त्यांच्या तत्वानुसार व्यक्तीला परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्या स्वभाव आणि वागण्यात  बदल करायला हवा. प्रसंगावधान राखून हुशारी दाखवता यायला हवी. अन्यथा सर्वात अगोदर अशाच लोकांचा बळी घेतला जातो.

चाणक्यांचा हा विचार आजदेखील लागू होतो. एखादी शांत, सरळमार्गी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला कुठलीही व्यक्ती त्रास द्यायचा विचार करू शकते. परंतु प्रसंग बघून आपल्या वागण्यात बदल करणाऱ्या वाटेला खूप कमी लोक जातात. अशा लोकांना त्रास देण्याचा कोहीही प्रयत्न करत नाही. अशा लोकांचा कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा विचार कोणीही करत नाही. परंतु त्याच ठिकाणी सरळमार्गी लोकांचा गैरफायदा लगेच घेतला जातो. काहीही चूक नसताना, कुणाच्याही भानगडीत नसताना अशा लोकांना त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे चाणक्यांनी सांगितलेली तत्वे (Chanakya Niti) आजही तंतोतंत लागू पडतात.

हेही वाचा: Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

Business Idea: पाच हजार गुंतवा, अन् सुरू करा हा व्यवसाय; दरमहा कमवाल लाखों रुपये, सरकारही करतंय मदत..

सायली संजीवने मान्य केले ह नाते, म्हणाली आम्ही दोघे एकमेकांचे ..

Rohit Sharma Expulsion: टी-२० कर्णधार पदाच्या हकालपट्टीवर रोहित शर्माचा BCCI ला करारा जवाब; रोहितच्या उत्तराने राहूल द्राविडही अडचणीत..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.