Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad: सायली संजीवने मान्य केले ‘हे’ नाते, म्हणाली आम्ही दोघे एकमेकांचे ..

0

Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad : युवा बॅट्समन आणि गेल्या काही दिवसांपूर्वी 1 ओव्हरमध्ये 7 सिक्स मारून नवा विक्रम आपल्या नावावर करणारा, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आपल्या शानदार खेळीमुळे सध्या चर्चेत आहे. देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेमध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये ऋतुराजने 159 बॉल मध्ये नॉट आऊट 220 धावांची खेळी केली होती. ज्यामध्ये 10 फोर आणि 16 सिक्स यांचा समावेश आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची बाब म्हणजे ऋतुराज गायकवाड याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स 43 धावा केल्या. एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. (sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad)

याच सामन्यात ऋतुराजची विक्रमी खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात ऋतुराजने दुहेरी शतकही झळकावले. ऋतुराजने केलेल्या नव्या विक्रमाचे महाराष्ट्रासह देशभरात कौतुक झालेले पाहायला मिळाले. ऋतुराज आणि सायली (sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad) या दोघांमध्ये काहीतरी असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु अद्याप सायली आणि ऋतुराज या दोघांनी अद्याप कधीही त्यांच्या या नात्याला दुजोरा दिला नव्हता. परंतु सायलीने अखेर यावर आता तिने सगळं काही सांगून टाकलं आहे.

गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटात सायली संजीव (Sayali Sanjeev) मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. त्या निमित्तानं सायली संजीवने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. मुलाखती दरम्यान सायलीला ऋतुराज गायकवाड आणि तिच्या (sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad) नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला प्रतिउत्तर देताना सायली म्हणली ‘आमच्यामध्ये खरंच असं काहीही नाही. सध्या माझ्या आणि ऋतुराजमधील नात्यांच्या अफवांमुळे आमच्यात असणारे मैत्रीचे नाते देखील संपले आहे. आम्ही पूर्वीसारखे मित्र आणि मैत्रिणीसारखं बोलूही शकत नाही.

पुढे बोलताना सायली म्हणाली, ऋतुराज आणि माझ्यात (sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad) खूप चांगलं मैत्रीचे नाते आहे. दोघांमध्ये तसलं काहीही नव्हतं. आमच्याबद्दल असं का बोललं जातंय, हे मला माहिती नाही. नको त्या अफवांमुळे नात्यात दुरावा येतो, परंतु अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांना हे समजत नाही. पूर्वी आम्ही दोघे आमच्या नात्यातील अफवांवर बोलायचो. या अफवा आहेत, थांबतील कधीतरी असे आम्हाला वाटत असायचे. परंतु या गोष्टींना दीड वर्ष झाले तरीदेखील हे सगळं बंद झालेलं नाही. आता मात्र खूप झालं यार, असं ऋतुराज आणि मला झालंय.

मित्र म्हणून ऋतुराजबद्दल (Ruturaj Gaikwad) सोशल मीडियावर एखादी पोस्ट करायची असल्यास किंवा त्याच्या खेळाबाबत त्याचे अभिनंदन करायचे असल्यास मला ते करता येत नाही. त्याला देखील माझ्या बद्दल एक मैत्रीण म्हणून बोलता येत नाही. अशा शब्दांत सायलीने आपल्या मनातील खंत व्यक्त केली. कारण या अगोदर देखील सायलीने वारंवार ऋतुराज आणि तिच्या नात्याबाबत अनेकदा सांगितले आहे. तसेच ती ऋतुराज आपल्या पेक्षा लहान असल्याचे सांगते. ऋतुराजचे वय 25 वर्ष आहे, तर सायलीचे वय 29 आहे. सायली ऋतुराजपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे.

कशामुळे व्हायला लागली चर्चा?

सायली संजीवने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिने वनपीस परिधान केला होता. सायलीच्या या इंस्टाग्राम पोस्टवर ऋतुराज गायकवाडने कमेंट केली होती. तिथूनच सायली आणि ऋतुराज (sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad) यांच्यात काहीतरी शिजत असल्याचे बोलले जावू लागले. तिच्या फोटोला वाह आणि हार्ट इमोजी (वाह ❤️) त्याने केली होती. त्यावर प्रतिसाद देताना सायलीने हार्ट इमोजी (❤️) शेअर करत केला होता आणि हीच गोष्ट सायलीला त्रासदायक ठरत असल्याचे तिला पाहायला मिळत आहे. कारण तिच्या पोस्टमध्ये देखील ‘वहिनी’ असे संबोधले जात आहे. तर काहीजण तिला त्यांच्या नात्याबाबत कमेंट करत असतात.

सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’ या टीव्हीवरील मालिकेतून काम करायला सुरुवात केली. याच मालिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. सायलीने चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्याकडे असणारे नैसर्गिक सौंदर्य आणि अभिनयामुळे सायलीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. हर हर महादेव या चित्रपटात देखील ती मुख्य भूमिकेत होती. तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. यासह तिचा नुकताच ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा: Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

Golden Guys: औषध देऊन पत्नीचा गर्भपात, बाहेरील स्त्रियांशी संबंध; सनी विषयी माहिती नसलेल्या या गोष्टी जाणून सरकेल पायाखाली जमीन..

 एकाच तरुणासोबत दोन जुळ्या बहिणींनी बांधली लग्नगाठ; कारण जाणून बसेल शॉक..

MI Cape Town: IPL 2023 पूर्वी नीता अंबानींचा मास्टर स्ट्रोक; मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद राशिद खानकडे..

Ration Card: गोड बातमी! जानेवारीत सरकार रेशन कार्ड धारकांना देणार अडीच हजार; जाणून घ्या अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.