MBA Student eating video: माणूसकीला काळिमा फासणारी घटना! आमंत्रण नसताना लग्नात जेवल्यामुळे विद्यार्थ्यांना केले…; पाहा व्हिडिओ..

0

MBA Student eating video: भारतीय संस्कृतीमध्ये (Indian culture) अन्नदानाला (food donation) खूप महत्त्व आहे. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने अनेक जण अन्नदान करताना आपण अनेकदा पाहतो. अनेक जण आमंत्रण नसताना देखील लग्न समारंभ (marriage ceremony) किंवा एखाद्या कार्यक्रमात जेवायला जात असतात. यात काही नवीन नाही, आणि विशेष देखील काही नाही. एखाद्या लग्न समारंभामध्ये अनोळखी व्यक्ती जेवत असेल, तर मोठ्या आदराने त्याचे विचारपूस करून जेवू घातलं जातं. मात्र आमंत्रण नसताना जेवण केलं म्हणून शिक्षा होत असेल, तर या वृत्तीला तुम्ही काय म्हणाल?

लग्नामध्ये आमंत्रण नसताना एमबीएचा विद्यार्थी (MBA student) जेवला म्हणून, लग्न मालकाने त्याला जी शिक्षा केली आहे, ती जाणून तुमचा देखील संताप अनावर होईल. तरुण मुलं एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असेल, तर त्या ठिकाणी आवर्जून जेवायला जाणे स्वाभाविक आहे. मात्र एमबीएच्या एका विद्यार्थ्याला लग्नामध्ये आमंत्रण नसताना जेवणं चांगलंच महागात पडलं आहे. आमंत्रण नसताना जेवल्यामुळे त्याची फार मोठी शिक्षा त्याला भोगावी लागली आहे. खरतर हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे.

लग्नामध्ये आमंत्रण नसताना एमबीएचा विद्यार्थी जेवला म्हणून, लग्न मालकाने त्याला चक्क भांडी घासायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेला हा व्हिडिओ (viral video) एका मिनिटांचा असून, यामध्ये तू कुठून आला? काय करतो? यासारखे असंख्य प्रश्न विचारून माणूसकी संपल्याचे दर्शन लग्न मालकाने घडवून दिल्याच पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत लग्न मालक म्हणत आहे, तुला लग्नासाठी आमंत्रण नसताना देखील तू जेवला कसं काय?

लग्नासाठी आमंत्रण नसतानाही तू जेवल्यामुळे, आता तुला याची शिक्षा भोगावी तर लागेलच. असं म्हणत, लग्न मालक लग्नासाठी आलेल्या पाहुणे मंडळींची खरकटी ताट धुवायला लावत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने व्हिडिओत पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर लग्न मालकाने तू कोणत्या गावाचा आहेस? अशी विचारणा करत, तू त्या गावाचं नाव देखील खराब केलस. असं देखील म्हणत आपली अक्कल पाजळत असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत लग्न मालक एमबीए विद्यार्थ्याला म्हणत आहे, फुकट जेवण करण्याची शिक्षा काय आहे, तुला माहिती आहे का? तू फुकट जेवला याची शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे. असं म्हणत, एक व्यक्ती पीडित तरुणाला चक्क खरकटी भांडी घासायला लावत असल्याचं दिसत आहे. एवढेच नाही, तर भांडी कशी घासतात, हे तुला माहिती नाही का? भांडी व्यवस्थित घास, म्हणत असल्याचं देखील दिसत आहे. हा व्हिडिओ न्यूज 24 या वेबसाईटने आपल्या ट्विटर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधील भोपाळ (Bhopal) मधील असल्याचे समोर आलं आहे.

हे देखील वाचा BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Tata Blackbird : लवकरच बाजारात येणार टाटा ब्लॅकबर्ड बाजारात; लोकांना का आहे या कारची एवढी उत्स्कुता?

Marriage: नवरदेवाने भरमंडपातच सगळ्या लोकांसमोर नवरीला केले Kiss, नवरी गेली थेट पोलीस स्टेशनला.. 

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.