Rinky Pinky Atul marriage: एकाच तरुणासोबत दोन जुळ्या बहिणींनी बांधली लग्नगाठ; कारण जाणून बसेल शॉक..

0

Rinky Pinky Atul marriage: लग्न (marriage) हा प्रत्येकाचा आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. अनेकजण आपला वैवाहिक जोडीदार (Spouse) हा आपल्याला समजून घेणारा प्रेम करणारा असावा, असं अनेकांना वाटत असतं. आपल्या वैवाहिक जोडीदाराने इतर कोणत्या पुरुष किंवा महिलेसोबत बोललेलं देखील अनेकांना आवडत नाही. मात्र सोलापूर (solapur) जिल्ह्यातील माळशिरस (malshiras) तालुक्यामधील अकलूज (akluj) या ठिकाणी काल एक अजब विवाह सोहळा (marriage ceremony) पार पडला. या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ (photo and video) व्हायरल (Viral) झाल्यानंतर, सोशल मीडियावर (social media) या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.

अकलूज वेळापूर या रोडवर असणाऱ्या एका गलांडे हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात आयटी इंजिनिअर असणाऱ्या जुळ्या बहिणींनी अकलूजमधील एकाच मुलासोबत दोघींनी लग्न केल्याने, या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ट्रॅव्हलचा व्यवसाय असणाऱ्या तरुणासोबत आयटी इंजिनिअर असणाऱ्या दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणांसोबत का लग्न केलं, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत लग्न करण्याला कारण देखील खास आहे.

या कारणांमुळे एकाच तरुणासोबत केलं लग्न

रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन उच्चशिक्षित जुळ्या बहिणी आयटी क्षेत्रामध्ये नोकरीला आहेत. दोघींचं बालपण त्याचबरोबर शिक्षण, नोकरी देखील एकाच ठिकाणी असल्याने दोघींच्या जीवनाचा प्रवास खूपच रंजकमय राहिला आहे. लहानपणापासून नोकरी करण्यापर्यंत दोघी एकत्रितच प्रवास करत असल्याने दोघीही एकमेकींशिवाय राहू शकत नसल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात यामुळे वर निवडताना दोघींनीही एकच वर निवडला. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, मग माळशिरस सारख्या माळरान असणाऱ्या या तरुणांसोबतच का विवाह केला? तर याला देखील रंजक कहानी आहे.

माळरानातला तरूण का निवडला

माळशिरस तालुक्यातील अतुल उत्तम अवताडे हा महाळुंग मधील तरूण मुंबईमध्ये ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतो. कांदिवलीमध्ये kandiwali) रिंकी आणि पिंकी(rinki and Pinki) या दोन तरुणी वास्तव्यास आहेत. रिंकी आणि पिंकी त्याचबरोबर त्यांची आई आजारी पडल्यानंतर, या तरुणाने आपल्या टॅक्सी मधून हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये व्यवस्थितरित्या तीघींची देखील काळजी घेतली. या प्रकारामुळे एकीचे अतुलवर प्रेम जडले.

रिंकी आणि पिंकी यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर घरामध्ये तिघी मिळून एकत्र राहू लागल्या. अनेक वर्ष तीघीही एकत्र राहिल्यामुळे, घरात पुरुषांचचं महत्त्व आम्हाला वेळोवेळी जाणवत होतं, असं देखील यांनी सांगितले. सहा महिन्यापूर्वी रिंकी पिंकी आणि त्यांची आई देखील आजारी पडली. आजारी पडल्यानंतर अतुल या तरुणाने आपल्या टॅक्सी ट्रॅव्हलमधून तिघींनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर, तिघींची देखील घरच्यांसारखीच विचारपूस करून काळजी घेतली.

अतुलने या तिघींचीही आजारी पडल्यानंतर, हॉस्पिटलमध्ये घेतलेली काळजी, केलेली विचारपूस यामुळे अतुल विषयी या तिघींनाही आपुलकी निर्माण झाली. अतुलच्या या प्रेमळ वर्तणुकीमुळे दोघींपैकी एकीचं अतुलवर प्रेम जडलं. साहजिकच लहानपणापासून दोन्हीं जुळ्या बहिणी 24 तास एकत्रच राहत असल्याने, दोघी एकमेकींशिवाय राहू शकत नव्हत्या. अशा वेळी दोघींनीही अतुल सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने देखील याला सहमती दर्शवली. आणि अखेर काल या दोन्हीं उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी अतुल या तरुणासोबत विवाह केला.

सोशल मीडियावर विवाहाची चर्चा

सुंदर उच्चशिक्षित असणाऱ्या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणांसोबत लग्न केल्याने सोशल मीडियावर या विवाहाची जोरदार चर्चा रंगली. हल्ली अनेकांना लग्नासाठी मुलगी मिळत नसताना या तरुणाने एकाच वेळी दोन तरुणी सोबत लग्न केलं हे अद्भुत आहे. एखादा माणूस जन्मजातच आपलं नशीब स्वतः आपल्या हाताने लिहून जन्माला येतो. असाच हा प्रकार असल्याचं सोशल मीडियावर अनेकांनी म्हटलं. तर काहींनी या विवाहाला शुभेच्छा देताना, खरोखरच या दोन बहिणींचा सन्मान केला पाहिजे. असंही म्हटलं गेलं.

हे देखील वाचाMI Cape Town: IPL 2023 पूर्वी नीता अंबानींचा मास्टर स्ट्रोक; मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद राशिद खानकडे..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

Samsung Offer: कंपनीचा मोठा निर्णय, आता Samsung प्रॉडक्टवर मिळेल 20 वर्षाची वॉरंटी, ग्राहकांची होणार चांदी

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Four Day Working Week: आता कंपनीत आठवड्यात फक्त 4 दिवस करावे लागेल काम, 3 दिवस सुट्टी; एवढंच नव्हे..

Udayanraje Bhosale: उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीसांची काढली लाज; म्हणाले, असला कसला..; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.