Four Day Working Week: आता कंपनीत आठवड्यात फक्त 4 दिवस करावे लागेल काम, 3 दिवस सुट्टी; एवढंच नव्हे..

0

Four day Working Week: खासगी क्षेत्रात काम करत असताना कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा क्षमतेपेक्षा अधिक काम करायला लावले जाते. बऱ्याच कंपन्या पगार देखील भरपूर देतात आणि कर्मचाऱ्यांकडून काम देखील भरपूर करून घेतात. तर काही कंपन्या काम भरपूर करून घेतात, परंतु चांगला पगार देत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता देखील खूपच खराब होते. आजकाल तर बऱ्याच कंपन्यांना कामगारांशी काहीही घेणे देणे नसते. (Four Day Working Week)

बऱ्याच खासगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना एका झटक्यात काढून टाकतात. काही कंपन्यांनी तर कुठलीही पूर्वकल्पना न देता, आपल्या कामगारांची कामावरून एका झटक्यात हकालपट्टी केलेली आहे. बऱ्याच लोकांचे यामुळे आयुष्य अडचणीचे झाले आहे. त्यामुळे कामगारांशी कंपन्या अशा पद्धतीने वागून त्यांचे एकप्रकारे शोषणच करत असतात. कामगारांच्या मानसिकतेचा विचारच शक्यतो कंपन्यांच्या व्यवस्थापनाला पडत नसावा.

कंपन्यांमधील सुट्टीबाबत बोलायचे झाले तर बऱ्याच कंपन्या अडचणीच्या काळात देखील सुट्ट्या द्यायला नकार देत असतात. काही कंपन्या रविवारची आठवडी सुट्टी देत सतात. तर ज्या कंपन्या आठवड्यातील 7 दिवस काम चालू ठेवतात, त्या कंपन्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील एक वार देऊन, त्या दिवशी सुट्टी देत असतात. जेणेकरून काम सातही दिवस चालू राहिले पाहिजे. तर काही कंपन्या शनिवार रविवार सुट्ट्या देत असतात.

आयटी कंपन्या तर हमखास कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार या दोनही दिवशी सुट्टी देत असतात. परंतु तुम्हाला जर सांगितले की काही कंपन्या आठवड्यातील 3 दिवस सुट्टी देणार आहेत, तर कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, परंतु हे खरे आहे. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 3 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातील फक्त 4 दिवस काम (Four Day’s Working Week) करायला लागणार आहे.

तसेच दिवसात 7 तासच काम करावे लागेल, अर्थात आठवड्यात फक्त 28 तास काम त्यांच्या कर्मचाऱ्यांना करावे लागेल. तसेच आठवडयात फक्त 4 दिवस काम (Four Day’s Working Week) असणार म्हणून पगार देखील कमी होणार नाही. यामुळे पगारात काहीही बदल होणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना कामाचा कंटाळा येणार नाही. तसेच कामात रस वाढून कंपनीची उत्पादकता वाढणार आहे.

हा निर्णय युनायटेड किंग्डम (Uk) मधील 100 कंपन्यांनी घेतला आहे. या कंपन्यामध्ये 2600 कर्मचारी काम करतात. या मध्ये Atom Bank आणि Avin या दोन ब्रिटनच्या कंपन्या समाविष्ट आहेत. ब्रिटन मध्ये कामकाजाचा 35 तासांचा आठवडा आहे. आपल्याकडे साधारणपणे 48 तासांचा आहे. ब्रिटनमध्ये कामगार सरासरी दिवसाला 7 तास काम करतात. त्यानुसार आता आठवड्यात 28 तास या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे.

कशामुळे घेतला हा निर्णय?
कंपन्यांनी बदललेल्या कामकाजातील वेळेमुळे त्यांचे कर्मचारी त्यांना सोडून दुसऱ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी जाणार नाहीत. तर इतर कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी या कंपन्यांकडे आकर्षित होतील. या कंपन्यांची कर्मचारी संख्या वाढेल. कर्मचाऱ्यांना कामात आळस येणार नाही. उत्साहाने काम केल्याने कंपन्यांचे उत्पादन वाढण्यास देखील मदत होणार आहे. तसेच कर्मचारी विनाकारण रजा घेणार नाहीत.

एकीकडे मेटा (फेसबुक), अमेझॉन सारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तसेच जागतिक मंदीचे सावट पाहायला मिळत असताना UK मधील या कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सगळीकडे चर्चा होताना पाहायला मिळत आहे. जगातील कामगार कायद्या अंतर्गत घेण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या निर्णयातील सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: LPG Price: घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसच्या दर कमी झाले? काय झाला निर्णय..

MBA Student eating video: माणूसकीला काळिमा फासणारी घटना! आमंत्रण नसताना लग्नात जेवल्यामुळे विद्यार्थ्यांना केले, पाहा व्हिडिओ..

BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर.. 

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.